विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीला वाळव्यात मोठा धक्का 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

राष्ट्रवादीच्या माजी नगराध्यक्षांसह पदाधिकार्‍यांना इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार निशिकांत पाटील यांना पाठींबा दिला आहे. विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला हा जबर धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगराध्यक्ष सुधीर पिसे, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांचे पुत्र सतेज पाटील, उरूण विकास सोसायटीचे संचालक शिवाजी पाटील, माजी नगरसेवक फारूख इबुशे, मुनीर इबुशे यांच्यासह उरूण परिसरातील पाटील, जाधव, मोरे, कोरे भावकीतील प्रमुखांनी इस्लामपूर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार निशिकांत पाटील यांच्या उमेदवारीला जाहीर पाठींबा दिला.

यावेळी राष्ट्रवादीच्या निशिकांत पाटील यांना पाठींबा जाहीर करताना माजी नगराध्यक्ष सुधीर पिसे यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर तोफ डागली. ते म्हणाले, शहरातील राष्ट्रवादीचे स्थानिक नेते विजय पाटील यांनी अनेकवेळा वैयक्तिक द्वेषापोटी अडचणीत आणण्याचा जाणीवपुर्वक प्रयत्न केला. खून, अ‍ॅट्रॉसिटी यासारख्या गुन्हयामध्ये ते अडकवू पाहत होते. माझ्यावर गुंडाकरवी हल्ल्यामागे त्यांची फुस होती. विकास आराखडयात माझ्यावर ७ आरक्षणे टाकली होती.

विविध मार्गाने माझ्यासारख्या अल्पसंख्याक समाजातील कार्यकर्त्याचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न वारंवार झाले. कार्यकर्त्यांला नडवायचं अनं रडवायचं ही एकच भूमिका त्यांची होती. १९७४ पासून जयंत पाटील यांच्याशी प्रामाणिक व निष्ठेने पदरमोड करून काम केले. याबाबत जयंत पाटील यांच्याकडे न्याय मागितला असता न्याय मिळालाच नाही. तरीही पक्ष व पार्टी प्रेमापोटी मी सामाजिक जीवनात कार्यरत राहिलो. परंतू आता संयम संपल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना पाठींबा दिला असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं.

Leave a Comment