‘यांच्या’ सल्ल्यानेच मी निवडणूक लढवत आहे!- आदित्य ठाकरे

‘मी निवडूक लढवावी अशी पहिली इच्छा आ.अनिल बाबर यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे आपण या ठिकाणी आमदार बाबर यांच्यासाठी नाही तर स्वतःच्या प्रचारासाठी आलो आहोत. अनिल बाबर यांना मत म्हणजेच मला मत. आजची सभा ही प्रचाराची सभा नसून आमदार अनिल बाबर यांची विजयी सभा आहे. निवडणूकीनंतर तीन महिन्यात टेंभूपासून वंचित गावांना पाणी देणार असून मुख्यमंत्री, अथवा आमदार अशा पदापेक्षा नवा महाराष्ट्र घडवायचाय, पुर्वी महाराष्ट्रात निवडणूकीचे वातावरण तरी दिसायचे पण आता सर्वत्र भगवे वातावरण झाले आहे, यावेळी विरोधी पक्ष शिल्लक आहेच कुठे? अशी बोचरी टीका युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली. विटा येथील महात्मा गांधी विद्यामंदिराच्या मैदानावर महायुतीचे उमेदवार आमदार अनिल बाबर यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

काश्मिरचे राहु दे; वाढती महागाई, रोजगार, भ्रष्टाचारावर बोला!- विश्वजीत कदम

महाराष्ट्राच्या निवडणुकीत कश्मिरमधील कलम ३७० चा उल्लेख भाजपच्या नेत्यांकडून होत आहे. राज्यातील वाढती महागाई, रोजगार, भ्रष्टाचार, बंद पडलेले उद्योगधंदे या विषयावर एक शब्द उच्चारला जात नाही. केवळ जनतेची दिशाभूल करून भावनिक मुद्द्यांना हात घातला जात आहे. जनतेने भाजपचे आता कारस्थान ओळखावे व सांगली पुन्हा कॉंग्रेसच्या विचाराची करण्यासाठी पृथ्वीराज पाटील यांना निवडून द्यावे, असे आवाहन कॉंग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आ.विश्वजीत कदम यांनी केले. सांगली विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ कर्नाळ येथे सभा पार पडली. या सभेत विश्वजीत कदम बोलत होते.

कर्नाटक मधून जतला पाणी देणार – मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा

सांगली प्रतिनिधी । महाराष्ट्र ही संतांची व थोर महापुरुषांची भूमी असून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याचे जवळचे संबध आहेत.गेल्या महिन्यांपूर्वी माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी जत तालुक्याला पाणी देण्याबाबत एक तास चर्चा झाली. त्यानुसार महाराष्ट्रातील सीमाभागाला पाणी देण्याची कर्नाटक राज्याची तयारी आहे. यासाठी तुबची-बबलेश्र्वर योजनेतून किंवा कोट्टलगीजवळ आलेले पाणी बोर नदीत सोडून जतच्या पूर्व भागाला दिल्याने, … Read more

जिरवा-जिरवीचे राजकारण करणे हा विरोधकांचा उद्योग – सदाशिव पाटील

खानापूर मतदारसंघात विकासाचा माइलस्टोन ठरणारे एकतरी काम विद्यमान आमदारांनी केलेले दाखवावे. अवैधधंद्यांना संरक्षण द्यायचे, कॉन्ट्रॅक्टदारांना पाठीशी घालून नकारात्मक राजकारण मतदारसंघात करत फक्त आडवा-आडवी जिरवा-जिरवीचे उद्योग करायचे, हा विरोधकांचा उद्योग आहे, अशी घणाघाती टीका अपक्ष उमेदवार माजी आमदार अ‍ॅड. सदाशिवराव पाटील यांनी केली.

‘जगण्यातील साधेपणा जपणारा राजकारणातील अपराजित योद्धा – आर.आर.पाटील’

साधेपणा, दाखवावा लागत नाही. तो असतोच मुळी तुमच्या रक्तात, वागण्यात आणि जगण्यातसुद्धा. महाराष्ट्राला आपल्या साधेपणाची शिकवण देणारा एक अवलिया तुम्हाला माहितेय..?? नसेल तर नक्की वाचा

पलूस-कडेगाव मतदार संघात ‘या’ तरुणांनाची लढत रंगणार

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे भाजपाने विशेष लक्ष केंद्रित केलेल्या पलूस-कडेगाव मतदार संघात कामाचा अजेंडा घेऊन पलूस येथील महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकांची ग्वाही घेऊन अखेर सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम देशमुख यांना साथ देणयाचे आवाहन केले. काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार डॉ. विश्वजित कदम यांची उमेदवारी काँग्रसने जाहीर केली आहे. त्यामुळे या दोन … Read more

लांडग्यांच्या हल्ल्यात ३८ मेंढ्या मृत्युमुखी, झालेल्या नुकसानीमुळे मेंढपाळ निराशेच्या गर्तेत

सांगली प्रतिनिधी। आटपाडी तालुक्यातील हिवतड येथे लांडग्यांच्या हल्ल्यात ३८ मेंढ्या मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. शेतात बसवलेल्या मेंढ्यांवर मध्यरात्री लांडग्यांच्या कळपाने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात ३८ लहान मोठ्या मेंढ्या ठार झाल्या. हा घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच लोकप्रतिनिधी, प्रशासनातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. कोल्हापूर जिल्ह्यातील सतीश शेळके, … Read more

या कारणामुळे गुंड चन्याचा खून करून आरोपींनी मृतदेह पोत्यात घालून कृष्णा नदीत टाकला

Chanya Mulik Murder

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे औदुंबर येथील कृष्णा नदीपात्रात वाळव्यातील गुंड रजनीश उर्फ चण्या मुळीक याचा खून करून टाकलेला मृतदेह सोमवारी आढळून आला होता. मात्र हा खून कोणी व कशासाठी केला याचा छडा लावण्यासाठी भिलवडी पोलीसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवली होती. गुन्हा घडल्यानंतर अवघ्या दहा तासांमध्ये तो उघडकीस आणून गुन्ह्यातील संशयित आरोपी आकाश अहिर, संदेश … Read more