मोफत राशन देण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर होणार कारवाई, आता करता येणार ‘या’ नंबरवर थेट तक्रार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। काल झालेल्या कॅबिनेट बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गरीब कल्याण अन्न योजनेच्या विस्तारास मान्यता मिळाली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकॉउंटवरून याची माहिती दिली होती. नोव्हेंबर २०२० पर्यंत ८० कोटीहून अधिक लोकसंख्येला मोफत धान्य देण्याची घोषणा करण्यात आली आहे. गुलाबी, पिवळ्या, खाकी राशनकार्ड सहित ज्यांच्याकडे राशन कार्ड नाहीत अशाही … Read more

छगन भुजबळ राजीनामा द्या म्हणत भाजप कार्यकर्त्यांचे आंदोलन; रेशन दुकानात निकृष्ट तूरडाळ विकली जात असल्याचा आरोप

अमरावती प्रतिनिधी | आशिष गवई अमरावती जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन काळात निकृष्ट दर्जाचे तांदूळ व डाळ सर्व गोरगरीब जनतेला रेशन दुकानाच्या माध्यमातून वाटण्यात आली असल्याचा आरोप होत आहे.  या धान्य वितरणामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून निकृष्ट डाळ व तांदूळ वितरण हे माणुसकीला काळिमा फासणारे आहे. महाराष्ट्र शासनाचा तीव्र निषेध करून जबाबदार असलेल्या मंत्री व अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्यात … Read more

नोव्हेंबरपर्यंत तांदूळ व डाळी मोफत मिळवण्यासाठी रेशन कार्डला 31 जुलैपर्यंत आधारशी लिंक करावे लागेल; कसे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मार्चमध्ये, भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण या पॅकेजअंतर्गत पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना जाहीर केली. याअंतर्गत, ज्या गरीब कुटुंबांकडे रेशनकार्ड आहे आणि ज्यांच्याकडे नाही, अशा सर्वाना एप्रिलपासून दरमहा 5 किलो गहू / तांदूळ आणि दरमहा एक किलो हरभरा मोफत देण्यात येत आहे. हे मोफत धान्य सध्या रेशन कार्डावर … Read more

आता घरबसल्या आधार कार्ड रीप्रिंट करणे झाले सोपे, UIDAI ने दिली संपूर्ण माहिती; कसे करायचे ते घ्या जाणून

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आधार कार्डशिवाय बँक खाते, रेशन कार्ड अशा अनेक महत्वाच्या गोष्टी अडकल्या आहेत. खऱ्या अडचणी तेव्हाच वाढतात जेव्हा आपल्याला कळते की आपले आधार कार्ड एकतर हरवले आहे किंवा ते फाटलेले आहे. म्हणूनच आम्ही आपली ही समस्या सोडविण्यासाठी आपले आधार कार्ड पुन्हा प्रिंट कसे करायचे याची माहिती देत ​​आहोत. यूआयडीएआयने याबाबत संपूर्ण माहिती … Read more

मोदींनी कोणत्या देशाच्या पंतप्रधानाचा उल्लेख केला, ज्यांना ठोठावण्यात आला 13000 रुपयांचा दंड ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाच्या दिलेल्या संदेशामध्ये म्हटले की, आपण भलेही दोन हात लांब राहण्यापासून ते वीस सेकंदापर्यंत हात धुन्यापर्यंत सावधगिरी बाळगली असेल. मात्र आता आपल्याला अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे, तेव्हा वाढती बेजबाबदारी हे एक मोठे चिंतेचे कारण आहे. यावेळी त्यांनी मास्क न वापरल्यामुळे बल्गेरियाचे पंतप्रधान बोइको बोरिसोव्ह यांना … Read more

आता घरबसल्या रेशन कार्डमध्ये जोडा तुमच्या कुटुंबातील सदस्याचे नाव, कसे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी रेशन कार्ड हे एक महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट आहे. विशेषत: अशा वेळी जेव्हा लॉकडाऊनमुळे कोणताही गरीब भुकेला राहू नये यासाठी केंद्र सरकार या कार्डांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर धान्य वाटपाचे काम करीत आहे. याशिवाय अनेक सरकारी योजनांमध्येही रेशनकार्ड असणे बंधनकारक आहे. अशा परिस्थितीत हे महत्वाचे डाक्युमेंट नेहमीच अपडेट केली जाणे आवश्यक … Read more

रेशनकार्डपासून ते रेल्वेसंदर्भातील नियमांमध्ये आजपासून ‘हे’ मोठे बदल

नवी दिल्ली । देशात एकिकडे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनेक नियम लागू करण्यात आलेले असतानाच नियमांच्या या सत्रामध्ये आता आज म्हणजेच १ जूनपासून काही महत्त्वाच्या नियमांमध्ये मोठे बदल होणार आहेत. रेल्वे, गॅस सिलेंडर, पेट्रोल-डिझेल यांची भाववाड तसेच रेशन कार्ड आणि रेल्वेच्या नियमातील बदलांचा यात समावेश आहे. यांपैकी काही बदलांमुळं नागरिकांना अंशत: सूट मिळणार आहे. तर, काही … Read more

‘वन नेशन वन रेशन कार्ड’ नेमकी काय आहे ‘ही’ मोदी सरकारची योजना

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना संकटादरम्यान जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. ‘स्वावलंबी भारत’ पॅकेजविषयी आज दुसऱ्या टप्प्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ योजनेची घोषणा केली. यानुसार देशभरात कुठल्याही मान्यताप्राप्त शिधावाटप दुकानातून वन नेशन वन रेशनकार्ड योजनेमुळे रेशन मिळणे शक्य होणार आहे. याचा लाभ … Read more

दारुच्या दुकानांबाहेर गर्दी करणाऱ्यांचे रेशन कार्ड रद्द करा!- खासदार इम्तियाज जलील

औरंगाबाद । देशभरात पुकारण्यात आलेला लॉकडाऊन तिसऱ्या टप्प्यात काहीसा शिथिल करण्यात आला आहे. अपवाद वगळता राज्यातील वाइन शॉप उघडण्यासही सरकारनं परवानगी दिली आहे. ही परवानगी दिल्यानंतर ठिकठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं चित्र आहे. मद्यपींनी दुकानांसमोर प्रचंड गर्दी केल्यानं संसर्गाचा धोका वाढला आहे. अशा वेळी दारूच्या खरेदीसाठी रांगा लावणाऱ्या सर्वांची रेशन कार्ड रद्द करा, अशी मागणी … Read more

अजित पवारांचं सर्व पालकमंत्र्यांना खरमरीत पत्र; म्हणाले…

मुंबई । उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व पालकमंत्र्यांना पत्र लिहून रेशन दुकानांमधून पुरेसं अन्नधान्य उपलब्ध केलं जात असतानाही तक्रारी वाढत असल्याकडे लक्ष वेधलं आहे. राज्यात सर्वत्र धान्यवाटप सुरु असून काही जिल्ह्यांमधून येणाऱ्या तक्रारींमुळे शिधावाटप यंत्रणेची, शासनाची नाहक बदनामी होत आहे. ही बदनामी टाळली पाहिजे. त्यासाठी आपापल्या जिल्ह्यातील शिधावाटप यंत्रणेत गैरप्रकार होणार नाहीत याची काळजी घ्यावी. … Read more