धक्कादायक! वेळेवर पगार न दिल्यानं नोकराचा मालकावर गोळीबार

सांगली प्रतिनिधी । पलूस येथील प्रसिद्ध उद्योजक प्रदीप आनंदराव वेताळ यांच्यावर गुरुवारी दुपारच्या सुमारास गोळीबार झाला होता.मात्र या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले. हल्लेखोर आरोपी सूरज सुधाकर चव्हाण याला डफळापुर येथे पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने केली असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांनी दिली. पलूस येथील प्रसिद्ध … Read more

कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून आर्थिक फसवणुकीप्रकरणी महिलेची कोर्टात धाव

सांगली प्रतिनिधी । शासकीय स्कीम मंजूर करून देतो अशी आमिष दाखवून माजी सैनिक यांच्या पत्नीसह चौघा महिलांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी राणी आदनामे, लता सूर्यवंशी, आणि राणीचा पती ह्या तिघांच्या विरोधात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार संबंधित महिलांनी दिली आहे. सुलोचना सोनवणे या अण्णा कासार झोपडपट्टी समोर खाडिलकर हॉस्पिटल शेजारी राहतात. सुलोचना यांचे पती मिलेट्री … Read more

मिरजेत अवैध सावकारीतून कोट्यवधी रुपयांची वसुली करणाऱ्या २ फरार आरोपींना अटक

सांगली प्रतिनिधी । मिरजेतील तंतूवाद्य व्यवसायिक संजय मधुकर मिरजकर याच्याकडून ५१ लाखांच्या कर्जापोटी तब्बल दोन कोटींचे व्याज वसुल करण्यात आले. यासंदर्भात गुन्हा दाखल झालेले संतोष कोळी व गायकवाड या दोघा फरारी आरोपींना शहर पोलिसांनी अटक केली. अन्य ६ सावकार अद्याप फरारीच आहेत. पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या सावकरांवर … Read more

६२८ शेतकर्‍यांच्या कुंडली बदलल्या, गुगल ट्रान्सलेटरचा झटका

सांगली प्रतिनिधी | पंतप्रधान कृषी सन्मान योजनेत लाभार्थी असलेल्या ६२८ शेतकर्‍यांच्या कुंडली बदलल्याचा प्रकार सांगलीत घडला आहे. गुगल ट्रान्सलेटरमुळे सदर शेतकर्‍यांच्या कुंडली बदलल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील पंतप्रधान कृषी सन्मान योजनेसाठी लाभार्थी असणार्‍या शेतकर्‍यांची यादी सेतु द्वारा करण्यात आली होती. सदर यादीची इंग्रजी भाषेतील … Read more

सात-बारा कोरासाठी ८ जानेवारीला महाराष्ट्र बंद, राजू शेट्टींचा इशारा

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. पण अद्याप ते पूर्ण झालेले नाही. राज्याने दिलेली कर्जमाफी तकलादू आहे. सरकार कुणाचेही असो शेतकऱ्यांचे प्रश्न सुटल्याशिवाय गप्प बसणार नाही. संपूर्ण कर्जमाफी, शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधासाठी ८ जानेवारीला महाराष्ट्र बंद ठेवण्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते … Read more

शरद पवारांमुळे अनिल बाबरांचे मंत्रिपद हुकले?

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे राज्याच्या मंत्रिमंडळावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा पगडा असून त्यांच्या सल्ल्यानेच शिवसेनेनेही आपले मंत्री ठरविल्यामुळे शिवसेनेत संतापाची लाट पसरली आहे. शरद पवार यांच्या हस्तक्षेपामुळेच राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या महत्वाच्या नेत्यांना मंत्रिपदे देण्यात आलेली नाहीत यामुळेच खानापूर-आटपाडीचे आ.अनिल बाबर यांचे मंत्रिपद हुकल्याचे विश्‍वासनीय वृत्त आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या … Read more

नववर्षात सांगली मनपा क्षेत्रातील नागरिकांना बसणार करवाढीचा आर्थिक फटका

महापालिकेच्या दर सुधार समितीने बंद पाणीमिटर, अस्वच्छ भूखंड, खोकी हस्तांतर, दुकानगाळ्यांची भाडेपट्टी, दैनंदिन परवाना फी, बांधकाम शुल्क, हॉटेल व बिअर बार परवान्यासह इतर लागणाऱ्या ‘एनओसी’मध्ये दुप्पट ते तिप्पट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा प्रस्ताव प्रशासनाने देखील तयार केला आहे. हा प्रस्ताव महासभेला जाणार असल्याने नवीन वर्षात महापालिका क्षेत्रातील व्यवसायिक व नागरिकांना करवाढीचा दणका बसणार आहे. मनपाचे आर्थिक उत्पन्न वाढीसाठी करवाढ करणे अटळ असल्याचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी स्पष्ट केले.

विठ्ठल दर्शनासाठी सैनिकाचा ९० किलोमीटरचा धावा

भारतीय सैन्यदलात सख्या भावाची भरती झाल्यानंतर दक्षिण सोलापूर तालुक्यातील तोगराळी येथील नागनाथ जमादार या सैनिकाने तोगराळी ते पंढरपूर असे ९० किलोमीटरचे अंतर धावत पूर्ण केले. त्यानंतर त्यानी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. पंडित शंकर जमादार यांचा मुलगा नागनाथ जमादार हा सैन्यामध्ये उदमपूर,जम्मू काश्मिर येथे गेले चार वर्षांपासून कार्यरत आहे. दरम्यान त्याचा भाऊ नवनाथ जमादार हा देखील सैन्यमध्ये भरती झाला आहे. सध्या नवनाथ हा बेंगलोर येथे ट्रेनिंग घेत आहे. नागनाथ जमादार यांनी ”आपला भाऊ नवनाथ देखील आपल्या बरोबर सैन्यामध्ये भरती होईल तेव्हा आपण धावत विठ्ठलच्या दर्शनासाठी जावू” असा पण केला होता.

शासनाच्या आदेशामुळे सांगली महापालिकेच्या कामांना ब्रेक, ठेकेदारांचे धाबे दणाणले

महापालिकेला राज्य शासनाकडून जो निधी देण्यात आला होता यातील ज्या कामांच्या वर्क ऑर्डर अद्याप दिल्या गेल्या नाहीत. त्या कामांना स्थगिती देण्याचे आदेश राज्य शासनाने आज काढले आहेत. महापलिकेच्या दलित वस्ती सुधार योजना, जिल्हा नियोजन समिती, रस्ते अनुदान यासह विशेष अनुदानातील सुमारे ३५ कोटींच्या कामांना आता ब्रेक लागला असून ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत.

जिल्हा बँक नोकरभरतीचा कारभार अपारदर्शक?

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने राबविलेली चारशे जागांसाठीची भरती प्रक्रिया पारदर्शीपणे पार पडलेली नाही. या प्रक्रियेमुळे अनेक उमेदवारांवर अन्याय झाला आहे. येत्या सात दिवसात बँकेने ही प्रक्रिया रद्द करावी. तसे न केल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा जिल्हा सुधार समितीचे अध्यक्ष अमित शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याबाबत शिंदे म्हणाले, बँकेने ज्युनिअर अससिस्टंट … Read more