कसलीही आर्थिक मदत न करता मोदी सरकार फक्त राज्यांवर दादागिरी करतंय!- जितेंद्र आव्हाड

मुंबई । कोरोनातून बरे होऊन नुकतेच घरी परतलेले राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल सुरू केला आहे. मोदी सरकार कसलीही आर्थिक मदत न करता केवळ राज्यांवर दादागिरी करतंय, असा आरोप त्यांनी केला आहे. ”’कोरोनाशी खरी लढाई फक्त आणि फक्त राज्य सरकारे करत आहेत. याउलट कुठलीही आर्थिक मदत न करता मोदी सरकार अभ्यास … Read more

लाॅकडाउनबाबात होणार मोठी घोषणा? पंतप्रधान मोदी आज रात्री ८ वाजता लाईव्ह

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री आत वाजता पुन्हा जनतेशी संवाद साधणार आहेत. यामुळे पंतप्रधान मोदी लोकडाऊन चा कालावधी पुन्हा काही दिवस वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सध्या देशात एकूण ७० हजाराहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. यापार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून लोकडाऊन वाढवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. … Read more

मुंबईत अत्यावश्यक सेवेतील व्यक्तींसाठी लोकल ट्रेन सुरु करा; उद्धव ठाकरेंची मोदींकडे मागणी

मुंबई । कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशातील लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपण्याच्या काही दिवसांपूर्वीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करत प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या मागण्याही ऐकल्या. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही यावेळी पंतप्रधानांकडे काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करत मुंबई लोकल सुरु करण्याची मागणी केली. … Read more

लॉकडाउन कायम ठेवा! परंतु..; उद्धव ठाकरेंनी केली मोदींकडे ‘ही’ मागणी

मुंबई । लॉकडाउन कायम ठेवत काही निर्बंध शिथील करावे अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली आहे. यासोबत उद्धव ठाकरे यांनी राज्यात पोलिसांना विश्रांती देण्याची गरज असून केंद्रीय पोलीस दलाला राज्यात पाठवावं अशी विनंती पंतप्रधानांकडे केली आहे. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा येत्या १७ मेला संपत असून या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी … Read more

कोरोना संकट काळात तरी राजकारण करणं थांबवा! ममता बॅनर्जींची मोदींना विनंती

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहेत. यावेळी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्व राज्यांना समान वागणूक दिली पाहिजे असंही स्पष्टपणे सांगितलं. केंद्र सरकारने कोरोनासारख्या इतक्या कठीण काळात राजकारण करणं थांबवावं अशी मागणी पंतप्रधान मोदींसोबत आयोजित बैठकीत बोलताना ममता बॅनर्जी यांनी केली. ममता बॅनर्जी यांनी बैठकीत … Read more

नोकरी गेली तरी घाबरू नका! मोदी सरकारची ही योजना आपल्याला देईल पुढील २ वर्षांसाठी पगार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोनाव्हायरसच्या संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आली आहे. यामुळे बर्‍याच कंपन्यांनी कर्मचारी कपात सुरू केली आहे तर कुठेतरी वेतन कपात केली जात आहे. या संकटात असे कोणतेही उद्योग नाही आहेत जेथे लोकांच्या नोकर्‍यावर संकट आलेले नाही. बर्‍याच कंपन्यांनी कर्मचारी कपातही सुरू केली आहे. आपल्याला देखील नोकरी संबंधित समस्या येत असल्यास,ही … Read more

पीएम केअर्स फंडचे पैसे खर्च झाले तरी कुठं? हे जनतेला कळू द्या!- राहुल गांधी

नवी दिल्ली । कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पीएम केअर्स फंड बनवला होता. कोरोना संकटात पीएम केअर्स फंड अंतर्गत जमा केलेला निधी कुठे खर्च झाला? याची माहिती जनतेला कळायला हवी अशी मागणी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केली आहे. हा पैसा कुठे, कसा खर्च झाला याचे तपशील मोदी सरकारने जनतेला द्यायला हवे असे राहुल यांनी म्हटलं. … Read more

डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘या’ कार्यक्रमांमुळेच गुजरातमध्ये कोरोना फोफावला; काँग्रेसचा आरोप

अहमदाबाद । गेल्या फेब्रुवारीमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहमदाबादमध्ये ‘नमस्ते ट्रम्प’ हा भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, हा कार्यक्रम आता कोरोनामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमामुळे गुजरातमध्ये कोरोना पसरला, असा दावा गुजरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित छावडा यांनी केला आहे. सध्या गुजरातमधील … Read more

आमचं हिंदुत्व विखारी, विषारी नाही; संजय राऊतांनी हाणला भाजपाला टोला

मुंबई । ‘मी स्वत: प्रखर हिंदुत्ववादी आहे. हिंदुत्वाचा विचार अनेक व्यासपीठांवरून सातत्यानं मांडत आलोय. पण आमचं हिंदुत्व विखारी, विषारी नाही. देश तुटावा, आणखी एक पाकिस्तान निर्माण व्हावा. व्होटबँका निर्माण कराव्यात हा बाळासाहेबांचा विचार कधीच नव्हता,’ असं खासदार संजय राऊत म्हणाले.एका यू-ट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी देशातील सध्याच्या परिस्थितीबरोबरच भाजपच्या कारभारावर परखड भाष्य केलं. ‘देशात गृहयुद्ध … Read more

६४.५ लाख लोकांना मिळणार वर्षाला ३६ हजार रुपये; तुम्ही पण ‘असा’ घेऊ शकता फायदा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । असंघटित क्षेत्रासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या तीन पेन्शन योजनांमध्ये आतापर्यंत ६४,४२,५५० लोकांनी नोंदणी केली आहे. ज्यांना आता वार्षिकरित्या ३६ हजार रुपये पेन्शन मिळेल.आपणही या पेन्शन योजनेत नोंदणी करून आपले म्हातारपण सुरक्षित करू शकता. पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना (पीएम-एसवायएम), पीएम किसान महाधन (पीएम-केएमडीवाय) आणि स्मॉल बिझिनेस पेन्शन योजना या अशा … Read more