पोलिसांचा छापा ः कत्तल खान्यातील ३१ जनावरांची सुटका

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड येथील इदगाह मैदानच्या शेजारी चाँद पटेल वस्तीमध्ये जनावरांच्या बेकायदेशीर कत्तल खान्यावर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे. सदरची कारवाई गुरूवारी रात्रीच्या सुमारास केली. यामध्ये 31 जनावरांची सुटका करण्यात आली आहे. याबाबत सहाय्यक फौजदार मारूती चव्हाण यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली असून अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी … Read more

मुंबईत मास्कचा काळाबाजार सुरूच; पोलिसांच्या धाडीत ४ लाख मास्क जप्त

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी काळाबाजार सुरु असून पोलिसांनी मास्कचा मोठा जप्त केला आहे. मुंबई पोलिसांनी अंधेरीत विमानतळाजवळील एका गोदामावर धाड टाकत ४ लाख मास्क जप्त केले आहेत. या साठ्याची एकूण किंमत जवळपास १ कोटी रूपये सांगितली जात आहे. माक्सचा अवैधरित्या साठा करणाऱ्या 4 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. Maharashtra: Mumbai Police … Read more

सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोन बॉलिवूड अभिनेत्रींना अटक; मुंबई पोलिसांची कारवाई

मुंबई पोलिसांनी गोरेगावमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये चालणाऱ्या हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. यावेळी पोलिसांनी दोन मुलींची सुटका केली आहे. या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी या कारवाईत बॉलिवूडच्या दोन अभिनेत्रींना या मुलींना देहविक्री व्यवसायात ढकलणाच्या आरोपात अटक केली. या दोघींपैकी एक मॉडेल आहे.

परतवाडा वनविभाग आणि पोलीस यांच्या धाडसी कारवाईत मौल्यवान अवैध सागवान, तयार फर्निचर जप्त

वनविभाग परतवाडा तसेच ब्राह्मणवाडा थडी पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये चार लक्ष रुपयांचे अवैध फर्निचर, व सागवान चरपटा जप्त करण्यात आलेल्या आहेत. गावामध्ये वनविभाग व पोलिसांची धाड पडल्याची माहिती समजताच घरातून या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्या आरोपींनी घटनास्थळावरून पोबारा केला आहे.

नक्षल्यांचा घातपाताचा कट गडचिरोली पोलिसांनी उधळला

अबुझमाड जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलातील जवानांनी नक्षलवादी प्रशिक्षण तळ उध्दवस्त करत २ नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश मिळविले होते. यावेळी मोठया प्रमाणावर नक्षल साहित्य तसेच दस्तऐवज हस्तगत करण्यात आले होते. मिळालेल्या दस्तऐवजावरुन काल गडचिरोली पोलिस दलाने उपविभाग भामरागड अंतर्गत येणाच्या पोमके लाहेरी हद्दीतील लाहेरी ते धोडराज रस्त्यावर शोध अभियान राबविले होते. या रस्त्यावर नक्षलवादयांनी घातपाताच्या दृष्टीने पुरुन ठेवलेले अंदाजे १५ कि. ग्रॅ. वजनाचे क्लेमोर माईन मिळुन आले.

लाखो रुपयांच्या अवैध दारूसाठ्यावर पोलिसांनी चालवला चक्क ‘बुलडोझर’

जिल्ह्यातील गोंडपिपरी पोलिसांनी लाखो रुपयांचा दारूसाठा बुलडोझर चालवत नष्ट केला. मागील तीन वर्षात केलेल्या कारवाईत हा दारूसाठा जप्त करण्यात आला होता. तो नष्ट करण्यासाठी पोलिसांनी या दारूसाठ्यावर थेट बुलडोझर चालवला. 

इचलकरंजीत तब्बल पावणे दोन कोटींचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कबनूर येथे सुरू असलेल्या स्थिर पोलीस पथकाकडून तपासणी मध्ये एका कारमधून तब्बल पावणे दोन कोटीचे सोन्या – चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. आयकर विभागाकडून याबाबत अधिक चौकशी सुरू असून यामुळे शहर आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

परभणी जिल्ह्यात पोलिसांनी लाखो रुपयांच्या गुटख्याने भरलेला ट्रक पकडला

परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरातील आठवड़ी बाजार परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई करत गुटख्याने भरलेला ट्रक पकडला. या कारवाईत लाखो रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. पाथरी पोलिसांनी पहाटे ४ च्या सुमारास ही कारवाई केली.

बंगल्यामध्ये सुरु असणाऱ्या कुंटन खान्यावर छापा

सांगली प्रतिनिधी| स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबिंध कक्षाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बंगल्यावर छापा टाकून त्या ठिकाणी छुप्या पद्धतीने सुरु असलेला वेश्या अड्डा उध्वस्त केला. या ठिकाणाहून २ महिलांना अटक केली आहे, तर एका पीडित मुलींची सुटका करण्यात आली आहे. सुभाषनगर येथील … Read more

चोरट्याच्या घरातून चार लाखांची चांदी जप्त

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे चेन्नई येथील एका दुकानात गलाई कामगार म्हणून काम करीत असलेल्या जत तालुक्यातील एकाने आपल्या अन्य तीन साथीदारांसह २८ किलोची चांदी चोरून पोबारा केला होता. चेन्नई पोलीस आणि उमदी येथील पोलिसांनी त्यातील एका आरोपीच्या लवंगा येथील घरावर छापा टाकून सुमारे चार लाखांची १० किलोची चांदी ताब्यात घेतली, मात्र आरोपी मिळाला नाही. … Read more