अजितदादांकडून पोलिसांचं कौतुक; म्हणाले, ‘तुमचा अभिमान वाटतो’

पुणे । मागील ३ महिन्यांपासून अविश्रांत काम करणाऱ्या पोलीस दलाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कौतुक केले. पुणे शहर पोलीस आयुक्तालयात पोलिसांनी लॉकडाऊन काळात केलेल्या कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे सादरीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर करण्यात आले. यावेळी अजित पवार यांनी म्हटले की, जवळपास तीन महिने झाले तुम्ही सतत ड्युटीवर आहात. गणेशोत्सव, दिवाळी, मोहरम यादरम्यान ड्युटी केल्यानंतर आराम … Read more

पुण्यात ४७ कोटी रुपयांच्या नकली नोटा जप्त; आर्मी जवानासह ६ जणांना अटक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बनावट नोटांचा कारभार करणारे एक रॅकेट नुकतेच पुणे येथे उघडकीस आले आहे. बुधवारी “चिल्ड्रेन्स बँक ऑफ इंडिया”च्या नावाची डमी बिले आणि यूएस डॉलरसह सुमारे ४७ कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिस उपायुक्त (गुन्हे शाखा) बच्चन सिंह यांनी याविषयी सांगितले की, या प्रकरणात भारतीय सैन्याच्या एका शिपायासह सहा जणांना … Read more

गावी जाण्याकरिता पाससाठी केलेल्या अर्जात खोटी माहिती देणं भोवलं; ११ जणांवर गुन्हा दाखल

पुणे । मुंबईतून मूळ गावी जाण्यासाठी पुणे पोलिसांकडे डिजिटल पाससाठी केलेल्या अर्जात खोटी माहिती दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी ११ जणांवर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मुंबईत राहणाऱ्या या ११ जणांना कोकण, सातारा, सांगलीत जायचे होते. मात्र, मुंबई आणि ठाणे पोलिसांकडून प्रवासासाठी डिजिटल पास मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी मुंबई ते पुणे … Read more

पुण्यात येण्यासाठी आणि पुण्यातून बाहेर जाण्यासाठी पासची गरज? पहा काय म्हणतायत पुणे पोलीस

पुणे । केंद्र सरकारने १ जूनपासून पाचच्या टप्प्यातील संचारबंदी सुरु केली आहे. या संचारबंदीमध्ये अनेक नियम शिथिल करण्यात आले आहेत. तसेच राज्यांना हे नियम राबविण्यासंदर्भात स्वातंत्र्य देण्यात आले आहे. महाराष्ट्र सरकारने नियम शिथिल केले असले तरी केंद्र सरकारच्या सर्व नियमांना संमती दिली नाही आहे. अद्याप राज्यात संचारबंदीचे नियम पाळले जाणार आहेत. पुण्यात बारामती, इंदापूर आणि … Read more

पुणेकरांनो लाॅकडाउनमध्ये घरमालकांवर गुन्हे दाखल करताय? हे वाचा

पुणे । कोरोना संसर्गामुळे देशव्यापी संचारबंदी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे देशातील अनेक उद्योग व्यवसाय बंद होते. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने भाडेतत्वावर राहणाऱ्या लोकांना सूट दिली होती. मात्र आता घरमालकांनी थकीत भाड्यासाठी मागणी सुरु केली आहे. यावरून मालक व भाडेकरू यांच्यामध्ये वाद होत आहेत. घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील हे वाद सामंजस्याने सोडविण्याची गरज असल्याचे असोसिएशन … Read more

पुण्यात कोरोनाबाधित कॉन्स्टेबलचा मृत्यू; पुणे पोलीस दलातील दुसरा बळी

पुणे । कोरोनाच्या लढाईत पुणे पोलीस दलाला आज दुसरा धक्का बसला आहे. पुणे पोलीस दलातील वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या ४३ वर्षीय पोलीस कॉन्स्टेबलचा आज करोनानं मृत्यू झाला. पुणे पोलीस दलातील हा दुसरा बळी ठरला आहे. १० मे पासून त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाबाधित पोलीस कॉन्स्टेबलला एका खासगी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर … Read more

कोरोना पार्श्वभुमीवर पुण्याच्या महापौरांनी राज्य सरकारकडे केली ‘ही’ महत्वाची मागणी

पुणे । देशभरात कोरोना बाधितांची संख्या वाढते आहे. तुलनेने महाराष्ट्रातील रुग्ण अधिक वाढत आहेत. त्यातही पुणे, मुंबई या दोन शहरातील रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे यंत्रणेवरचा ताण वाढतो आहे. पुणे शहरात रोज मोठ्या प्रमाणात स्वॅब तपासणीसाठी घेतले जात आहेत. मात्र वाढत्या चाचण्यांमुळे स्वॅब तपासणीचे अहवाल उशीरा येत आहेत. म्हणून पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी राज्य … Read more

पुण्यात दारू विक्री करणाऱ्या युवकाचा कोरोनामुळं मृत्यू; प्रशासन संपर्कात आलेल्यांच्या शोधात

पुणे । येरवड्यातील ‘हॉटस्पॉट’ परिसरात रात्रभर दारू विक्री करणाऱ्या युवकाचा सोमवारी रात्री कोरोनामुळे मृत्यू झाला. या घटनेने पोलिसांसह येरवडा क्षेत्रीय अधिकाऱ्यांची झोप उडाली असून संबंधित युवकाने किती जणांना दारू विक्री केली याची माहिती मिळणे अवघड झालं आहे. दरम्यान, या युवकाच्या कुटुंबातील सर्वांना क्वॉरंटाईन केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पर्णकुटी पोलिस चौकीच्या हद्दीतील हॉटस्पॉटच्या ठिकाणी राहत असलेला … Read more

धक्कादायक! पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस कोठडीतील आरोपीला कोरोनाची लागण

पुणे । पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूचा फैलाव वाढला असून कोरोनाने आता पोलीस कोठडीतील आरोपीपर्यंत मजल मारली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यात आरोपीला कोरोनाची बाधा झाल्याचं धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. ही माहिती समोर येताच या आरोपीच्या संपर्कात आलेल्या सर्व पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना रुग्णालयात नेण्यात आलं होत अशी माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. … Read more

लॉकडाऊन लग्न! चक्क बाप म्हणून पोलिसांनीच केलं कन्यादान

पुणे । सध्या संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोनाच्या उद्रेकामुळं राज्यासह देशात लॉकडाऊन लागू आहे. लॉकडाऊनचा दुसरा टप्पा पूर्ण होण्याच्या एकदिवसआधीच लॉकडाऊनमध्ये आणखी दोन आठवड्यांची वाढ करण्यात आली. या वाढत्या लॉकडाउनच्या कालावधीचा सर्वात जास्त भावनिक फटका कोणाला बसत असेल तर तो म्हणजे लग्न जमलेल्या जोडप्यांना. लॉकडाउनच्या कालावधीत सर्व काही बंद त्यात सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी … Read more