परदेशी आईचा मुलगा राष्ट्रभक्त होऊ शकत नाही; भाजप खासदाराची राहुल गांधींवर टीका

राहुल गांधींनी केलेल्या विधानाचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे. ज्या पक्षाच्या अध्यक्ष स्वतः महिला आहेत, त्यांच्या मुलानं असं विधान करणं त्यापेक्षा दुर्दैवं ते काय?. तसेच राहुल गांधींच्या विधानानं मी दुःखी असल्याचंही राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे

‘रेप इन इंडिया’वर राहुल गांधी ठाम; मोदींच्या ‘दिल्ली रेप कॅपिटल’ विधानाचा दाखला

Rahul gandhi supreem court

उन्नाव आणि हैद्राबाद मध्ये घडलेल्या अमानुष घटनेनंतर देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. याच मुद्द्याला धरून आज संसदेत मोठा गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी या मुद्द्यावर भाष्य करताना रेप इन इंडिया असे वाक्य वापरले आहे.

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हा भारतीय संविधानावरील हल्ला- राहुल गांधी

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नागरिकत्व विधेयकावर नाराजी व्यक्त करत समर्थन करणाऱ्यांवर टीका केली आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हा भारतीय संविधानावरील हल्ला आहे अशा शब्दांत राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

पी.चिदंबरम यांना केलेली अटक ही सूडबुद्धीतून केलेली कारवाई होती- राहुल गांधी

आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आज सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. पी. चिदंबरम यांनी चौकशीला सहकार्य करावं आणि देश सोडून जाऊ नये या दोन अटींवर त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. पी. चिदंबरम यांना जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर काँग्रेसने ट्विट करत नेहमी सत्याचाच विजय झाला असल्याचे सांगितले आहे.

राहुल गांधींवरून राजकारण पेटलं, देशाची माफी मागण्यावरून भाजप आक्रमक

राफेल प्रकरणात राहुल गांधी यांनी जनतेची माफी मागावी. अशी मागणी करत ठाण्यात भाजपच्या वतीने राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला आहे. सुप्रीम कोर्टात राफेल बाबत कोर्टानं निकाल दिल्यानंतर राहुल गांधींच्या चौकीदार चोर है याविधायावरून भाजपने पुन्हा एकदा राजकारण तापवलं आहे.

चौकीदार चोर है ! या विधानावर राहुल गांधींचा माफीनामा

आज सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अवमान प्रकरणात कोर्टाने आपला निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांनी चौकीदार चोर है असे वक्तव्य केलं होत. या वक्तव्यावर कोर्टाने राहुल गांधी यांना माफ करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच न्यायालयाने राफेल प्रकरणातील पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. यासह शबरीमाला मंदिराचा निकाल देणाऱ्या कोर्टाने तो एका मोठ्या खंडपीठाकडे सुपूर्द केला आहे.

प्रचारानंतर राहुल गांधी उतरले थेट क्रिकेटच्या मैदानात, केली तुफान फटकेबाजी!

राहुल गांधी यांनी हरयाणातील रेवाडी या ठिकाणी तिथल्या मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. राहुल गांधी सध्या हरयाणा येथे प्रचार करत आहेत. प्रचारासाठी जात असताना राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लॅन्डिग करावं लागलं. केएलपी कॉलेज या ठिकाणी हेलिकॉप्टर तातडीने उतरवण्यात आलं. त्यामुळे राहुल गांधी यांनी तिथल्या मुलांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.

शेम्बड पोरगंसुद्धा सांगेल, सरकार येणार तर महायुतीचच; फडणवीसांकडून विरोधकांची खिल्ली

लढाई जवळ आल्यानंतर माघार घेणाऱ्या सेनापतीसारखी अवस्था राहुल गांधींची आहे. लोकसभेला लिहून घेतलेलं भाषणच ते विधानसभेला बोलत असून पक्षातील नेत्यांनीच आत्मपरीक्षणाचा सल्ला दिला असल्यामुळे काँग्रेसचं काही खरं नसल्याची टीका फडणवीस यांनी केली. राष्ट्रवादी पक्षात आता कुणी थांबायलाच तयार नसल्याचा शालजोडाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी लगावला.

‘राहुल गांधींच्या सभा भाजपच्या जागा वाढवतात’, मुख्यमंत्र्यांचा राहुल गांधींना उपरोधिक टोला

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना विधानसभा निवडणुकीचा प्रचार करताना पाहून मला आनंद झाला. कारण राहुल गांधी जेव्हा प्रचार सभा घेतात. तेव्हा काँग्रेसच्या जागा कमी होतात. आणि भाजपच्या जागा वाढतात. असा उपरोधिक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वेचे भाजप सेना महायुतीचे उमेदवार प्रताप अडसड यांच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री बोलत होते.

‘आधे इधर जाओ, आधे उधर जाओ’ – शरद पवारांची अवस्था शोले चित्रपटातल्या जेलरसारखी; मुख्यमंत्री फडणवीसांची बोचरी टीका

एकीकडे राहुल गांधी बँकॉकला निघून गेलेत, तर शरद पवारांची अवस्था आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पिछे आओ अशी झाली असून त्यांच्यासोबत आता कुणीच नाही असंही फडणवीस पुढे म्हणाले.