४० वर्षात न पडलेला पाऊस यंदा; मोठ्या प्रमाणात नुकसान – गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील मोरणा विभागातील आंबेघर येथील काही घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत. तर अजूनही तीन कुटुंबातील लोक रात्रीपासून बेपत्ता आंबेत. या गावासह पाटण तालुक्यातील इतर नुकसानग्रस्त गावांना शुक्रवारी दुपारी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी भेट दिली. यावेळी मंत्री देसाई म्हणाले की, गेल्या चाळीस ते पन्नास वर्षात अशा पद्धतीचा पाऊस पडला नव्हता. … Read more

आंबेघरमध्ये दरड कोसळली : घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली; तीन कुटुंबातील लोक रात्रीपासून बेपत्ता

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सतत पडत असलेल्या अतिवृष्टीमुळे डोंगर परिसरातील वाडी तसेच गावांमध्ये भूस्तखलनाच्या घटना घडू लागल्या आहेत. पाटण तालुक्यातील मोरणा विभागातील आंबेघर येथील काही घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली आहेत. तर अजूनही तीन कुटुंबातील लोक रात्रीपासून बेपत्ता झाले आहेत. या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, … Read more

उघड्यावर अंत्यसंस्कार : गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदार संघातील लोहारवाडी स्मशानभूमीचा प्रश्न केव्हा सुटणार

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदार संघातील काळगाव (ता. पाटण) येथील लोहारवाडीला गेल्या पाच वर्षापासून स्मशानभूमी नसल्याने उघड्यावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. तर चार दिवसापूर्वी अतिवृष्टीत एका मृतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तात्पुरते शेड उभारावे लागले. लोहारवाडी ग्रामस्थांच्या या अडचणीकडे पाटणच्या दोन्हीही गटाच्या लोकप्रतिनिधीचे लक्ष नसल्याने लोकांच्यात नाराजी आहे. गेल्या चार वर्षापासून पाटण … Read more

पावसामुळे शेतीचे नुकसान : कराड चिपळूण महामार्गावर शेतकऱ्यांकडून रास्तारोको आंदोलन

पाटण : सकलेन मुलाणी दोन दिवस झालेल्या पाऊसाने पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. त्यामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करुन मदत मिळावी, अशी मागणी करीत पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी शनिवारी रास्तारोको आंदोलन केले. मुसळधार पावसामुळे पाटण तसेच कराड तालुक्यातील शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. … Read more

मुसळधार पावसामुळे पाटण तालुक्यात भूस्खलन ; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी गेल्या दोन दिवसांपासून कराड व पाटण तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे या तालुक्यांतील दुर्गम भागातील अनेक गावात जमिनी खचण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. असाच प्रकार गुरुवारी पाटण तालुक्यातही तारळे विभागातील म्हारवंड येथे घडला. बुधवारी रात्री कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे पाटण तालुक्यातही तारळे येथील म्हारवंड गावात … Read more

BREAKING :कोयनाधरण व पाटण तालुक्यात भूकंपाचे सलग दोन धक्के

Bhukamp

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोयनाधरण व पाटण तालुक्यात मंगळवारी दुपारी सलग दोन भूकंपाचे धक्के बसले आहेत. 3 वाजून 21 मिनिटांनी 3 रिश्टर सेल व त्यानंतर लगेच 3 वाजून 33 मिनिटांनी 2.8 रिश्टर सेल भूकपाचा धक्का जाणवला, असल्याची माहिती उविभागीय अभियंता, उपकरण उपविभाग कोयनानगर यांनी दिली. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून किती अंतरावर आहे, यांची माहिती … Read more