सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास म्हणत मोदींनी UN मध्ये दिला नवा मंत्र

नवी दिल्ली । कोरोना महामारीशी लढण्यासाठी भारताने जनआंदोलन उभे केले आहे असे वक्तव्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. UNESC च्या कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले आहे. कोरोनाचे संकट जेव्हा भारतात आले तेव्हा संपूर्ण भारत या विरोधात लढा देण्यासाठी उभा राहिला आहे. त्यामुळेच जगाच्या तुलनेत भारतात कोरोनाचे प्रमाण नियंत्रणात आहे असेही त्यांनी म्हटले आहे. … Read more

शिवसेना पदाधिकाऱ्याच्या पत्नीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे  सांगली शहर शिवसेनेचे पदाधिकारी अनिल शेटे यांच्या पत्नी गीता अनिल शेटे यांनी मीरा हौसिंग सोसायटी मधील पडक्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळला. त्यावेळी आत्महत्येची घटना उघडकीस आली. गीता शेटे यांनी कोणत्या कारणास्तव आत्महत्या केली याचे कारण अद्याप समजले नाही. … Read more

महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून शिवसेनेची काँग्रेसकडे दिलगिरी

मुंबई । महाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीवरून काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटताच शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी या प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडं दिलगिरी व्यक्त केली आहे. खुद्द बाळासाहेब थोरात यांनी ‘टीव्ही ९’ या वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली. राज्य सरकारच्या ‘महाजॉब्स पोर्टल’च्या जाहिरातीत कुठल्याही काँग्रेस नेत्याला स्थान न दिल्याबद्दल महाविकास आघाडीत पुन्हा एकदा … Read more

पवारांची मुलाखत उद्धव ठाकरेंवर खुली टीका करण्यासाठीच होती- नारायण राणे 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शिवसेना नेते तसेच सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची घेतलेली मॅरेथॉन मुलाखत चर्चेत आहे. शरद पवार यांनी संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत देशातील व राज्यातील परिस्थितीवर भाष्य केले आहे. त्याचबरोबर भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली होती. या मुलाखतीत शरद पवार यांनी केलेल्या टीकेला भाजपाचे … Read more

फडणवीसांच्या मी पुन्हा येईन..घोषणेत घमेंड, गर्व नाही तर.. – नारायण राणे

Narayan Rane

मुंबई । शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली. सामनात छापून आलेल्या या मुलाखतीत शरद पवार यांनी भाजपा व देवेंद्र फडणवीस यांचा नामोल्लेख न करता टीका केली होती. विशेषतः फडणवीस यांच्या मी पुन्हा येईन या विधानावरही पवार यांनी भाष्य केलं होतं. यावर भाजपाचे नेते आणि खासदार नारायण राणे यांनी … Read more

काँग्रेसने ‘या’ २ नेत्यांवर सचिन पायलट यांची समजूत काढण्याची सोपवली कामगिरी

नवी दिल्ली । बंडखोरी करून राजस्थानातील गहलोत सरकार अडचणीत आणणारे काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांना काँग्रेस पक्ष गमावू इच्छित नाही. त्यासाठी प्रियंका गांधी यांनी पक्षाचे जेष्ठ नेते अहमद पटेल आणि वेणुगोपाल यांना सचिन पायलट यांची समजूत काढण्याची कामगिरी सोपवली आहे. पायलट यांना पक्षात पुन्हा आणण्याचा हे नेते प्रयत्न करतील. या अगोदरही प्रियंका गांधी वाड्रा … Read more

ग्रामपंचायतीवर थेट राजकर्त्यांनी निवड करणे चुकीचेच – विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस 

Devendra Fadanvis

मुंबई । राज्यातील मुदत संपत असलेल्या सुमारे हजार १४ हजार ग्रामपंचायतींवर पालकमंत्र्यांच्या सल्लामसलतीने प्रशासक  नेमण्याच्या  आदेशाला विरोध करत सरकारने दिलेला   आदेश तत्काळ मागे घेण्यात यावा. हा आदेश लोकशाही परंपरांवर आघात करणारा आहे, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे. ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून थेट राजकीय कार्यकर्त्यांच्या नेमणुका … Read more

पक्ष सोडणाऱ्यांसाठी दारं खुली आहेत; पायलट यांच्या बंडखोरीवर राहुल गांधींची आक्रमक भूमिका

नवी दिल्ली । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राजस्थानमधील सत्तासंघर्षावर आज मोठं वक्तव्य केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजस्थानमधील राजकीय बंडखोरीवर त्यांनी बोट ठेवलं आहे. काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांचा थेट उल्लेख टाळत राहुल गांधींनी परखड भाष्य केलं आहे. पक्ष सोडणाऱ्यांसाठी दारं खुली आहेत, त्यांना घाबरण्याची गरज नसल्याचे असं राहुल गांधी म्हणाले … Read more

ऑस्ट्रेलियाने ‘हा’ निर्णय घेत चीनला दिला मोठा धक्का; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक महिन्यांपासून ऑस्ट्रेलिया आणि चीन दरम्यान वाद सुरू आहे. या दोन्ही देशांमधील तणाव आता आणखीच वाढणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. सध्या ऑस्ट्रेलियाने चीनला धक्का देण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियन सरकार आता हाँगकाँगमधील जवळपास १० हजार नागरिकांना आपले नागरिकत्व देणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयामुळे चीनचा आता आणखीच जळजळाट होणार … Read more

आगरकरांच्या जयंतीला टिळकांचा फोटो, गोपीचंद पडळकर पुन्हा चर्चेत 

सांगली । आज गोपाळ गणेश आगरकर यांची जयंती आहे.  महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक होत. लोकमान्य टिळक आणि गोपाळगणेश आगरकर हे एकेकाळचे चांगले स्नेही होते. त्यामुळे टिळक आगरकर हे महाराष्ट्राला चांगलेच परिचित आहेत. आज गोपाळ गणेश आगरकरांच्या जयंतीच्या दिवशी चर्चा होते आहे ती भाजपाच्या गोपीचंद पडळकरांची  त्याचे कारणही असेच आहे. गोपीचंद पडळकर यांनी गोपाळ गणेश आगकरांना … Read more