पुणे रेल्वे स्थानकात ट्रेन रुळावरून घसरली; घटनास्थळी कर्मचारी दाखल

पुणे | पुणे रेल्वे स्थानकात डेमु ट्रेन रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. सकाळी साडे नऊ वाजता ही घटना घडली. यार्ड मधून बाहेर येत असताना रेल्वेचे 2 डबे घसरले. घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक माहितीनुसार, ही रेल्वे दौंडच्या दिशेने जात होती त्यावेळी ही घटना घडली आहे. डेमू रेल्वेचे काही डबे रुळावरुन … Read more

पुणे जिल्हा बँक निवडणूकीत महाविकास आघाडीचा डंका; 20-1 ने सत्ता काबीज

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या  निवडणूकीत महाविकास आघाडीचा डंका पाहायला मिळाला. 21 जागांसाठी लागलेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीने 20 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. तर भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विजयानंतर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली, जिल्हा बँकेत झालेला विजयाने … Read more

पुण्यात राष्ट्रवादीकडून शिवसेना संपवण्याचं काम सुरू; माजी खासदाराचा गंभीर आरोप

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिवसेना , राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यात महाविकास आघाडी स्थापन झाली असली तरी स्थानिक पातळीवर मात्र तिन्ही पक्षात काही आलबेल नसल्याचे वेळोवेळी पाहायला मिळाले आहे. त्यातच आता शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस वर गंभीर आरोप केला आहे. पुण्यात राष्ट्रवादी कडून शिवसेना संपवण्याचे काम सुरु आहे असे आढळराव … Read more

पुण्याचे पाणी कमी करणाऱ्यांना पुणेकरच पाणी पाजतील- फडणवीस

Devendra Fadanvis

पुणे | पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापलं आहे. याच दरम्यान पुण्याच्या पाणी प्रश्नावरून भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकार वर निशाणा साधला आहे. पुण्याचे पाणी कमी करणाऱ्यांना पुणेकरच पाणी पाजतील अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. भाजप कार्यालयाच्या उद्घाटनासाठी फडणवीस पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि खास करुन … Read more

‘नॅशनल चिकन डे’निमित्त ‘या’ दिवशी स्वस्त दरात होणार चिकनचे वितरण

पुणे | भारतीय कुक्कुटपालनाचे जनक पद्मश्री डॉ. बी. व्ही. राव यांच्या जन्मदिनानिमित्त देशव्यापी जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून उद्या मंगळवारी (१६ नोव्हेंबर) ‘नॅशनल चिकन डे’ साजरा केला जाणार आहे. या चिकन डे निमित्त विविध उपक्रम आयोजिले असून, सवलतीच्या दरात चिकनचे वितरण केले जाईल, अशी माहिती पोल्ट्री फार्मर्स अँड ब्रीडर्स असोसिएशनचे अध्यक्ष सी. वसंतकुमार … Read more

पुण्यात 20 तारखेपर्यंत जमावबंदी लागू ; ‘हे’ आहे कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अमरावती, नांदेड, मालेगाव, पुसद, कारंजा या ठिकाणी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ नुसार १४४ कलम अन्वये प्रतिबंधात्मक निर्बंध लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्र येण्यास पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश १४ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर रोजी रात्री १२ … Read more

अभिनेत्री कंगणा राणावतच्या विरोधात महिला काँग्रेसचं जोरदार आंदोलन

पुणे | अभिनेत्री कंगणा राणावतने भारतीय स्वातंत्र्याविषयी केलेल्या संतापजनक विधानाविरोधात पुणे शहर महिला काँग्रेसच्या वतिने आज राणी लक्ष्मीबाई पुतळ्यासमोर जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले. पुणे शहराध्यक्ष मा. रमेश बागवे, प्रदेश उपाध्यक्ष मा. मोहन जोशी, प्रदेश सरचिटणीस मा. दिप्ती चवधरी,भूषण राणभरे,अजित जाधव, द.स. पोळेकर,रमेश अय्यर,राहुल सोनवणे, उपस्थित होते. यावेळी बोलताना महिला काँग्रेसच्या अध्यक्षा व प्रदेश सचिव … Read more

पुणेकरांसाठी मोठी बातमी!! गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पुणेकरांसाठी महत्त्वाची माहिती समोर येत आहे. गुरुवारी म्हणजेच २१ ऑक्टोबरला संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. स्थापत्य विषयक दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने ही माहिती दिली आहे. तसेच शुक्रवारी (दि. 22) शहरात उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने कळविण्यात … Read more

उपविभाग प्रमुखपदी शिंदे यांची निवड

पुणे | शिव सेना पर्वती मतदारसंघ उपविभाग प्रमूख पदी अतुल शिंदे यांची निवड करण्यात आली. शहर प्रमूख नेते गजानन भटकूडे, संजय मोरे यांनी शिंदे यांच्याकडून सामाजिक कार्याची दखल घेत निवडीचे प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी रवींद्र मेर्लेकर, नगरसेवक बाळा ओसवाल यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

अल्पउत्पन्न धारकांसाठी लसीकरण कार्यक्रम

पुणे  | सेवा व सहयोग अभियान अंतर्गत अल्पउत्पन्न धारक नागरिकांसाठी कोव्हिशिल्ड लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महर्षी नगर परिसरातील गुलटेकडी औद्योगिक वसाहत आरोग्य कोठीत लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन केले. वसाहतील अनेक नागरीकांनी आभार व अभिनंदन केले. सदर कार्यक्रमाचे उद्घाटन व भारत मातेचे प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन महेश करपे, दर्शन मिरासदार यांनी केले. यावेळी डॉ. प्रसाद … Read more