‘आम्हाला संपविण्याची भाषा वापरणे हे अपरिपक्वतेचे लक्षण’ – खासदार संजयकाका पाटील

सांगली प्रतिनिधी । आमचं राजकीय जीवन संघर्षाचे आहे. संघर्ष आम्हाला नवा नाही. कोणाला संपविण्याचा विषय नाही. दोन वर्षात आम्हाला संपविण्याची भाषा वापरणे हे अपरिपक्वतेचे लक्षण आहे. बालिशपणे टोकाला गेले आहेत. लोकांच्या टाळ्या मिळविण्यासाठी बोलले असतील. मी त्यांच्या बोलण्याला महत्व देत नाही. असा टोला खासदार संजय काका पाटील यांनी युवानेते रोहीत पाटील यांचे नांव न घेता … Read more

सांगली महापालिकेच्या प्रसूतीगृहात अत्याधुनिक सोनोग्राफी मशिनचे लोकार्पण

सांगली प्रतिनिधी । महापालिकेच्या प्रसूतीगृहात सोनोग्राफी मशिनची आवश्यकता होती आता अत्याधुनिक मशिन उपलब्ध झाले आहे. त्यामुळे महिलांची गैरसोय थांबेल, असा विश्वास महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांनी व्यक्त केला. सांगली प्रसूतिगृहात अत्याधुनिक सोनोग्राफी मशिनचे लोकार्पण महापौर दिग्विजय सुर्यवंशी व आयुक्त नितीन कापडणीस यांच्याहस्ते झाले. महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीकडून अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन खरेदी करण्यात आले आहेत. मिरज … Read more

बँकांच्या खासगीकरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांची निदर्शने

सांगली प्रतिनिधी । बँक खाजगीकरण विरोधात युनायटेड कोरम ऑफ बँक युनियन्सच्या वतीने पुकारलेल्या देशव्यापी संपास जिल्ह्यात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील सुमारे साडेपाच हजार कर्मचारी काम बंद करून या आंदोलनात सहभागी झाले. संपामुळे जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांमधील सुमारे आठशे कोटींचे व्यवहार ठप्प झाले. युनायटेड कोरम ऑफ बँक युनियन्स या शिखर संघटने अंतर्गत, सांगली युनिट तर्फे आज बँक … Read more

“शेतकऱ्यांचे पैसे बुडवायचे धंदे बंद करा” – राजू शेट्टी

सांगली प्रतिनिधी ।  शेतकर्‍यांनी पिकवण्यापेक्षा विकायला शिकलं पाहिजे असं मत माजी खासदार राजू शेट्टी यांनी काढले. ते क्रांतिसिंह नाना पाटील सेवाभावी संस्थेच्यावतीने स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी आयोजित केलेल्या शिवार कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. शेट्टी म्हणाले, ग्रामीण भागातील शेतकर्‍यांना जगात काय नव तंत्रज्ञान आले आहे. याची माहिती मिळाली तरच तो आधुनिक शेती पिकवू शकेल. … Read more

बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळाल्याचा आनंद शेतकऱ्यांनी बैलांच्या सोबत गुलाल उधळून केला साजरा

सांगली प्रतिनिधी । महाराष्ट्रात बैलगाडी शर्यतीवर असणारी बंदी अखेर सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर शेतकऱ्यांच्यामधून जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे.सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे. बैलगाडीवरील शर्यती ठेवण्याच्या मागणीसाठी सांगली जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात वारंवार आंदोलन करण्यात आली होती. स्वाभिमानी शेतकरी,संघटना शेतकरी संघटना,रयत क्रांती संघटना याच्यासह अनेक राजकीय पक्षाने देखील बैलगाडी शर्यतीवरील … Read more

जयंत पाटलांवर टीका करताना पडळकरांची घसरली जीभ, म्हणाले कि…

.हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राजकारणात एकमेकांवर टीका करत असताना स्वतःचा तोल जाऊ नये याची काळजी राजकीय नेत्यांना घ्यावी लागते. मात्र, अनेक नेत्यांकडून भावनेच्या भरात अगदी खालच्या पातळीवर जाऊन विरोधकांवर टीका केली जातेच. अशी टीका करताना भाजप नेते तथा आमदार गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली आहे. “जलसंपदा मंत्री जयंत पाटील आपल्याला वाटतं फार हुशार आहे. मात्र, … Read more

सांगली महापालिकेत काम करणार्‍या प्रत्येकास आता फेसरीडिंग द्वारे द्यावी लागणार हजेरी

सांगली प्रतिनिधी । महापालिकेचे कामकाज गतीने व्हावे व कर्मचार्‍यांना शिस्त लागावी म्हणून आयुक्त नितीन कापडणीस यांनी कर्मचार्‍यांच्या हजेरीसाठी बुधवारपासून फेसरिडिंग प्रणाली सुरू केली आहे. तसेच मध्यंतरीच्या वेळेत हालचाल रजिस्टरद्वारे सुद्धा कर्मचार्‍यांवर वॉच ठेवला जाणार आहे. यामुळे लेटलतिफ व हजेरी लावून दांड्या मारणार्‍या कर्मचार्‍यांना आता आळा बसणार आहे. महापालिका कर्मचारी वेळेवर कामावर हजर नसतात, नागरिक हेलपाटे … Read more

भीमा-कोरेगावच्या पार्श्वभूमीवर कळंबी येथे 30 डिसेंबर रोजी वीर शिदनाक परिषदेचे आयोजन

सांगली प्रतिनिधी । पुणे जिल्ह्यातील कोरेगाव-भीमा भीमा येथे झालेल्या २८ हजार सैनिक विरुद्ध ५०० महार सैनिकांच्या झालेल्या लढाई मध्ये पेशव्यांचा पराभव झाला. या ऐतिहासिक लढाईला १ जानेवारी रोजी २०४ वर्षे पूर्ण होत आहेत. या लढाईत अग्रभागी असणारे सेनापती वीर शिदनाक यांच्या सांगली जिल्ह्यातील कळंबी या त्यांच्या मूळ जन्मगावी ३० डिसेंबर रोजी वीर शिदनाक शौर्य परिषदेसह … Read more

ईश्वरपूरच्या नामकरणासाठी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान मैदानात, नामकरणास दिला पाठिंबा

सांगली प्रतिनिधी । इस्लामपूरचे नामकरण ईश्वरपूर करावे, या मागणीचे लोन जिल्ह्यात पसरले असून त्याला नागरिकांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या श्रीशिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानने या नामकरणाच्या लढ्यात उडी घेऊन नामकरणास आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. या मागणीची तत्काळ दखल घेऊन नामकरण करावे, अन्यथा राज्यात मोठे आंदोलन उभारू, असा इशारा युवा हिंदुस्थानने … Read more

चालकाचा ताबा सुटल्याने वीस फूट खोल ओढ्यात कोसळली बस

सांगली प्रतिनिधी । शिराळा तालुक्यातील मेणी येथे चालकाचा ताबा सुटल्याने खासगी बस पुलाच्या कठडा आणि लोखंडी पाईप तोडून वीस फूट खोल ओढ्यात कोसळली. यात नऊ जण जखमी झाले. अपघातात बसचे आठ लाखांचे नुकसान झाले. बस गोव्याहून राजस्थानकडे जाताना पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. जखमींना कराड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असून कोकरुड पोलिसात घटनेची नोंद … Read more