सरकारी बंगल्यात राहण्याच्या मुदत वाढीवरून प्रियंका गांधी केंद्रीय मंत्री यांच्यात ‘ट्विटर वॉर’

नवी दिल्ली ।  दिल्लीतील लोधी इस्टेटमध्ये काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांना देण्यात आलेल्या सरकारी बंगला खाली करण्याचा वाद वाढल्याचे दिसत आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी आणि प्रियंका गांधी यांच्यात याच मुद्द्यावर बुधवारी ट्विटर वॉर पाहायला मिळाले. ट्विटरवर प्रियंका गांधींनी, लोधी इस्टेट इथे राहण्यासाठी आणखी काही दिवस मुदतवाढ मागितल्याची गोष्ट फेटाळून लावली आहे. प्रियंका … Read more

एक अपराधी मारला गेला पण त्याला संरक्षण देणाऱ्यांचे काय? प्रियंका गांधींचा सवाल

नवी दिल्ली । गँगस्टर विकास दुबेला आज सकाळी उत्तर प्रदेश पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केलं. त्यानंतर आता या एन्काऊंटरसंबंधी राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी सुद्धा टि्वट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘गुन्हेगाराचा शेवट झाला पण गुन्हे आणि त्यांना संरक्षण देणाऱ्याचे काय?’ असा सवाल प्रियंका गांधी यांनी उपस्थित केला आहे. काल विकास … Read more

गँगस्टर विकास दुबे अटकेप्रकरणी प्रियांका गांधींनी योगी सरकारवर केला ‘हा’ आरोप

नवी दिल्ली । कानपूर पोलिस हत्याकांडातील प्रमुख आरोपी गँगस्टर विकास दुबे याला अटक केल्यानंतर काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. कानपूर येथे झालेल्या ८ पोलिसांच्या हत्येप्रकरणी प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारवर अपयशी असल्याचा आरोप केला आहे. कानपूर हत्याकांड प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही प्रियांका गांधी … Read more

कानपूर चकमकीप्रकरणी प्रियंका गांधींनी योगी आदित्यनाथांना सुनावले खडे बोल, म्हणाल्या..

लखनऊ । कानपूर चकमकीप्रकरणी विरोधकांनी योगी सरकारला चांगलेच घेरले आहे. उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे, असा आरोप काँगेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केला. उत्तर प्रदेशात गुंडांनी केलेल्या गोळीबारात ८ पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर प्रियंका गांधी यांनी संताप व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आरोपींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. प्रियंका … Read more

प्रियंका गांधी उत्तर प्रदेशमध्ये होणार शिफ्ट; दिल्लीतील घर खाली करण्याची केंद्राने दिली होती नोटीस

नवी दिल्ली । दिल्लीमधील लोधी इस्टेट मधील सरकारी बंगला रिकामा करण्यासाठी केंद्राने काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी नोटीस पाठवली आहे. ही मिळाल्यानंतर प्रियंका गांधी आता नवीन राजकीय हालचाली करण्याच्या विचारात आहेत. प्रियंकाच्या निकटवर्तीयांनी सांगितले की, प्रियंका गांधी आता उत्तर प्रदेशमध्ये शिफ्ट होतील. त्या लखनऊमधील बंगल्यात राहतील. उत्तर प्रदेश राज्यात २०२२च्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रियंका आता … Read more

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना सरकारी बंगला रिकामा करण्याचे निर्देश

नवी दिल्ली । काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांना सरकारी बंगला रिकामा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. केंद्र सरकारनं यासंदर्भात तसं पत्र प्रियंका गांधी यांना दिलं आहे. सरकारी बंगला रिकामा करण्यासाठी त्यांना एका महिन्याचा अवधी देण्यात आला आहे. त्यामुळे १ ऑगस्टपर्यंत त्यांना हा सरकारी बंगला रिकामा करावा लागणार आहे. केंद्रीय गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालयानं यासंदर्भात प्रियंका गांधी … Read more

निशस्त्र जवानांना चीनशी मुकाबला करण्यासाठी का धाडलं? प्रियंका गांधींचा मोदींना सवाल

नवी दिल्ली । भारत आणि चीन या दोन देशांमधला तणाव चांगलाच वाढला आहे. लडाखमधील गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये झालेल्या चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर हा तणाव आणखी वाढला आहे. या घटनेनंतर गलवान खोऱ्यात चीननं घुसखोरी केली नसल्याचं पंतप्रधान मोदींनी जाहीर केलं. मोदींच्या या वक्तव्यानंतर काँग्रेसने या मुद्द्यावरुन मोदी सरकारवर टीका करण्याची एकही संधी … Read more

माझ्यावर जी कारवाई करायची आहे ती करा, मी सत्य बोलतच राहीन – प्रियांका गांधी 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी या उत्तर प्रदेश सरकारला कोरोना परिस्थिती हाताळण्यास अपयश आले असल्याची टीका केली होती. त्यांच्या वारंवार होणाऱ्या टीकेमुळे भाजपा नेत्यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. याला उत्तर देताना प्रियांका गांधी यांनी आता जी कारवाई करायची आहे ती कर, मी इंदिरा गांधींची नात आहे. असे म्हंटले आहे. आपल्या ट्विटर … Read more

मी पण इंदिरा गांधींची नात आहे! कारवाई करता करा!प्रियंका गांधींचे योगींना खुलं आव्हान

नवी दिल्ली । ‘तुम्हाला जी कारवाई करायची ती करा, पण सत्य समोर आणत राहील. लक्षात ठेवा मी इंदिरा गांधींची नातं आहे अशा शब्दांत काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकारला सुनावलं आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात उत्तर प्रदेश सरकारला अपयश येत असल्याची टीका प्रियांका गांधी वारंवार करत आहेत. … Read more

हवं तर काँग्रेसनं पाठवलेल्या बसेसला भाजपचे झेंडे लावा, पण मजुरांसाठी ‘त्या’ बस सोडा

नवी दिल्ली । उत्तर प्रदेशात सध्या स्थलांतरित मजुरांना गावी परतण्यासाठी काँग्रेसकडून सोडण्यात येणाऱ्या बसेसच्या मुद्द्यावरून प्रचंड राजकारण रंगले आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आणि योगी आदित्यनाथ सरकारमध्ये खडाजंगी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर प्रियंका गांधी यांनी बुधवारी पत्रकारपरिषद घेऊन योगी सरकारवर हल्ला चढवला. ”ही वेळ राजकारणाची नसून आपण स्वत:ची जबाबदारी ओळखली पाहिजे. … Read more