महाराष्ट्रात येत्या ३ दिवसांत मान्सुन येणार

मुंबई | मान्सूनचं भारताच्या दक्षिणपश्चिम भागात आगमन झालं आहे. कर्नाटक, तामिळनाडू, रायलसीमा भाग, आंध्रप्रदेशचा काही हिस्सा, बंगालचा उपसागर या भागांमध्ये मान्सूनच्या हलक्या सरी कोसळल्या आहेत. याशिवाय ईशान्य भारतातही पावसाला सुरुवात झाली आहे. निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर महाराष्ट्रातील वातावरणीय परिस्थिती मात्र काही अंशी पूर्ववत होत असून महाराष्ट्रातही येत्या २ ते ३ दिवसांत पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली … Read more

पुण्यात पुढचे २४ तास काळजीचे; वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

पुणे । गेले दोन दिवस चर्चेत असणारे ‘निसर्ग’ हे चक्रीवादळ आज महाराष्ट्रात येऊन धडकले आहे. अरबी समुद्रातून आलेले हे चक्रीवादळ आज दुपारी महाराष्ट्रातील अलिबाग पासून ५० किमी असणाऱ्या किनारपट्टीवर धडकले. शहर आणि परिसरात गेल्या २४ तासात संथ सारी कोसळत आहेत. दुपारी जोराच्या वाऱ्यासह पाऊस पडला होता. पुढच्या २४ तासात वादळी वाऱ्यासह संततधार कोसळण्याची शक्यता असल्याचे हवामान … Read more

‘निसर्ग’ चक्रीवादळाची रायगड किनारपट्टीकडे वेगवान कूच 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अरबी समुद्रातील निसर्ग हे चक्रीवादळ आता वेगाने पुढे सरकत आहे. या वादळाने त्याचे रौद्र रूप धारण केले असून  खात्याने सॅटेलाईट द्वारे काढलेले छायाचित्र प्रसिद्ध  केले आहे. हे वादळ हवामान खात्याने अंदाज दर्शविल्याप्रमाणे ताशी ११० ते १२० किमी वेगाने रायगड च्या किनारपट्टीवर दुपारी १ ते ४ च्या दरम्यान धडकण्याची शक्यता आहे.  भूपृष्ठावर आल्यानंतर … Read more

केरळात मान्सूनचे आगमन; राज्यात कधी?

मुंबई । भारतात मान्सूनचं आगमन झालं असून केरळ किनारपट्टीवर धडक दिली आहे. भारतीय हवामान खात्याचे संचालक मृत्यूंजय मोहपात्रा यांनी पीटीआयशी बोलताना ही माहिती दिली आहे. भारतात जून ते सप्टेंबर या चार महिन्यात ७५ टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याआधी हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या स्कायमेटने ३० मे रोजी मान्सूनचं आगमन झाल्याचं जाहीर केलं होतं. पण भारतीय … Read more

राज्याच्या ‘या’ भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता

पुणे । भारतीय हवामान खात्याने पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये ३ जून आणि ४ जून रोजी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) या भागासाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट दिला आहे. रेड अलर्ट भागामध्ये अतिमुसळधार तर ऑरेंज अलर्टमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. दुसरीकडे १ जूनलाही काही भागात … Read more

मान्सून केरळमध्ये दाखल, आता पाऊस पडणार – Skymet Weather

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मान्सून आणि हवामानाविषयी माहिती देणारी खासगी एजन्सी स्कायमेटने सांगितले आहे की,’ दक्षिण पश्चिम मान्सून आपल्या नियोजित वेळेपूर्वी म्हणजेच ३० मे रोजी केरळला पोहोचला आहे. भारतीय हवामान खात्याने या आठवड्यातच सांगितले होते की, यावेळी मान्सून १ जूनला केरळ किनारपट्टीवर धडकणार आहे. हवामान खात्याने गुरुवारी आपला हा अंदाज बदलला. आयएमडीने सांगितले की,’ सध्याच्या … Read more

विदर्भात मान्सून वेळेवरच दाखल होणार ; हवामान खात्याचा अंदाज

अमरावती प्रतिनिधी l बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले वादळ मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी फायदेशीर असल्याचा अंदाज अमरावतीच्या हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे यंदा विदर्भात वेळेवर मान्सून येण्याची शक्यता असल्याने शेतकरी राजा पेरणीस सज्ज झाला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले वातावरण मान्सूनच्या वाटचालीकरिता पोषक आहे. आगामी काही दिवसात असेच वातावरणात कायम राहिल्यास केरळच्या किनारपट्टीवर 5 जून रोजी मान्सून … Read more

कोरोना संकटात १६ मे ला अम्फान चक्रिवादळाचे संकट; मच्छिमारांना समुद्रात न जाण्याच्या सुचना

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय हवामान खात्याने १६ मे रोजी संध्याकाळी नैऋत्य आणि लगतच्या पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ येण्याचा अंदाज वर्तविला आहे. आयएमडीने म्हटले आहे की दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र बनले आहे. त्यामुळे पुढील १२ तासांत ते ऍक्टिव्ह बनेल, म्हणूनच १६ मे रोजी संध्याकाळी ते चक्रीवादळात बदलण्याची शक्यता आहे. थायलंडने दिलेल्या या वादळाचे … Read more

केरळमध्ये मान्सून यायला ४ दिवस उशीर; ‘या’ कारणामुळे यंदा पाऊस होणार लेट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नैऋत्य मान्सूनची प्रतीक्षा आता सुरू झाली आहे. दरम्यान, यावर्षी मान्सूनला केरळमध्ये यायला चार दिवस उशीर होऊ शकेल, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिली आहे. याबाबत माहिती देताना हवामान खात्याने शुक्रवारी सांगितले की, केरळमध्ये नैऋत्य मान्सूनची सुरूवात यंदाच्या १ जूनच्या तारखेपासून थोड्या वेळानंतर होण्याची शक्यता आहे. यावर्षी ५ जूनपासून केरळमध्ये मान्सूनला … Read more

मान्सून केरळमध्ये २८ मे रोजी पोहोचणार तर महाराष्ट्रात कधी ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात यावर्षी मान्सून कदाचित वेळेआधीच दाखल होऊ शकेल. स्कायमेट या खासगी कंपनीने मान्सून आणि हवामानाबाबतची माहिती दिली आहे. यावर्षी मान्सून हा १ जूनऐवजी २८ मे पर्यंत केरळच्या किनारपट्टीवर पोहोचू शकतो. या एजन्सीच्या म्हणण्यानुसार यावेळी मान्सून त्याच्या निर्धारित वेळेच्या ४ ते ५ दिवस आधीच अंदमानच्या समुद्रात येऊ शकेल. देशाच्या अधिकृत हवामान कार्यालयाच्या … Read more