Saturday, March 25, 2023

गलथान कारभाराचा कळस! मातंग समाजातील महिलेला दिला मराठा जातीचा दाखला

- Advertisement -

सांगली प्रतिनिधी । तासगाव तालुक्यातल्या जुळेवाडी येथे राहणाऱ्या एका महिलेला ती मातंग समाजाची असताना तिला मराठा समाजाचा दाखल देण्यात आल्याचा प्रकार काही दिवाणपूर्वी घडला. संबंधित महिलेने सर्व पुरावे देऊनही तासगावच्या प्रांत कार्यालयाने त्यांना मराठा जातीचा दाखल दिल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित महिलेने या अनागोंदी कारभाराला दोषी असणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून आमरण उपोषण सुरु केले आहे.

प्रेमल बाबासो कांबळे तासगाव तालुक्यातल्या जुळेवाडी येथे राहतात. या गावामध्ये दिनांक ८ जुलै २०१९ साली दोन गटात वादावादी आणि मारहाणीचा प्रकार घडला होता. या वादावादीमध्ये महिलेला मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी तासगाव पोलिसात ऍट्रॉसिटी कायद्या अंतर्गत मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने समाजकल्याण विभागाने प्रेमळ कांबळे या अनुसूचित जातीच्या असल्याचा पुरावा मागितला होता. त्यामुळे प्रेमल कांबळे यांनी प्रांत कार्यालयात जातीच्या दाखल्यासाठी अर्ज केला होता. त्यांनी दाखल्यासाठी लागणारे सर्व पुरावे अर्जासोबत जोडले होते.

- Advertisement -

काही दिवसांनी त्यांना प्रांत कार्यालयातून चक्क मराठा जातीचा दाखला देण्यात आला. हा जातीचा दाखला पाहिल्यानंतर त्यांना काहीच कळेना. अखेर त्यांनी या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आजपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.