पावसाचा कहर ! दरड कोसळल्याने गौताळा घाटात वाहतूक विस्कळीत

darad

औरंगाबाद – प्रसिद्ध वन्य अभयारण्य असलेल्या गौताळा घाटात नागद ते कन्नड मार्गावर म्हसोबा हुडीजवळ पहिल्याच वळणावर दरड कोसळली आहे. यामुळे या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. या ठिकाणी पहिल्या हुडीपासून ते दुसऱ्या वळणापर्यंत धोकादायक रस्ता झाला आहे. यामुळे अनेक ठिकाणी मोठी दगडे वर अडकली आहेत. तसेच अनेक दरडी कोसळण्याची शक्यता आहे. तर वनविभागाच्या कक्ष क्रमांक … Read more

बाधित भागातील ग्रामस्थांना तत्काळ सर्व सोयी सुविधा द्या – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

collector

औरंगाबाद – कन्नड तालुक्यातील सात मंडळांमध्ये मोठ्याप्रमाणात अतिवृष्टीने नुकसान झालेले आहे. नुकसान झालेल्या बाबी, सोयी सुविधा तत्काळ दुरुस्त कराव्यात, आवश्यक त्या ठिकाणी नवीन बाबींचा समावेश करावा. बाधित झालेल्या भागातील नागरिकांची गैरसोय होणार नाही, या दृष्टीने सर्व त्या उपाययोजना कराव्यात, ग्रामस्थांना सोयी सुविधा तत्काळ द्याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज अधिकाऱ्यांना केल्या. अतिवृष्टीमुळे झालेल्या … Read more

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

pahni

औरंगाबाद – कन्नड तालुक्यातील महसूल मंडळापैकी 7 मंडळात अतिवृष्टी झाली.अतिवृष्टीमुळे मोठ्याप्रमाणावर पिकांचे नुकसान झाले. जिल्हाधिकारी यांनी नागद, सायगव्हाण, भिलदरी येथील भागातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला. जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात अतिवृष्टीने कन्नड-चाळीसगाव औट्रम घाटात मोठ्याप्रमाणात दरड कोसळल्याने वाहतूक खोळंबली, नागरिकांचे नुकसान झाले. अतिवृष्टी आणि घाटातील भूस्खलनामुळे उद्भवलेल्या स्थितीची जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी 31 … Read more

मराठवाड्याला पावसाने झोडपले; औरंगाबाद, जालना, बीड, परभणीत सर्वदूर पाऊस

Aurangabad Rain

औरंगाबाद – मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस काळ रात्रीपासून धो-धो बरसत आहे. आज पहाटेच पावसाने संपूर्ण मराठवाड्याला झोडपून काढले यामुळे बळीराजा सुखावला असला तरी बऱ्याच ठिकाणी नदी नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. तसेच जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील काही तासांत मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली … Read more

जटवाडा रोडवर दरड कोसळली; सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही

darad

औरंगाबाद : खुलताबाद तालुक्यातील रसूलपुरा गावातील मुख्य रस्ता असणाऱ्या जटवाडा रोडवर दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. ही घटना रविवारी घडली. काही वेळेतच वाहतूक सुरळीत झाल्यामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. औरंगाबाद शहराला जोडणारा ग्रामीण भागातील हा एक महत्वपूर्ण रस्ता आहे. खुलताबाद तालुक्यातील रसूलपुरा गावाजवळ मुख्य रस्ता जटवाडा रोडवर ही दरड कोसळली या ठिकाणी … Read more

महिन्याभरानंतर मेघगर्जनेसह शहरात जोरदार पाऊस

Aurangabad Rain

औरंगाबाद – औरंगाबाद शहरात काल रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास तब्बल एका महिन्याच्या काळानंतर ढगांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली असली तरी शेतकऱ्यांना मात्र दिलासा मिळाला आहे. चिकलठाणा वेधशाळेत रात्री साडेअकरा वाजेपर्यंत 42.7 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असल्याचे वेधशाळेने कळवले आहे. यावर्षी पावसाने जून आणि जुलै महिन्यात काही दिवस जोरदार हजेरी लावली … Read more

अनेक पूल वाहतूकीस बंद : कोयना धरणात 24 तासात 9 टीएमसी पाणी वाढले, धरणात 66. 75 टीएमसी पाणीसाठा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून गेल्या 24 तासात 9 टीएमसी पाणीसाठा वाढलेला आहे. रात्रभर पावसाने धुवाधार हजेरी लावलेली असून कोयना विभागातील अनेक पूल पाण्याखाली गेलेले असल्याने वाहतूक बंद झालेल्या आहेत. गुरूवारी सकाळी 8 वाजता धरणात 66. 75 टीएमसी पाणीसाठा होता. कराड – चिपळूण मार्गावरील कोयना विभागातील कदमवाडी ते … Read more

मुंबईत पावसाचा हाहाकार : चेंबूरमध्ये भूस्खलन होवून घरांवर भिंत कोसळल्याने 11 जणांचा मृत्यू

मुंबई | मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसानं जोरदार हजेरी लावली सर्वत्र पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. ठिकठिकाणी मुंबई पावसाच्या पाण्याने तुंबलेली पहायला मिळत असून लोक अडकल्याचेही चित्र दिसत आहे. मुंबईतील मुसळधार पावसामुळे चेंबूरमधील वाशीनाका परिसरात भूस्खलन झाल्याने घरांवर संरक्षक भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अद्याप या ढिगाऱ्याखाली अद्याप … Read more

जोरदार पावसाने अनेकांच्या घरात शिरले पाणी; एमजीएम वेधशाळेत 25.4 मिलिमीटर पावसाची नोंद

Aurangabad Rain

औरंगाबाद | दरवर्षी 15 जून पासून पावसाला सुरुवात होते. मात्र यंदा पावसाळा आठ जुलैपासून सुरू झाला. उशिरा का होईना पण आता पावसाला सुरुवात झाली. शुक्रवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह वेगाने पावसाला सुरुवात झाली. यामुळे अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. धुवाधार पावसामुळे शहरातील नागरिकांची तारांबळ उडाली. एमजीएमच्या वेधशाळेत 19 मिनिटांमध्ये 21.3 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात … Read more

औरंगाबादेत मुसळधार पावसाची हजेरी; 34 मिलिमीटर पावसाची नोंद

rain

औरंगाबाद : गेल्या दोन दिवसांपासून शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सोमवारी जाणवत आलेल्या उकड्यानंतर रात्री आठच्या सुमारास शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तर रात्री उशिरा 9 वाजेनंतर जास्त मुसळधार पावसाला सुरूवात झाली त्यानंतर रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती. शहराच्या सर्वच भागात मुसळधार पाऊस पडला. रात्री साडेअकराच्या सुमारास एमजीएमच्या वेध शाळेत ३३.८ मिमी पावसाची … Read more