प्रत्येकवेळी पेट्रोल-डिझेलचे दर वाढवून भाजपने स्वतःच्या सुटकेस भरल्या- प्रियांका गांधी

नवी दिल्ली ।  जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दराने निचांकी स्तर गाठला आहे. अशा वेळी मोदी सरकारनं इंधनवर उत्पादन शुल्क वाढवण्याच्या निर्णय घेतला आहे. त्यामुळे कच्च्या तेलात झालेल्या घसरणीचा फायदा कोणालाही मिळणार नाही. मंगळवारी रात्रीपासून पेट्रोलवर १० रूपये तर डिझेलवर १३ रुपयाचे उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. यावरून काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी भाजपावर कडाडून … Read more

उत्तर प्रदेशातील साधुंच्या हत्येनंतर राजकीय प्रतिक्रियांना सुरुवात; कोण, काय म्हणाले?

नवी दिल्ली । उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये दोन साधुंची हत्या प्रकरण समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया समोर येत आहेत. काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या घटनेचं राजकारण न करण्याचं आवाहन केलं आहे. प्रियांका गांधी यांनी या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्या कायदे-व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. … Read more

गरिबांसाठी मोबाईल सेवा फ्री करा; प्रियांका गांधींचे टेलिकॉम कंपन्यांना पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळं गरीब मोबाईल धारकांसाठी मोबाईल सेवा फ्री करा अशी मागणी काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी केली आहे. प्रियांका गांधींनी यासंबंधी टेलिकॉम कंपन्यांना एका पत्राद्वारे ही मागणी केली आहे. कोरोनाच्या संकटात महानगरातून गावाकडे निघालेल्या अनेकांचा बॅलन्स संपला आहे. अशा परिस्थितीत गोरगरीब आणि स्थलांतरितांचा विचार करत त्यांना एक … Read more

भारतात लोकशाही शिल्लक राहिली आहे का? प्रियांका गांधींचा केंद्राला सवाल

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी भारत आता लोकशाही देश राहिला आहे का ? अशी विचारणा करत केंद्र सरकारवर संताप व्यक्त केला आहे. याबाबतचे एक ट्विट प्रियंका गांधी यांनी करत केंद्र सरकारच्या जम्मू-काश्मीरबाबतच्या भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत. प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की,”गेल्या सहा महिन्यांपासून जम्मू काश्मीरच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांना […]

भाजपा सरकार रेल्वे सुद्धा विकेल; ‘कॅग’च्या रेल्वे अहवालावरून प्रियंका गांधीची टीका  

रेल्वेच्या कामगिरीबाबत कॅगने दिलेल्या अहवालावरून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वाड्रा यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

१० जनपथवरून होणार सत्तास्थापनेचा अंतिम निर्णय

सत्तास्थापनेचा चेंडू आता काँग्रेसच्या कोर्टात आहे. सध्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील १० जनपथ निवास्थानी महाराष्ट्रातील सर्व वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. शिवसेनेला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा द्यावा कि नाही याबाबत सोनिया यांच्या घरी खलबतं सुरु आहेत. अशा वेळी काँग्रेस मधील मोठा गट सत्तास्थापनच्या बाजूने आहे मात्र सोनिया गांधी शिवसेनेला पाठिंबा देण्यास प्रतिकूल आहेत अशी माहिती समोर येत आहे.

महाराष्ट्रात मोदी-शहांच्या सभांचा धुराळा ! सोनिया गांधी, प्रियांका गांधी आहेत तरी कुठे?

महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा धडाका सुरु आहे. एकीकडे भाजप – शिवसेनेला त्यांची सत्ता टिकवून ठेवायची आहे, तर दुसरीकडे ‘आघाडी’साठी ही निवडणूक त्यांचं राजकारणातील भविष्य ठरवणारी आहे. मात्र, असं असलं तरी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या प्रचारापासून दूरच आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणुकांकडे सोनिया गांधींनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे.

वारं फिरणारं ! काँग्रेस देणार मुख्यमंत्र्यांच्या विरोधात तगडा उमेदवार

मुंबई प्रतिनिधी | काँग्रेस पक्षाच्या लागलेल्या गळतीला उपाय म्हणून काँग्रेसच्या नेतृत्वाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्याचा निर्धार केला आहे. २५ सप्टेंबर रोजी प्रियांका गांधी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्या दौऱ्यावर आल्यावर मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभेचे देवेंद्र फडणवीस हे १९९९ पासून प्रतिनिधित्व करत आहेत. … Read more

भाजप नेत्याचा आरोप ; प्रियांका गांधी राहुल गांधींना राखी बांधत नाहीत

भोपाळ ( मध्य प्रदेश )|  रक्षाबंधनाच्या दुसऱ्याच दिवशी भारतीय जनता पार्टीचे आमदार विश्वास सारंग यांनी मध्य प्रदेश आणि काँग्रेस पक्षावर चांगलीच फटकेबाजी केली आहे. शुक्रवारी भोपाळमध्ये झालेल्या एका कार्यक्रमावेळी आमदार विश्वास सांरग यांनी मुख्यमंत्री कमलनाथ आणि राहुल गांधी यांच्यासह नेहरु गांधी कुटुंबावर घणाघाती टीका केली. विश्वास सारंग म्हणाले की, असा कोणताही पुरावा उपलब्ध नाही अथवा … Read more

शरद पवार आणि प्रियंका गांधी यांच्या उपस्थिती होणारा धनगर मेळावा उधळवून लावणार

पंढरपूर प्रतिनिधी | प्रियांका गांधी आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत पार पडणारा धनगर मेळावा उधळून लावण्याचा इशाला धनगर समाजाचे नेते सुभाष मस्के यांनी दिला आहे. सत्तेच्या काळात धनगर समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी काहीच केले गेले नाही त्यांनी घेतलेला हा मेळावा निवळ राजकीय फायद्याचा मेळावा आहे. त्यामुळे आम्ही हा मेळावा उधळवून देणारा आहे. अण्णा डांगे हे राष्ट्रवादीत … Read more