रशिया भारताला देणार हे ‘ब्रह्मास्त्र’; चीननं केला होता विरोध

मॉस्को । लडाख सीमेवर भारत आणि चीन या दोन देशामध्ये सीमावादावरून तणावाचं वातावरण आहे. अशा वेळी भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. रशियाकडून अत्याधुनिक S-400 एअर डिफेन्स मिसाइल सिस्टम भारताला मिळवण्याच्या दृष्टीनं राजनाथ सिंह यांचा हा दौरा महत्वाचा आहे. दरम्यान, रशियाने S-400 एअर डिफेन्स मिसाइल सिस्टम भारताला देण्याचा निर्णय घेतला आहे. … Read more

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रशियाला रवाना

नवी दिल्ली । भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह रशियाला रवाना झाले आहेत. राजनाथ सिंह हे आजपासून तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आहेत. चीनसोबतचे संबंध ताणल्याच्या पार्श्वभूमीवर हा दौरा अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे. भारताला रशियाकडून काही शस्त्रं हवी आहेत ती मिळवण्यासाठी दृष्टीनंही राजनाथ यांचा हा रशिया दौरा महत्वाचा आहे. भारताला रशियाकडून सुखोई Su-30 फायटर … Read more

‘आमच्या सर्कशीत प्राणी आहेत, फक्त एक विदुषक हवाय’; पवारांचा राजनाथ सिंहांना दे धक्का!

मुंबई । राज्यात सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा उल्लेख सर्कस म्हणून करणाऱ्या केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना खुद्द राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच सडेतोड उत्तर दिलं आहे. आमच्या सर्कसमध्ये प्राणी आहेत, मात्र एका विदुषकाची कमतरता आहे, या शब्दांत त्यांनी राजनाथ सिंहांचा खरपुस समाराच घेतला तोही अगदी आपल्याच शैलीत. निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसललेल्या कोकणातील वादळग्रस्त … Read more

किरकोळ कार्यकर्त्यांसारखे राजनाथ सिंग टीव्हीवर टीका करतायत – पृथ्वीराज चव्हाण 

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी भाजपाचे नेते आणि केंद्रीय संरक्षणमंत्री यांनी महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरु असल्याचे वक्तव्य केले होते. या वक्तव्यावर आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते यांनी व्हिडिओच्या माध्यमातून राजनाथ सिंह यांना उत्तर दिले आहे. आणि अशा पद्धतीने स्वतःचे काम करण्यास अपयशी ठरल्यामुळे लोकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी छोट्या राजकीय कार्यकर्त्यांसारखी टीका करणे … Read more

रिंगमास्टरच्या हंटरने चालणाऱ्या सरकारचे मंत्री महाविकास आघाडीला सर्कस म्हणतात- नवाब मलिक

मुंबई । राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला सर्कस म्हणून संबोधणाऱ्या देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना राष्ट्रवादी काँग्रेसने सडेतोड उत्तर दिले आहे. रिंगमास्टरच्या हंटरने चालणाऱ्या सरकारचे मंत्री लोकशाही पद्धतीने चालणाऱ्या सरकारला सर्कस म्हणत आहेत. हे त्यांचे अनुभवाचे बोल आहेत, असा पलटवार राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केला आहे. राजनाथ सिंह यांनी व्हर्च्युअल रॅलीद्वारे महाराष्ट्रातील … Read more

सरकारच्या नावाखाली महाराष्ट्रात सर्कस सुरु आहे – राजनाथ सिंह 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या संकटकाळात महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच पेटले आहे. आरोप प्रत्यारोप यामुळे महाराष्ट्रातील राजकारण देशभरात गाजते आहे. रोज नव्याने एकमेकांवर आरोप केले जातात त्याला उत्तरे दिली जातात. पुन्हा त्यावर काहीतरी विधाने केली जातात. आता केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनीदेखील यावर आता टीका केली आहे. ते म्हणाले “महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरु आहे.” भाजपच्या … Read more

ट्रम्प यांच्या मध्यस्तीच्या प्रस्तावाला भारताने दिला नकार, म्हटले की,’हा सीमावाद ते शांततेने निकाली काढला जाईल’

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चीनने भारतीय भूमीवर अतिक्रमण केल्यानंतर या दोन देशांमधील सुरु झालेला तणाव कायम आहे. दुसरीकडे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही भारत आणि चीनमधील हा सीमावाद सोडविण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. दरम्यान, चीनबरोबरील हा प्रश्न शांततेने सोडवला जाईल, असे भारताने शुक्रवारी स्पष्ट केले आहे. यात अमेरिकेचा हस्तक्षेप भारताला … Read more

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर संरक्षणमंत्र्यांची सेना प्रमुखांसोबत महत्वाची बैठक

नवी दिल्ली । भारत-चीन सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज तिन्ही सेना प्रमुखांसोबत आणि चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल विपिन रावत यांच्यासोबत बैठक घेतली. ज्यामध्ये लद्दाखमधील लाइन ऑफ अक्चुअल कंट्रोलवर चीनसोबत सुरु असलेल्या तणावावर चर्चा झाली. सूत्रांच्या माहितीनुसार संरक्षणमंत्री यांना चीनला लागून असलेल्या सीमा कशा प्रकारे मजबूत केल्या जात आहेत याबाबत माहिती … Read more

लाॅकडाउननंतरही संचारबंदी कायम राहणार, १४ एप्रिलनंतर सरकारचा ‘हा’ प्लान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनपासून पसरलेल्या कोरोनाव्हायरसने भारतासह जगभरातील देशांना वेढले आहे. भारतातही या विषाणूचा संसर्ग होण्याचे प्रमाण ४००० च्या वर गेले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू केलेल्या देशातील २१ दिवसांच्या लॉकडाऊनचा आज १३ वा दिवस आहे. बाजारपेठा बंद आहेत. गाड्या, बस, विमान, टॅक्सी, काहीही चालू नाहीये. अशा परिस्थितीत सरकार १५ एप्रिलपासून टप्प्याटप्प्याने लॉकडाउन उघडण्याचा … Read more

एक वेंटिलेटरवर चार रुग्णांवर उपचार करणार, DRDO च्या प्रयत्नांना यश

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संरक्षण संशोधन व विकास संघटना (डीआरडीओ) कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशातील रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरच्या कमतरतेवर मात करण्यासाठी पुढे आली आहे. डीआरडीओने असे तंत्रज्ञान विकसित केले आहे, जे एकाच वेळी चार रुग्णांना व्हेंटिलेटरद्वारे मदत करेल. डीआरडीओचे संचालक सांगतात की आम्ही यासाठी कोणतेही नवीन व्हेंटिलेटर तयार करत नाही आहोत, तर त्या आधीपासूनच असलेल्यांमध्ये काही बदल … Read more