औरंगाबादेत ठिकठिकाणी ढगाळ वातावरणासह रिमझिम पाऊस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – काल सायंकाळपासून औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून गारठा पसरला आहे. शहरात रिमझिम पाऊस होत आहे. ग्रामीण भागात टाकाळी राजेराय, बाबरा, पाचोड, विहामांडवा, बालानगर येथे हलक्याशा सरी बसरल्या आहेत. गंगापूर तालुक्यातील लिंबेजळगाव येथील बसस्थानक परिसरात जोरदार पाऊस झाला.

दुसरीकडे कायगाव परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा कांदा, कापसाला बसल्याने नुकसान झाले आहे. तसेच जनजीवन विस्कळीत झाले असून ऊसतोड कामगारांचे हाल होत आहेत. आडूळसह परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सतत ढगाळ वातावरणानंतर आज सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली.

याचा फटका तूर, कपाशीसह इतर पिकांना बसू शकतो. जिल्ह्यातील नागापूर येथील आठवडे बाजारात बुधवारी (ता.एक) रिमझिम पाऊस व गारठा वाढल्याने व्यापारी व ग्राहकांची तारांबळ झाल्याचे पाहायला मिळाले.

Leave a Comment