निवडणुकीनंतर ठाकरे-शिंदे पुन्हा एकत्र येणार; नव्या दाव्याने राजकिय वर्तुळात खळबळ

Thackeray and shinde

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| देशातील लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. या दाव्यामध्ये त्यांनी “निवडणुक झाल्यानंतर ठाकरे-शिंदे एकत्र आल्यास आश्चर्य मानू नका” असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर, उद्धव ठाकरेंचा (Uddhav Thackeray) एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde) समझोता झाला आहे. असा खुलासा प्रकाश आंबेडकरांनी केला … Read more

कोल्हापुरात मुन्ना महाडिक विरुद्ध बंटी पाटील वाद पुन्हा पेटला

Munna Mahadik Banti Patil thumbnail

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुन्ना महाडिक विरुद्ध बंटी पाटील. कोल्हापूरच्या राजकारणात कोणतीही निवडणूक असू द्या… उमेदवार कुणीही असलं तरी खरी लढत असते ती महाडिक आणि पाटलांच्यात. आता या सगळ्याला कोल्हापूर लोकसभेची निवडणूक कशी चुकेल? काँग्रेसकडून शाहू छत्रपती विरुद्ध शिवसेनेच्या संजय मंडलिक यांच्यात खासदारकीसाठी चुरस पाहायला मिळणार असली तरी, खरी प्रतिष्ठा ही मुन्ना महाडिक आणि बंटी … Read more

सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचा बडा नेता भाजपच्या वाटेवर? आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ

prakash ambedkar satara congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचे (Satara Congress) एक बडे प्रस्थ भाजपच्या वाटेवर असून त्यांना भाजपकडून राज्यपाल पद देण्यात येणार आहे असं विधान करून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राजकीय खळबळ उडवून दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी कोणाचं थेट नाव घेतलं नसलं तरी त्यांच्या विधानाचा रोख हा माजी मुख्यमंत्री आणि … Read more

प्रकाश आंबेडकर पडद्यामागून ‘मविआ’साठी काम करतायत?? कसं ते पाहुयात

Prakash Ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ‘वंचित भाजपची बी टीम आहे’ 2019 च्या लोकसभेचा निकाल लागल्यानंतर न्यूज चॅनलपासून काँग्रेस राष्ट्रवादीतील नेत्यांनी जनरलाईज केलेलं हे स्टेटमेंट… ज्या प्रकाश आंबेडकरावर (Prakash Ambedkar) वंचितमुळे काँग्रेसच्या दहाच्या आसपास जागांवर मत विभाजनाचा फटका बसल्याचा गंभीर आरोप झाला. त्याच आंबेडकरांनी यंदाच्या लोकसभेला मविआसोबत जात भाजप विरोधात आपली ताकद जोडण्याचा प्रयत्न केला. पण चर्चा … Read more

‘वंचित’ कडून आणखी 10 उमेदवारांची यादी जाहीर; कोणत्या मतदारसंघात कोणाला तिकीट?

Vanchit Bahujan Aghadi Candidates

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) आपल्या आणखी १० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत प्रामुख्याने रायगड, जळगावउस्मानाबाद, पालघर, भिवंडी आणि मुंबईतील तीन मतदारसंघांचा समावेश आहे. वंचित बहुजन आघाडीने ट्विटर वरून आपल्या उमेदवारांची यादवी जाहीर केली आहे. या यादीत समाजातील … Read more

प्रकाश आंबेडकरांना MIM ची युतीसाठी ऑफर; महाविकास आघाडीचा खेळ बिघडणार??

prakash ambedkar imtiyaz jaleel

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखालील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन पक्षाने (AIMIM) वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर याना युतीची ऑफर दिली आहे. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्यासाठी आमचे दरवाजे केव्हाही उघडे आहेत असं म्हणत औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी हि खुली ऑफर आंबेडकर याना दिली आहे. महत्वाचे म्हणजे २०१९ च्या … Read more

वसंत मोरे ‘वंचित’च्या तिकिटावर निवडणूक लढणार? प्रकाश आंबेडकरांनी दिले संकेत

Vasant More , prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मनसेला रामराम ठोकत पक्षातून बाहेर पडलेले वसंत मोरे (Vasant More) लोकसभा निवडणुकीपूर्वी कोणती भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच त्यांनी शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांची मुंबईत जाऊन भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे आता वसंत मोरे वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करतील, असे … Read more

संजय राऊतांनी ‘वंचित’ च्या पाठीत खंजीर खुपसला; आंबेडकरांच्या ट्विटने खळबळ

prakash ambedkar sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी प्रथमच शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर सनसनाटी आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटर अकाउंट एकामागून एक असे सलग प्रश्न उपस्थित करत संजय राऊतांना थेट सवाल केलेत. सिल्वर ओक वरील … Read more

..तोपर्यंत कोणताच शब्द देता येणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा तो दावा जरांगेंनी फेटाळला

prakash ambedkar, jarange

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज वंचित बहुजन आघाडीचे (VBA) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी लोकसभा निवडणुकीसाठी 8 उमेदवारांची नावे घोषित केली आहेत. यामुळे प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष स्वातंत्र्य निवडणूक लढवेल हे स्पष्ट झाले आहे. मुख्य म्हणजे, आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी केल्याचा दावा केला … Read more

प्रकाश आंबेडकरांचा मोठा निर्णय!! अखेर ‘वंचित’ ची भूमिका जाहीर

Prakash ambedkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभा निवडणूक २०२४ साठी (Lok Sabha Election 2024) वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) महाविकास आघाडी सोबत न जाण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. पक्षाचे प्रकाश आंबेडकर यांनी आज अपत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली आहे. वंचित लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवणार आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांचा सहयोग वंचित आघाडीला मिळेल असेही प्रकाश … Read more