सातारा जिल्ह्यात भूकंपाचा पुन्हा धक्का

पाटण | सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी भुकंपाचे धक्के बसले. आज मंगळवारी दि. 1 रोजी सकाळी 9.47 वाजता 3.3 रिश्टर स्केलचा भूकंप कोयना धरण परिसरात झाला. पाटण तालुक्यात कोयना धरण आहे. या धरण परिसरात सतत भूकंपाचे धक्के जाणवत असतात. तसेच काहीवेळा जिल्ह्यातील पाटण, कराड, सातारा परिसरासह सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्यातही भूकंपाचा धक्का जाणवतो. मंगळवारी सकाळीही 9 वाजून … Read more

निवडणूक बिनविरोध : पाटण तालुका दूध उत्पादक संघाच्या अध्यक्षपदी सुभाषराव पवार, उपाध्यक्षपदी शांताराम सुर्यवंशी

पाटण | राज्याचे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर व राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाटण तालुका दूध उत्पादक संघाच्या पदाधिकारी निवडी बिनविरोध पार पडल्या. नूतन चेअरमनपदी सुभाषराव पवार व व्हाइस चेअरमनपदी शांताराम सूर्यवंशी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली. पाटण तालुका दूध संघाच्या निवडणुकीत संचालक म्हणून मावळते चेअरमन शंकरराव जाधव, व्हा. चेअरमन शांताराम सूर्यवंशी, सुभाषराव पवार, … Read more

दुर्देवी : शेततळ्यात बुडून सख्या भाऊ-बहिणीचा मृत्यू

पाटण | रोमनवाडी (येराड) (ता. पाटण) येथे सोमवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास शेततळ्यात बुडुन सख्खा बहिण- भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत स्थानिकांकडून मिळालेली माहिती अशी, रोमनवाडी येथील एका फार्म हाऊसवर कामावर असलेले सचिन जाधव (रा. रोमनवाडी) यांच्याकडे पाहुणे म्हणून अनिल पवार (रा. काठी, … Read more

नाडे गावात पुन्हा चोरट्यांची दहशत : एका रात्रीत सलग तीन घरफोड्या

पाटण | तालुक्यातील नाडे गावात एकाच रात्री सलग दोन घरफोड्या करून भावाला धारदार हत्यारांचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देऊन घरी पाहुणी आलेल्या बहीणीच्या गळ्यातील पावणेदोन तोळ्यांच्या ऐवज सोन्याची चोरी केल्याच्या घटनेला अद्याप एक माहिना ही पूर्ण झाला नाही. अशातच शुक्रवारी मध्यरात्री पुन्हा सलग तीन बंद घरे फोडण्याची घटना घडली. त्यामुळे एकाच महिन्यात सलग दोन … Read more

पाटण शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार : तीन महिन्यापूर्वीचा आदेश, तीन तासात अंमलबजावणी करण्याच्या विद्यार्थ्यांना सूचना

कराड | शासनाच्या शिक्षण विभागाने तीन महिन्यापूर्वी दिलेल्या आदेशाची अमंलबजावणी करण्यासाठी पाटण तालुक्यातील शिक्षण विभाग तीन तास अगोदर जागा झाला आहे. शिक्षण विभागाच्या निष्कळजीपणामुळे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांच्या या नुकसानीस बेजबाबदार असणाऱ्या आणि पालकांना त्रास देणाऱ्या शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पालकांच्यातून होत आहे. पाटण तालुका … Read more

चाफळच्या श्रीराम मंदिर परिसरात संचारबंदीचे आदेश

कराड | पर्यटन स्थळाचा दर्जा असलेले चाफळ येथील श्रीराम मंदिरात दरवर्षी जानेवारी महिन्यात मकर संक्रातीला (दि. 14 जानेवारी) सीतामाईची यात्रा मोठ्या भक्तीभावाने व उत्साहात पार पडते. यादिवशी चाफळला मकर संक्रातीचे हळदी- कुंकू आणि अखंड साैभाग्याचा वसा घेण्यासाठी गर्दी करत असतात. मात्र गेल्या काही दिवसापासून कोरोना रूग्णांची संख्या वाढू लागल्याने चालू वर्षी सीतामाईची यात्रा रद्द करण्याचा … Read more

विहेत एका रात्रीत तीन घरे फोडली, मुद्देमाल लंपास

crime

पाटण | विहे (ता. पाटण) येथे तीन बंद घरांना चोरट्यांनी लक्ष्य केले आहे. तसेच आणखी एका ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला असून, संशयितांनी सुमारे 80 हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी झाल्याने विहेसह परिसरात खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी चोरी करताना बाहेरून घरांना कडी लावलेल्या होत्या. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, विहे येथे मंगळवारी रात्री … Read more

पाटण अर्बन बॅंकेच्या अध्यक्षपदी जयसिंह राजेमहाडिक तर उपाध्यक्षपदी धनंजय ताटे बिनविरोध

कराड | पाटण अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या चेअरमनपदी जयसिंह उर्फ बाळासाहेब राजेमहाडिक (तारळे, ता. पाटण) यांची तर व्हा. चेअरमनपदी धनंजय ताटे (ताबवे, ता.कराड) यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडी पार पडल्या. पाटण अर्बन बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत मावळते चेअरमन दिनकरराव घाडगे, जयसिंह उर्फ बाळासाहेब राजेमहाडिक, दिलीपराव मोठे अंकुश मोडे, … Read more

पक्षांसाठी अन्नपाण्याच्या पात्रांचे वाटप : मंद्रुळकोळे येथील सामाजिक परिवर्तन संस्थेकडून उपक्रम

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मंद्रुळकोळे येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या सामाजिक परिवर्तन संस्थेने पक्षांसाठी अन्न- पाण्याची पात्रे नागरिकांना वाटून आपल्या कार्याचा प्रारंभ केला. येथे नुकत्याच राबवीलेल्या या उपक्रमाचे नागरिकांतून कौतुक होत आहे. मंद्रुळकोळेचे सुपूत्र, सामाजिक कार्याची विशेष आवड असलेले राजपत्रित निवृत्त वनाधिकारी वसंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेल्या या संस्थेमार्फत विविध उपक्रमातून समाजातील … Read more

पाटणला वनविभागाचा छापा : सांबर शिकार प्रकरणी 5 जणांना अटक

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर मधील नाव गावातील काही ग्रामस्थांनी सांबर या प्राण्यांची शिकार केल्याची घटना उघडकीस आलेली आहे. सांबराची शिकार केल्यानंतर त्याचे मांस शिजवत असल्याची गुप्त माहिती वन्यजीव विभाग हेळवाक यांना समजली. गोपनीय माहितीच्या आधारे वनक्षेत्रपाल संदीप जोपळे यांनी छापा मारून 5 संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. वनविभागाकडून … Read more