संभाजी भिडे यांचे उद्या सांगली बंदचे आवाहन; संजय राऊतांना पदावरून हटवण्याची मागणी

सांगली | उदयनराजेंनी शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे द्यावे अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली होती. त्यांच्या या विधानाचे तीव्र पडसाद सातारा, सांगली भागात पडताना दिसत आहेत. संजय राऊत यांनी केलेल्या या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी शुक्रवारी (17 जानेवारी) सांगली बंदचं आवाहन केलं आहे. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगली दौऱ्यावर … Read more

सांगलीत तडीपारी आदेशाचा भंग करणाऱ्या दोघांना घेतले ताब्यात

सांगली प्रतिनिधी। तडीपारी आदेशाचा भंग करुन कोणत्याही अधिकाऱ्याची पूर्वपरवानगी न घेता शहरात दाखल झालेल्या दोघा तडीपारांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले आहे. बंड्या दडगे आणि महेश पाटील अशी त्यांची नावे आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा आणि अपर पोलीस अधीक्षक मनिषा डुबुले यांनी तडीपारी आदेशाचा भंग करुन शहरात आलेल्यांना ताब्यात घेण्याचे … Read more

मोठ्या भावाचा खून करून केला अपघाताचा बनाव

सांगली प्रतिनिधी। अंबक फाटा सोनहीरा कारखाना चौक येथील बुरुंगले कुटुंबात जागेच्या वाटणीवरून घरगुती वादातून नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून करणाऱ्या सख्या भावास व त्याच्या साथीदारास चिंचणी पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे खून केल्यानंतर आरोपींनी अपघाताचा बनाव रचला होता. हा प्रकार शुक्रवार दिनांक २० सप्टेंबर रोजी रामापूर फाटा जवळ रात्री बाराच्या सुमारास घडला होता. शिवाजी … Read more

आयशीअर टॅम्पो आणि दुचाकीच्या अपघातात विद्यार्थी जागीच ठार, दोघे गंभीर जखमी

सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे विजापूर राष्ट्रीय महामार्गावर बोर्गी-बालगांव दरम्यान आयशर टेम्पो व दुचाकीचा अपघात होऊन बोर्गी येथील ओंकार उमेश देसाई हा महाविद्यालयीन तरुण जागीच ठार झाला तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची दुःखद घटना आज पहाटे साडे सहा वाजता घडली. रोड अपघात मयत ओंकार देसाई हा बोर्गी येथील असून करजगी रोडला त्यांचे शेत आहे तेथुन … Read more

पॉलिशच्या बहाण्याने दहा तोळे सोने लंपास, विटा येथील घटना

सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे सोन्याचे दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने वृद्धेला तब्बल १० तोळ्याला ठकविल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना विटा येथील विवेकानंदनगर येथे आज दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत विटा पोलिसांत राधा मुकुंदराव लंगडे यांनी फिर्याद दिली आहे. भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे. विवेकानंदनगरात राधा लंगडे या कुटुंबियांसमवेत राहतात. आज … Read more

पक्षांतराबद्दल गोपीचंद पडळकर म्हणतात

सांगली प्रतिनिधी | मागील क्काही दिवसापासऊन गोपीचंद पडळकर हे शेतकरी कामगार पक्षात जाऊन सांगोला विधानसभेची निवडणूक लढणार अशी चर्चा सुरु होती. त्यावर त्यांनी आज भाष्य केले आहे. मी वंचितचाच आहे. वंचितमध्येच राहणार. आम्ही वंचित समाजासाठी लढा सुरु केला आहे. तो लढा असाच सुरु ठेवणार आहे. त्याच प्रमाणे प्रकाश आंबेडकरांची साथ कधीच सोडणार नाही असे गोपीचंद पडळकर … Read more

पूरग्रस्तांची स्थिती बघून राज ठाकरेंच्या पत्नीच्या डोळ्यात आले पाणी

सांगली प्रतिनिधी | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आज पलूस तालुक्यातील ब्रह्मनळी गावाला भेट दिली आहे. या ठिकाणी लोकांशी संवाद साधताना त्यांना अश्रू अनावर झाले आहेत. पूरग्रस्तांचे दुःख पाहून शर्मिला ठाकरे भावून झाल्या आणि त्यांच्या भावनेचा बांध फुटला आणि त्या रडू लागल्या. त्यांच्या डोळ्यात पाणी बघून येथील गावकऱ्यांनी देखील आपल्या मनातील दुःखाला … Read more

पूराने केलेला विध्वंस बघून भिडे गुरुजींना आले रडू

सांगली प्रतिनिधी | भिडे गुरुजी आणि त्यांचे हिंदुस्थान प्रतिष्ठान पूराचे पाणी ओसरलेल्या भागात स्वच्छतेचे काम करत आहेत. कामात व्यस्थ असलेल्या भिडे गुरुजीसोबत माध्यमांच्या प्रतिनिधीने संवाद साधला असता भिडे गुरुजींना पूराने केलेला विध्वंस बघून अश्रू अनावर झाले. गोर गरिबांच्या घराची झालेली नासधूस बघून मला अत्यंत दुःख होत आहे अशी भावना भिडे गुरुजींनी यावेळी व्यक्त केली. सांगली आणि … Read more

माध्यमांमध्ये टीका होताच पुरग्रस्तांच्या मदतीचा तो फोटो जयंत पाटलांनी हटवला

सांगली प्रतिनिधी | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आज स्वतःचे फोटो लावून मदत करू नका असे आवाहन केले असले तरी नेते या स्थितीचे राजकारण करण्याचे सोडत नाहीत. मात्र जयंत पाटील यांनी शिथापीने आपल्या फेसबुक पेज वरील त्यांच्या फोटोसहित केल्या जाणाऱ्या मदत कार्याचा फोटो उडवला आहे. जयंत पाटील यांच्या घरून पूरग्रस्त लोकांसाठी जेवणाचे पॅकेट जात होते. या पॅकेटच्या बॉक्सवर … Read more

देवेंद्राचे तुगलकी फर्मान : पुराचे पाणी २ दिवस घरात असले तरच मिळणार गहू तांदूळ

मुंबई प्रतिनिधी | देवेंद्र फडणवीसांच्या अनेक निर्णयाबद्दल लोकांमधून असंतोष निर्माण होता ना आपण पहिले आहे. अशाच प्रकारचा एक निर्णय देवेंद्र फडणवीसांनी घेतला असून त्या निर्णयामुळे मोठा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. दोन दिवस ज्यांच्या घरात पुराचे पाणी शिरले होते अशाच लोकांना राज्याच्या पुरवठा विभागाकडून गहू आणि तांदूळ अल्प दारात पुरवले जाणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या या … Read more