संविधान बचाव समितीच्या वतीन परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन

नागरिकता सुधारणा कायद्याच्या विरोधात निघालेल्या मोर्चेकऱ्यांवर चुकीच्या पध्दतीने व दडपशाही करत गुन्हे दाखल केल्याचा आरोप करित संविधान बचाव समितीच्या वतीने पोलीसांचा निषेध नोंदवत ,दाखल गुन्हे मागे घेण्यात यावेत या मागणीसाठी गुरुवार दि. ९ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले.

औरंगाबादमध्ये जेएनयू हल्ल्याचा विद्यार्थी काँग्रेसकडून तोंडाला काळ्या फिती बांधून निषेध

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ विद्यार्थी काँग्रेसतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात तोंडाला काळ्या फिती बांधून मूक आंदोलन करण्यात आले.

कराडमध्ये विद्यार्थी काँग्रेसतर्फे जेएनयु हल्ल्याचा निषेध;संघ-भाजपवर केला तुफान हल्लाबोल

जेएनयू विद्यार्थी हल्ल्याप्रकरणी देशभर या घटनेचा निषेध व्यक्त केला जात आहे. रविवारी काही तोंड झाकलेल्या गुंडांनी जेएनयूमधील विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ला करत त्यांना जबर मारहाण केली होती. या भ्याड हल्ल्याबाबत अनेक स्तरातून निषेध नोंदवला जात आहे. यायचं भाग म्हणून आज काँग्रेस पक्षातर्फे कराडमध्ये निदर्शने करण्यात आली.

सात-बारा कोरासाठी ८ जानेवारीला महाराष्ट्र बंद, राजू शेट्टींचा इशारा

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. पण अद्याप ते पूर्ण झालेले नाही. राज्याने दिलेली कर्जमाफी तकलादू आहे. सरकार कुणाचेही असो शेतकऱ्यांचे प्रश्न सुटल्याशिवाय गप्प बसणार नाही. संपूर्ण कर्जमाफी, शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधासाठी ८ जानेवारीला महाराष्ट्र बंद ठेवण्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते … Read more

अण्णा उठा ….आंदोलनाची वेळ झाली! जितेंद्र आव्हाडांचा अण्णा हजारेंना टोला

गेले काही दिवस सुरु असलेल्या सत्ता स्थापनेच्या मुद्दयांवर लवकरच पडदा पडण्याची शक्यता आहे. शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यास काँग्रेस नेतृत्वाने गुरुवारी मान्यता दिली. काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पक्षाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत शिवसेनेशी आघाडी करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे राज्यामध्ये शिवसेना- काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार येणार हे निश्चित झाले आहे. दरम्यान आता सत्ता स्थापनेच्या याच मुद्दयावरून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना टोला लगावला आहे.

महापरीक्षा पोर्टलवर घेण्यात येणाऱ्या परीक्षेला विद्यार्थ्यांचा विरोध

परभणी प्रतिनिधी। महापरीक्षा पोर्टलवरील घेण्यात येणाऱ्या परीक्षेला विरोध करण्यासाठी परभणीत शेकडो परीक्षार्थी बुधवारी रस्त्यावर आले. त्यांनी शिवाजी महाविद्यालय ते जिल्हा कचेरीपर्यंत मोर्चा काढला. परीक्षा प्रक्रिया सुलभ व पारदर्शी व्हावी या उद्देशाने जिल्हा निवड समितीमार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा महापरीक्षा या पोर्टलच्या माध्यमातून घेण्यात येत आहेत. मात्र, त्यात सुसूत्रता नसल्याने उमेदवारांना नाहक त्रास सहन करावा लागत … Read more

अकोल्यात आशा स्वयंसेविकांचे तोंडाला पट्टी बांधून आंदोलन

अकोला प्रतिनिधी | आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तोंडाला काळी पट्टी बांधून आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मूक आंदोलन करण्यात आले. राज्यातील इतर जिल्ह्यातही आशा स्वयंसेविकांनी आंदोलन छेडले आहे. आशा स्वयंसेविकांना लसीकरण, सर्व्हे, आरोग्यविषयक प्रबोधन यासह विविध ७३ प्रकारची काम करावी लागत असून, कामांच्या तुलनेत … Read more

रमाई घरकुल योजनेबाबत ‘वंचित’ आक्रमक

अकोला प्रतिनिधी | अकोला जिल्ह्यातील  महानगरपालिका, आणि इतर सहा नगरपालिकांमध्ये रमाई घरकुल योजना मागील दोन वर्षापासून रेंगाळत पडली आहे. अकोला जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजना ही व्यवस्थित राबविली जात आहे, परंतु रमाई घरकुल योजनेसाठी जिल्हा समाज कल्याण विभागातून निधीच मंजूर केला जात नाही. त्या करीता नगरपालिका आणि महानगरपालिका स्तरावरून प्रस्ताव नसल्याचे तोंडी सांगितले जात आहे. परंतु अनुसूचित … Read more

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी वंचित आघाडीचा रास्ता रोको

वाशिम प्रतिनिधी | वाशिम जिल्ह्यात मागील वर्षी दुष्काळसदृश परिस्थिती असताना जिल्ह्यातील एकमेव रिसोड तालुका आणि जऊळका मंडळात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला. मात्र आजपर्यंत दुष्काळग्रस्तांना कोणतीही मदत व शासकीय सवलतीचा लाभ मिळाला नाही. तसेच प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजने अंतर्गत मिळणारे दोन हजार रुपये न मिळालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावे. त्यासोबतच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, या … Read more

पोलिस स्टेशनमध्ये शेतकऱ्याची गांधीगिरी, ज्ञानेश्‍वरी पारायण करत केले आंदोलन

बुलढाणा प्रतिनिधी | ताट-वाटी वाजवून, दारासमोर कचरा टाकून, घंटानाद करून, रस्त्यावर घोषणा देऊन आंदोलन केल्याची विविध उदाहरणे तुम्ही पाहिली असतील. पण पोलीस स्टेशनमध्येच ज्ञानेश्वरी या ग्रंथाचं पारायण करत आपलं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याची गोष्ट तुम्हाला माहित आहे का ? सिंदखेडराजा तालुक्यातील राहेरी खुर्द गावच्या लिंबाजी विठोबा डोईफोडे या शेतकर्‍याने असेच एक आंदोलन चालू केले आहे. डोईफोडेनी त्यांच्या … Read more