मस्ती कुणाची जिरली हे महाराष्ट्रातील शेंबडं पोरं सांगेल ; आढळरावांची अजित पवारांवर वादग्रस्त टीका

पुणे प्रतिनिधी |  मस्ती तुझी जिरली , तुझ्यात हिंमत असेल तर तू माझ्या विरोधात उभा राहायचे होते. आधी तू मला आव्हान दिले , बापाचं नाव सांगणार नाही असं म्हणाला मग माझ्या विरोधात का उभा राहिला नाहीस अशी वादग्रस्त टीका अजित पवार यांच्यावर शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी करून नवीन वादाला तोंड फोडले आहे. … Read more

इंदापूरचे आमदार राष्ट्रवादीला झालेत नकोसे ?

बारामती प्रतिनिधी | आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्रित लढणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे इंदापूरची जागा राष्ट्रवादीला काँग्रेससाठी सोडावी लागणार आहे. त्या जागी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील निवडणूक लढणार असल्याचे सध्या चित्र आहे. तर इंदापूरचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्या नशिबी मात्र वनवासचं येणार का अशा देखील चर्चा आहेत. गत निवडणुकीत राष्ट्रवादी आणि … Read more

पुणे विद्यापीठ : माजी विद्यार्थ्यांनी केला ३ लाखाचा भ्रष्टाचार ; पोलिसात गुन्हा दाखल

पुणे प्रतिनिधी | विद्यार्थी कल्याण मंडळाच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या कमवा आणि शिका योजनेत १,६०० विद्यार्थी भोगास दाखवून ३ लाख ४६ हजारांचा भष्टाचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. २०१२ ते २०१९ या प्रदीर्घ काळात हा भ्रष्टाचार झाला आहे असे तपासातून उघड झाले आहे. या गुन्ह्यात तीन माजी विद्यार्थ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थी कल्याण … Read more

अजित पवार यांचा पराभव करण्यावर चंद्रकांत पाटील पुन्हा बोलले

पुणे प्रतिनिधी | पिंपरीमध्ये मी केलेले वक्तव्य हे माध्यमांनी चुकीची लावली त्यामुळे मला नेमके काय म्हणायचे होते हे माध्यमांमध्ये व्यवस्थित गेले नाही. त्यामुळे मी पुन्हा सांगतो की बारामती विधानसभा आमचे लक्ष नाही. तर २०२४ची बारामती लोकसभा हि निवडणूक जिंकणे आमचे धोरण आहे असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. अजित पवार यांचा पराभव करणे हे केवळ विधानच होऊ … Read more

पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुंवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल ; गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाने दिले होते आदेश

पुणे प्रतिनधी | सावित्रीबाई पुणे विद्यापीठाचे कुलगुरु नितीन करमरकर यांच्यावर अनुसूचित जाती/ जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ (अ‍ॅट्रॉसिटी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यापीठाच्या परिसरात असणाऱ्या मेस मध्ये वारंवार आळ्या आढळत असल्याने मुलांनी केलेल्या केलेल्या आंदोलनानंतर वादाचा भडका पेटला होता. या आंदोलनानंतर कुलगुरूंनी सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याची तक्रार चतु:श्रृगी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर संबंधित … Read more

उपवासाच्या दिवशी पाठवले बटर चिकन ; झोमॅटोला भरावा लागला ५५ हजार दंड

पुणे  प्रतिनिधी |उपवासाच्या दिवशी एकदा नव्हे दोनदा उपवासाच्या पदार्था ऐवजी बटर चिकन पाठवल्याने संतप्त झालेल्या व्यक्तीने ग्राहक न्यायालयात फिर्याद दाखल केल्याने झोमॅटो आणि संबधित हॉटले चालकाला ५५ हजार रुपयांचा दणका बसला आहे. धार्मिक भावना दुखवल्याने न्यायालयात गेलेल्या व्यक्तीच्या बाजूने न्यायालयाने निकाल दिल्याने पुण्यात या घटनेची चर्चा सर्वत्र चवीने चगळली जाऊ लागली आहे. षण्मुख देशमुख हे पुण्याचे … Read more

वंचितमध्ये फूट पाडण्यात विरोधक यशस्वी ? ; लक्ष्मण मानेंची वेगळ्या गटाची घोषणा

पुणे प्रतिनिधी | वंचित बहुजन आघाडीतून लक्ष्मण माने यांनी फारकत घेऊन नवीन वंचित बहुजन आघाडी स्थापन करण्याची घोषणा आज पुण्यात केली आहे. या घोषणे बरोबरच वंचित बहुजन आघाडीचे दोन गट पडल्याचे आज जाहीर झाले आहे. १९५७ साली झालेल्या निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या दलित चळवळीतून स्थापन झालेल्या पक्षाने लोकसभेच्या महाराष्ट्रात ७ जागा जिंकल्या. त्यानंतर तत्कालीन … Read more

Breaking | पुण्यातील दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या बिल्डरवर गुन्हा दाखल

पुणे प्रतिनिधी | पुण्यातील कोंढवा परिसरात सोमजी पेट्रोल पंपजवळ असलेल्या बहुमजली आल्कन स्टायलस सोसायटीची संरक्षक भिंत ढासळून झालेल्या अपघात बांधकामावर काम करणारे मजूर आणि त्यांचे कुटुंबीय ठार झाले आहेत. मृतांचा आकडा १६ वर गेला आहे. तर या घटनेस जबाबदार असणारे बिल्डर जगदिश अगरवाल, पंकज व्होरा यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच … Read more

पावसाच्या सरी अंगावर घेत तुकोबाची पालखी ‘लोणी काळभोर’ मुक्कामी

पुणे प्रतिनिधी | संत तुकाराम महाराजांची पालखी आज निवडुंग्या विठ्ठल मंदिर पुणे येथून पंढरपुरच्या दिशेने निघाली. सकाळी ६ वाजता आरती झाल्यानंतर पालखीने पुढील प्रवास सुरु केला. पुण्यात दोन दिवस मुक्काम केलेले वारकरी पाहते ३ वाजल्या पासूनच पुढील प्रवासासाठी सज्ज झाले होते. आरती होताच आपापल्या दिंड्या सज्ज करून वारकरी पुढील प्रवासासाठी पंढरीच्या दिशेने निघाले. पुलगेटमार्गे हडपसर येथे … Read more

धक्कादायक! गिरीश महाजनांच्या संपर्क कार्यालया बाहेर स्फोटके?

जळगाव प्रतिनिधी | भाजपचे नेते आणि जळगावचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या कार्यालयाच्या बाहेर स्फोटके आढळल्याचे समजताच जळगावात एकच खळबळ उडाली आहे. सकाळीच ठाण्यात सिद्धीविनायकाचे मंदिर उडवून देण्याची धमकी पोलिसांना मिळाली असताना या नव्या घटनेने महाराष्ट्र् हादरला आहे. स्फोटकाची माहिती मिळताच त्या ठिकाणी दहशतवादी विरोधी पथकाचे बॉम्ब निकामी करण्याचे अधिकारी दाखल झाले आहेत. गिरीश महाजन यांनी या … Read more