Sunday, April 2, 2023

परदेशी आईचा मुलगा राष्ट्रभक्त होऊ शकत नाही; भाजप खासदाराची राहुल गांधींवर टीका

- Advertisement -

टीम, HELLO महाराष्ट्र। काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत केलेल्या “रेप इन इंडिया’ या विधानावरून चांगलेच वादंग पेटले आहे. राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी भाजपकडून करण्यात आली होती. परंतु राहुल यांनी माफी मागण्यास नकार दिल्याने भाजपकडून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. ‘परदेशी आईचा मुलगा हा कधीही राष्ट्रभक्त होऊ शकत नाही’. असं म्हणत भाजप खासदार संजय जयस्वाल यांनी राहुल गांधींवर जोरदार टीका केली आहे.

विष्णुगुप्त चाणक्य यांनी २ हजार वर्षांपूर्वी केलेल्या विधानाचा हवाला देत जयस्वाल यांनी राहुल गांधींना लक्ष्य केलं आहे. दरम्यान 2000 वर्षांपूर्वी विष्णुगुप्त चाणक्य यांनी म्हटलं होतं की, परदेशी आईचा मुलगा हा कधीही राष्ट्रभक्त होऊ शकत नाही. राहुल गांधींनी जसा मोदींच्या विधानाचा दाखल दिला त्या प्रमाणेच भाजपकडून हा दाखल देत राहुल गांधींना घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे.

- Advertisement -

जयस्वाल म्हणाले की, राहुल गांधींनी केलेल्या विधानाचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे. ज्या पक्षाच्या अध्यक्ष स्वतः महिला आहेत, त्यांच्या मुलानं असं विधान करणं त्यापेक्षा दुर्दैवं ते काय?. तसेच राहुल गांधींच्या विधानानं मी दुःखी असल्याचंही राजनाथ सिंह यांनी सांगितलं आहे. तर असं विधान करणाऱ्या नेत्याला संसदेचा सदस्य राहण्याचा नैतिक अधिकार नसल्याच निर्मला सीतारामण म्हणाल्या आहेत.