चार दिवस कोठे होतात असा सवाल करत मंत्री देशमुख, महाजनांना पूरग्रस्तांनी घेरले

सांगली प्रतिनिधी |  मागील चार दिवसापासून पाऊस कहर होऊन बरसत होता आणि आम्ही संकटात सापडलो होतो. आता पूर ओसरू लागला आहे तेव्हा तुम्हाला आमची आठवण झाली. चार दिवस आम्हाला कसलीच मदत का पोचली नाही. तुमचं प्रशासन काय करत होते असे सवाल करून गिरीश महाजन आणि सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांना पुरग्रस्तांनी चांगलेच धारेवर धरले आहे. … Read more

बोटीत बसलेल्यांना कोण थांबवणार ; ब्रम्हनळी दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

सांगली प्रतिनिधी | सांगली जिल्ह्यात पलूस तालुक्यात ब्रम्हनळी गावात बोट उलटल्याने १४ लोक ठार झाले असून अनेक लोक अद्याप बेपत्ता आहेत. त्या लोकांना शोधण्याचे काम सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता बोटीत बसणाऱ्याला कोण थांबवणार अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ब्रम्हनळी गावची स्वतःची एक बोट होती.गावात पाणी … Read more

पूर परिस्थितीचा फायदा घेऊन दोन कैदी फरार

सांगली प्रतिनिधी | कृष्णा नदीने पूराचा कहर मांडला असतानाच याचा फटका सांगलीच्या जिल्हा कारागृहाला ही बसला आहे. कारागृहात गुन्ह्यांची शिक्षा भोगत असणारे ३९० कैदी पर्यायी ठिकाणी हलवण्यात आले आहेत. या स्थलांतराच्या दरम्यान दोन कैद्यांनी परिस्थितीचा फायदा घेऊन पळ काढला आहे. हे दोन कैदी तरुंगातून फरार झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली. तुरुंगात पाण्याची पातळी वाढत गेल्याने … Read more

कृष्णा नदीत बचाव कार्याची बोट उलटून १५ जण बेपत्ता ; ९ जणांचा मृत्यू झाल्याची भीती

कराड प्रतिनिधी | कृष्णानदीने रौद्ररूप धारण केले असल्याने सध्या सातारा आणि सांगली जिल्ह्यातील बराच गावांना पुराचा फटका सहन करावा लागत आहे. अशातच पलूस तालुक्यात ब्रम्हनळी गावात बचाव कार्य सुरु असताना बोट उलटून १५ बुडाल्याची घटना घडली आहे. या संदर्भात प्रशासनाकडे पुरेशी माहिती नसल्याने त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. कृष्णा नदीच्या काठी असणाऱ्या गावांना पुराचा … Read more

या माणसाने पेशाची लाज काढली ; ३० रुपयांची लाच घेताना डॉक्टर अँटी करप्शनच्या जाळ्यात

सांगली प्रतिनिधी | आपण लाचेचे अनेक प्रकार बघितले असतील मात्र हा प्रकार बघून आपण थक्क व्हाल. कारण या प्रकरणात सरकारी दवाखान्यातील डॉक्टराने उपचारासाठी फक्त ३० रुपयांची लाच मागितल्याची घटना घडली आहे. सदरची घटना सांगली जिल्ह्यातील कुरळप गावात घडली असून ऐतवडे गावच्या एका व्यक्तीला उपचारासाठी डॉक्टर ३० रुपयांची लाच मागत होता. उपचारासाठी डॉक्टर ३० रुपयांची लाच मागत … Read more

जनसंपर्क ठेवल्यामुळेच कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी – विश्वजित कदम

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे आघाडी शासनाच्या काळात युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडताना बुलढाणा ते सांगली अशी संवाद पदयात्रा काढून दुष्काळग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला. त्यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून थेट राहुल गांधी यांच्याशी संवाद साधून शासनाच्या दुष्काळ निवारणाच्या विविध योजनांचा लाभ दुष्काळी भागातील लोकांना मिळवून दिला. राज्यभर युवक काँग्रेसचे मजबूत संघटन … Read more

कृष्णा खोरे महामंडळाच्या उपाध्यक्षपदी खा. संजयकाका पाटील यांची फेरनिवड

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे खासदार संजयकाका पाटील यांची आज महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. सदर निवडीबाबतचा शासन निर्णय आज प्रसिद्ध करण्यात आला. लोकसभा निवडणूकीपूर्वी खासदार संजयकाका पाटील यांच्या पाणी योजनांना पुर्णत्वास आणण्यासाठीचा पाठपुरावा पाहुन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली होती. … Read more

महाराणा प्रताप यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात महाराणा प्रताप यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्यांवर आणि गोरक्षकांवर प्राणघातक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी आज राष्ट्रीय हिंदु आंदोलन, हिंदू जनजागृती समिती आणि शिवसेनेच्यावतीने मारुती चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटलेलं आहे, हिंदू रक्षक महाराणा प्रताप नसते तर आज हिंदू समाज अस्तित्वात नसता, अशा या … Read more

आमदार जगतापांच्या उमेदवारीला अंतगर्त गटबाजीचे ग्रहण

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपताच अपेक्षेप्रमाणे आगामी विधानसभेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. त्यातच सर्वात मोठा पक्ष म्हणून मिरवणाऱ्या भाजप पक्षाला अंतर्गत गटबाजीचे मोठे ग्रहण लागलेले आहे. सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीत गटबाजी थोपवण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर आहे. भाजपचे विद्यमान आमदार … Read more

दारूड्या मुलाने केला जन्मदात्या पित्याचा निर्घृण खून

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे वाळवा तालुक्यातील वाकुर्डे येथील लक्ष्मण पाटील-वाघमारे याने मुलाने आपल्या जनदात्या पित्याचा दारूच्या नशेत म्हैस विक्रीतुन आलेले पैसे दिले नसल्याच्या कारणावरून वडील हरी पाटील-वाघमारे यांना लाकडी दांडक्याने मारहाण करत निर्घृण खून केल्याची घटना आज उघडकीस आली. या प्रकरणी चिकुर्डे येथील पोलीस पाटील सुधीर कांबळे यांनी कुरळप पोलिसात फिर्याद दिली असून वयोवृद्ध … Read more