Breaking | पुण्यात २४ तासात कोरोनानाने घेतला ८ जणांचा बळी

पुणे । राज्यात दिवसेंदिवस कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या दरात वाढ होत आहे. मृतांच्या संख्येत होणारी ही वाढ चिंताजनक आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या २४ तासात पुण्यात ८ जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसोबत आता पुण्यात मृतांचा आकडा १६वर पोहोचला आहे. तर दुसरीकडे राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता १ हजार … Read more

१४ एप्रिलनंतर लॉकडाउन हटणार, असं कुणीही गृहित धरू नये- राजेश टोपे

मुंबई । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यात २१ दिवसांचा लॉकडाउन लागू आहे. अजून सात दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे गेल्या १४ दिवसांपासून घरात असलेले नागरिक लॉकडाउन संपण्याची वाट बघत आहेत. मात्र, देशातील लॉकडाउन शिथिल करण्यात येणार असला, तरी महाराष्ट्रातील लॉकडाउन आणखी लांबणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच तसं स्पष्ट केलं आहे. “१५ एप्रिलपासून लॉकडाउन संपूर्णपणे … Read more

१४ तारखेनंतर काही ठिकाणांहून लॉकडाउन हटू शकतो, पण..- राजेश टोपे

मुंबई । सध्या राज्यात किंवा देशात सर्वांना एकच प्रश्न पडला आहे. तो म्हणजे येत्या १४ एप्रिलनंतर लॉकडाउन उठणार का? या प्रश्नाचे उत्तर आता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिलं आहे. १४ तारखेनंतर काही ठिकाणांहून लॉकडाउन हटवण्यासंदर्भात सरकार विचार करत आहे अशी माहिती टोपे यांनी दिली. मात्र, सरसकट सर्व ठिकाणावरून लॉकडाउन हटविणे केंद्र आणि राज्य सरकारला शक्य … Read more

राज्यातील लॉकडाउन काही आठवडे आणखी लांबणार?; राजेश टोपेंनी दिले संकेत

मुंबई । महाराष्ट्रामधील करोनाग्रस्तांची वाढत जाणारी संख्या पाहता राज्यातील लॉकडाउनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो असं महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी स्पष्ट केलं आहे. खास करुन मुंबई आणि शहरी भागांमधील लॉकडाउनचा कालावधी वाढवण्यात येईल असं टोपे यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या लॉकडाउनचा कालावधी १४ एप्रिल रोजी संपत आहे. मात्र, … Read more

Breaking! महाराष्ट्रात एकूण ३३५ कोरोनाग्रस्त; एकट्या मुंबईत ३० नवे रुग्ण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रावरील कोरोनाचं संकट आणखी गळद होताना दिसत आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ३३५ वर पोहोचला आहे. आज दिवसभरात ३३ नवे रुग्ण राज्यात वाढले आहेत. एकट्या मुंबईत ३० कोरोनाग्रस्त आढळले आहेत. तर पुण्यात २ आणि बुलडाण्यात १ रुग्ण आज कोरोनाचे आढळले आहेत. दरम्यान, आज मुंबई मुंबईतील करोनाग्रस्तांची संख्या वाढण्याची शक्यता राज्याचे आरोग्यमंत्री … Read more

राजेश टोपेंनी लिहलं डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना भावनिक पत्र

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एखाद्या युद्धात आघाडीवरचा सैनिक जसा जिवाची बाजी लावून लढतो, त्याचप्रमाणे आपले डॉक्टर, नर्स व इतर आरोग्य कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून अथक लढत आहेत. अवघा देश आपल्या कुटुंबीयांसोबत घरात असताना हे कर्मचारी कुटुंबापासून, मित्रमंडळींपासून दूर राहून सेवाभाव जपत आहेत. त्यांचे कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे आहेत,’ अशा शब्दांत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी … Read more

मुंबई ‘वुहान’ होण्याच्या मार्गावर? ५ हजारपेक्षा जास्त लोक कोरोनाबाधितांच्या संपर्कात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। दिवेसंदिवस राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. त्यातही सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्ण हे मुंबईत वाढले आहेत. दरम्यान, मुंबईच्या चिंतेत आणखी वाढ करणारी बाब समोर आली आहे. मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वर्तवली आहे. मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या १६२ झाली आहे. तर मुंबईतील तब्बल ५ हजारापेक्षा अधिक लोक कोरोनाबाधित रुग्णांच्या … Read more

स्थलांतरित मजुरांना राज्य सरकारचा दिलासा, घेतला ‘हा’ निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून राज्यातील स्थलांतरित कामगारांचे लॉकडाऊनच्या काळात होत असलेले हाल पाहता राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने राज्यातील ७० हजार पेक्षा जास्त स्थलांतरित कामगारांना दिलासा देण्यासाठी २६२ निवारा केंद्रं उभारण्यात आली यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. महाराष्ट्रात २६२ निवारा केंद्र उभारण्यात आली … Read more

राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या २०३वर; २२ नवीन रुग्णांची नोंद- आरोग्यमंत्री राजेश टोपे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात कोरोनाचे २२ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या २०३ झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक १० रुग्ण मुंबईचे असून ५ रुग्ण पुण्याचे, ३ नागपूरचे, २ अहमदनगरचे तर सांगली, बुलढाणा आणि जळगाव येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. दरम्यान, कोरोना आजारातून बरे झालेल्या एकूण ३५ रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आलं … Read more

राज्यात केवळ ७ ते ८ दिवसांचा रक्तसाठा शिल्लक; आरोग्यमंत्र्यांचे रक्तदानाचे आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात सध्या ७ ते ८ दिवसांचा रक्तसाठा शिल्लक आहे. येणाऱ्या काळात आपल्याला मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज लागू शकते. त्यामुळं रक्तदात्यांनी पुढं यावं आणि प्रशासनानंही रक्तदान शिबिरासाठी पूर्ण सहकार्य करावं,’ असं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केलं. करोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर टोपे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी … Read more