शेतकरी अडचणीत : महाबळेश्वर, जावळीत पावसाच्या माऱ्याने स्ट्राॅबेरी शेताच्या बांधावर फेकली

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना जबर फटका बसला आहे. या पावसाच्या माऱ्यामुळे सडलेली आणि नरम पडलेली स्ट्रॉबेरी अक्षरशः बांधावर फेकून द्यावी लागली आहे. महाबळेश्वरच्या शिवारात सध्या स्ट्राॅबेरीचा सिझन चालू आहे, मात्र अवकाळीच्या तडाख्याने स्ट्राॅबेरी फेकून देण्याची वेळ उत्पादकांवर आलेली आहे. महाबळेश्वरच्या शिवारात फिरताना सध्या स्ट्रॉबेरीचा खच पडलेला … Read more

पाच हजार कुटुंबाना आधार : नुकसानग्रस्त ऊसतोड मजुरांच्या मदतीला कृष्णा कारखाना धावला..!

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  अवकाळी पावसाच्या तडाख्याने पश्चिम महाराष्ट्रात ऊसतोड मजुरांची मोठी दैना झाली आहे. सलग तीन दिवस मुसळधार पाऊस पडत असल्याने ऊसतोड मजुरांच्या खोपटात पाणी शिरले असून, संसारोपयोगी साहित्यासह अन्नधान्याचेही नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. अशा अडचणीच्या काळात कृष्णा कारखाना नुकसानग्रस्त ऊसतोड मजुरांच्या मदतीला धावला आहे. कारखान्यामार्फत जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप कृष्णा बँकेचे … Read more

औरंगाबादेत ठिकठिकाणी ढगाळ वातावरणासह रिमझिम पाऊस

Aurangabad Rain

औरंगाबाद – काल सायंकाळपासून औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून गारठा पसरला आहे. शहरात रिमझिम पाऊस होत आहे. ग्रामीण भागात टाकाळी राजेराय, बाबरा, पाचोड, विहामांडवा, बालानगर येथे हलक्याशा सरी बसरल्या आहेत. गंगापूर तालुक्यातील लिंबेजळगाव येथील बसस्थानक परिसरात जोरदार पाऊस झाला. दुसरीकडे कायगाव परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा कांदा, कापसाला बसल्याने नुकसान झाले आहे. तसेच जनजीवन विस्कळीत … Read more

मराठवाड्यात तीन दिवस पावसाची शक्यता 

Heavy Rain

औरंगाबाद – मुंबई येथील प्रादेशिक हवामान केंद्राच्या वतीने व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजानुसार आज, उद्या आणि गुरुवारी या तीन दिवसात मराठवाडा विभागातील विविध ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असल्याची माहिती परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या ग्रामीण कृषि मौसम सेवा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. यामध्ये आज मराठवाडा विभागातील औरंगाबाद, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात … Read more

हवामानाच्या अचूक अंदाजसाठी सी.बँड रडार बसविण्यास परवानगी

औरंगाबाद – औरंगाबादेत हवामानाच्या अचूक अंदाजसाठी सी बँड रडार डॉपलर बसविण्यास संदर्भात केंद्र सरकारच्या पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाने परवानगी दिली आहे. या संदर्भात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी तत्कालीन पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी चर्चा करून, सी बँड डॉपलर रडार संदर्भात आग्रही मागणी व त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. केंद्रीय पृथ्वी आणि विज्ञान … Read more

मराठवाड्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस; रब्बी पिकाला दिलासा

Raina

औरंगाबाद – मागील दोन दिवसांपासून मराठवाड्यातील वातावरणात बदल झाला असून अनेक ठिकाणी कमी जास्त प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे रब्बी पिकांना विशेषतः हरभरा या पिकांना फायदा होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी चांगला पाऊस झाला तर काल सायंकाळी शहरातही पावसाचा शिडकावा झाला. तसेच औरंगाबादसह मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई, केज, माजलगाव … Read more

महागाईचा फटका – टोमॅटोची किंमत 100 रुपयांच्या जवळ पोहोचली, कांद्याची किंमत काय आहे ते जाणून घ्या

नवी दिल्ली । सणासुदीच्या काळात भाजीपाला विशेषत: टोमॅटो आणि कांद्याच्या किंमतीत खूप वाढ दिसून येत आहे. राजधानी दिल्लीसह अनेक शहरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून त्यांची किंमत लक्षणीय वाढली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, अवकाळी पावसामुळे पिके खराब झाल्याच्या बातम्यांमुळे आणि मंडईंमध्ये आवक मंदावल्याने सोमवारी महानगरांमध्ये टोमॅटोचे किरकोळ दर 93 रुपये प्रति किलोवर पोहोचले. मेट्रो शहरांमध्ये सोमवारी कोलकातामध्ये टोमॅटो … Read more

जायकवाडीचे आपात्कालीन दरवाजे तिसऱ्यांदा उघडले

jaykwadi dam

औरंगाबाद – स्थानिक पाणलोट क्षेत्रातील विविध ठिकाणी सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे मंगळवारी दुपारनंतर स्थानिक नाथसागरात येणारी आवक वाढत गेल्याने दिवसभरात जायकवाडी धरणातून होणारा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवावा लागला. काल रात्री धरणाचे आपत्कालीन दरवाज्यांसह सर्व दरवाजे चार फुटांपर्यंत वर उचलून गोदापात्रात 80 हजार 172 क्युसेक विसर्ग वाढविण्यात आला. धरणात येणारी आवक लक्षात घेऊन विसर्ग कमी-जास्त करण्यात येईल … Read more

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे तब्बल 845 कोटींचे नुकसान

Heavy Rain

औरंगाबाद – मराठवाड्यात गुलाब चक्रीवादळामुळे झालेल्या तुफानी पावसाने सर्वत्र हाहाकार उडवून दिला आहे. यापावसामुळ सर्व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाने दहा लाखापेक्षा अधिक हेक्टरवरील पीकांचे नुकसान केले आहे याशिवाय जीवित आणि वित्त हानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. या नुकसानीतुन मराठवाड्याला सावरण्यासाठी सुमारे 845 कोटी 79 लाख रूपयांच्या मदतीची गरज असल्याचा प्राथमिक अहवाल तयार … Read more

‘गुलाब’ चक्रीवादळाने औरंगाबाद शहराला झोडपले

औरंगाबाद – गेल्या दोन दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रिवादळामुळे काल व आज मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने झोडपून काढले. गुलाब चक्रिवादळामुळे आज दि. २८ सप्टेंबर २०२१  रोजी औरंगाबाद शहरावर पहाटे १२:१० ला सुरू झालेल्या मुसळधार पावसाने सुरुवात झाली. पहाटे तीन दरम्यान पावसाने रौद्र रूप धारण केले त्यावेळेस एमजीएम जेएनईसी वेधशाळेत पावसाचा … Read more