बस स्थानकावर तीन तोळे सोने चोरीला

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे जतला पाहुण्यांकडे जाताना सांगली-जत  बसमधे महिलेची पर्स चोरून त्यातून ३ तोळ्याचे सोन्याचे दागिने आणि ४५०० रुपये रोख असा १ लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना आज दुपारी सांगली बस स्थानकावर घडली. इस्लामपूरच्या असणाऱ्या रेखा ऐवळे या जतला पाहुण्यांकडे जाण्यासाठी इस्लामपूरहून सांगलीला आल्या होत्या. त्या जतला जाण्यासाठी सांगली-जत या बस मध्ये बसत … Read more

दिवंगत मित्राला कर्जमुक्त करून वाहिली श्रद्धांजली

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे आपल्या जिवलग मित्राला आलेल्या अकाली निधनाने त्याच्या कुटुंबावर पसरलेला दुःखाचा डोंगर दूर करण्यासाठी त्यांचे जिवलग मित्र सरसावून आले. शिक्षक असलेल्या मित्रावर असणारा कर्जाचा डोंगर पैसे गोळा करून फेडला. आजच्या जमान्यात माणुसकी दाखवून देणाऱ्या मित्रांची हि अनोखी कहाणी. मिरज तालुक्यातील बेळंकी येथील राजू सातपुते हे एक आदर्श प्राथमिक शिक्षक होते. हृदयविकाराच्या तीव्र … Read more

कर्नाटकातील शेतकऱ्यांकडून म्हैशाळ योजनेतील पाण्याची चोरी

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे मिरज तालुक्यातील खटाव गावात सध्या म्हैशाळ योजनेचे पाणी चालू आहे. वाघावकर वस्ती येथील पोट कालव्यातून सध्या शेतकऱ्यांना पाणी देण्याचे काम सुरू आहे. एकीकडे खटाव गावातील शेतकरी पाण्यापासून वंचित आहेत तर कर्नाटकातील विहीरीना पाणी देण्याचे काम सुरू आहे. गेल्या काही दिवसंपासुन सलगरे येथील शेतक-यांनी आपल्या विहरींमधुन पाणी कर्नाटकात नेले होते परिणामी … Read more

चोरट्याच्या घरातून चार लाखांची चांदी जप्त

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे चेन्नई येथील एका दुकानात गलाई कामगार म्हणून काम करीत असलेल्या जत तालुक्यातील एकाने आपल्या अन्य तीन साथीदारांसह २८ किलोची चांदी चोरून पोबारा केला होता. चेन्नई पोलीस आणि उमदी येथील पोलिसांनी त्यातील एका आरोपीच्या लवंगा येथील घरावर छापा टाकून सुमारे चार लाखांची १० किलोची चांदी ताब्यात घेतली, मात्र आरोपी मिळाला नाही. … Read more

भाजपच्या कार्यकर्त्याचा सांगलीत खून

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे संजयनगर मधील भाजपचे कार्यकर्ते व बांधकाम साहित्याचे विक्रेते सुभाष बुवा यांचा काल रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणावरून धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला. बुवा यांच्या खूनप्रकरणी गुंडविरोधी पथकाने दोघा संशयितांना पहाटे ताब्यात घेतले. इम्रान बंडूलाल शेख व रफिक बबलू शेख अशी त्यांची नावे आहेत. शनिवारी रात्री … Read more

मान्सूनच्या पावसाने द्राक्षबागायतदार सुखावला

 सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे    पाणीटंचाईच्या झळा सोसत चातकाप्रमाणे पावसाची वाट बघणाऱ्या तासगाव तालुक्याच्या शहरासह ग्रामीण भागाला चांगलेच झोडपले. सायंकाळी ग्रामीण भागाला पावसाने चांगली हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. दुष्काळाच्या अधिक झळा बसलेल्या पूर्व भागातील गावांना चांगलेच झोड़पले. शेताचे बांध भरून सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते. या पाण्याने द्राक्षबागायतदार शेतकरी … Read more

वाळू तस्कराला महिला तहसीलदाराने दिला चोप

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे  चोरटी वाळूतस्करी केली म्हणून ताब्यात घेतलेला वाळूचा ट्रक तहसील कार्यालयातून जबरदस्तीने पळवून नेण्याच्या प्रयत्नात असलेला वाळू चोरट्याला येथील तहसीलदार कल्पना ढवळे यांनी वाटेत अडवून चांगलाच चोप दिला. चित्रपटाला शोभेल असा थरारक प्रकार तासगावात सायंकाळी पाचच्या सुमारास घडला. तर याठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.  मणेराजुरी येथील मंडल अधिकाऱ्यांनी सकाळी शिरोळ … Read more

११ तोळे सोन्यावर चोरांनी मारला डल्ला

Untitled design

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे , तासगाव तालुक्यातील येळावी येथे बुधवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दोन-तीन घरांत घरफोडी केली. अशोक आत्माराम मारवाडी यांच्या घरातील अंदाजे ११ तोळ्यांचे सोन, चांदीचे दागिने आणि १५ हजार रुपयांची रोकड लंपास केली आहे. तसेच इतरही दोन, तीन घरांत चोरीचा प्रयत्न केला आहे. याबाबत रात्री ऊशिरा तासगाव पोलिसांत फिर्याद दाखल करण्याचे काम सुरु … Read more

अनैतिक संबंधातून चाकूने सपासप वार करून खून

Untitled design

सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे  संजयनगर येथील साईनगरमध्ये किरकोळ कारणावरून एकाचा गुंडाकडून निर्घृण खून करण्यात आला. पांडुरंग तुकाराम गलांडे (वय 39, रा. रामरहीम कॉलनी) असे मृताचे नाव आहे. शनिवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी गुंड गबर्‍या ऊर्फ विश्‍वजित नामदेव माने (वय 29) याला अटक करण्यात आली आहे.  याबाबत संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात … Read more

रेकोर्ड गुन्हेगाराच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Untitled design

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे वडिलोपार्जित जमिनीच्या कारणावरून जुबेर अजीज जमादार याच्यावर चाकूने हल्ला करून त्याला जखमी करणाऱ्या पोलिसाच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार इर्शाद लांडगेच्या टोळीतील तिघाजणांना गुंडाविरोधी पथकाने तुंग रस्त्यावरील लक्ष्मी फाटा येथे सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून  गुन्ह्यात वापरलेला चाकू आणि एक चारचाकी कार जप्त करण्यात आली आहे. दिनांक ‘२० मे रोजी पोलिसाच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार इर्शाद मुसा लांडगे याने … Read more