बालविवाह झाल्याचे सिद्ध झाल्यास सरपंचांचे पद रद्द करा; रुपालीताई चाकणकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात अजूनही काही ठिकाणी बाल विवाहाच्या घटना घडत आहे. कोरोनाच्या काळात अशा प्रकारच्या विवाहाचे प्रमाण वाढले. याबाबात यॊग्य तो निर्णय घेण्यासाठी राज्य महिला आयोगावाच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपालीताई चाकणकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. “बालविवाह झाल्याचे सिद्ध झाल्यास स्थानिक अधिकारी, सरपंच यांचे पद रद्द करावे. तसेच … Read more

महिला सरपंचांनी कार्यपद्धतींचा अभ्यास करुन प्रभावीपणे काम करावे – डॉ. निलम गोऱ्हे

sarpanch

औरंगाबाद – गावाच्या विकासात सरपंचाची भुमिका महत्वाची असते, हे लक्षात घेऊन महिला सरपंचांनी कार्यपद्धती समजून घेत नियमावलीचा अभ्यास करुन गावाच्या विकासासाठी प्रभावीपणे काम करावे, असे आवाहन विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज तापडिया नाट्य मंदीर येथे आयोजित जिल्ह्यातील महिला सरपंच परिषदेत केले. यावेळी बोलताना श्रीमती गोऱ्हे म्हणाल्या की, महिला प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा … Read more

विंग ग्रामपंचायतीची तहकूब सभा 8 सप्टेंबरला होणार : सरपंच शुभांगीताई खबाले

कराड | कराड तालुक्यातील विंग येथे ग्रामसभा तहकूब कारणावरून काही ग्रामस्थांनी सोमवारी दि. 30 रोजी येथे निवेदनाद्वारे निषेध नोंदवला. निर्णय कोणाच्या तरी दबावाखाली घेतल्याचा स्पष्ट अरोप त्यामध्ये केला आहे. सह्याचे निवेदन ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे यावेळी दिले आहे. तसेच यावेळी तहकूब करण्यात आलेली सभा पुढे ढकलण्यात आलेली असून आता विंग ग्रामपंचायतीची सभा बुधवारी 8 सप्टेंबरला होणार … Read more

लयभारी सरपंच ! विहिरीत पडलेल्या महिलेचे पाण्यात उडी घेत वाचवले प्राण !

गजानन घुंबरे | परभणी तब्बल तासाभरापूर्वी विहिरीतील पाण्यात पडलेली महिला हालचाल करत असल्याचे लक्षात आल्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता पाण्यात उडी घेत , महिलेचे प्राण वाचविण्याची कौतुकास्पद कामगिरी जिल्ह्यातील एका सरपंचानी केली असुन सध्या या धाडसी युवा सरपंचांची सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे . 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास वाघाळा ता .पाथरी गावातील … Read more

सरपंचाना विमा संरक्षण देण्याची खासदार श्रीनिवास पाटील यांची मागणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोना आपत्कालीन परिस्थितीत गावामध्ये जोखमीचे काम करणा-या सरपंचाना विमा संरक्षण द्यावे अशी मागणी खा. श्रीनिवास पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासह उप मुख्यमंत्री व ग्राम विकास मंत्र्यांकडे केली आहे. गावातील कोरोना परिस्थिती हाताळताना सरपंचाना कोरोनाची बाधा होऊन त्यांच्या जिवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांना विमा कवच देण्यात यावे असे निवेदन … Read more

कोयना वसाहतीचे विद्यमान सरपंच राजेंद्र पाटील यांचे कोरोनाने निधन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील कोयना वसाहत ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच तसेच सरपंच परिषदेचे कराड तालुकाध्यक्ष सुर्यकांत उर्फ राजेंद्र आप्पासो पाटील (वय 52) याचे कोरोनाने आजाराने निधन झाले. कोयना वसाहत गावचे दोनवेळा सरपंच पद भूषिवले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोनाशी त्यांचा लढा चालू होता. सन 2005 ते 2010 व 2015 पासून आजअखेर त्यांनी सरपंच … Read more

लोकशाहीचा बाजार! नाशिक जिल्ह्यात सरपंचपदाचा लिलाव; लागली कोट्यवधींची बोली

नाशिक । राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील ग्रामीण भागात सध्या राजकीय हालचाली वाढल्या आहेत. प्रमुख राजकीय पक्षांसह स्थानिक गटांची सरपंचपदासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे. या साऱ्यात नाशिक जिल्ह्यातील एका घटनेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (Auction for the post of Sarpanch) जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील उमराणे येथे चक्क सरपंच पदाचा लिलाव करण्यात आला … Read more

जळगाव जिल्ह्यात माजी सरपंचावर थरारक खुनी हल्ला, 8 जणांवर FIR दाखल

जळगाव । शेतजमिनीच्या वादातून पाचोरा तालुक्यातील तारखेडा खु येथील माजी सरपंचावर 8 जणांनी हल्ला केला. या घटनेत तिघेजण गंभीर जखमी झाले आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात 8 जणांविरुद्ध गन्हा दाखल करण्यात आला असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना बुधवारी (दि.9) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. या घटनेत माजी सरपंच मधुकर दौलत पाटील (वय-57 रा. … Read more

जुलै ते डिसेंबर २०२० अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर आता प्रशासकाची नेमणूक होणार

मुंबई । जुलै ते डिसेंबर २०२० अखेर मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीवर आता प्रशासक नेमण्यात येणार आहे. राज्याच्या ग्रामविकास विभागाच्यावतीने याबाबतचे परिपत्रकही आज जारी करण्यात आले आहे. भाजपाने विद्यमान सरपंचानाच हे अधिकार देण्याची मागणी केली होती. मात्र ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी सरपंचांसहित इतर सदस्यांनाही प्रशासक म्हणून नेमण्यास प्रतिबंध केला आहे.  जुलै ते डिसेंबर २०२० अखेर राज्यातील १ … Read more

भावकीतील लोकांना क्वारंटाइन केल्यामुळे महिला सरपंचाला मारहाण

अहमदनगर । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परजिल्ह्यातून आपल्या गावात येणाऱ्या व्यक्तींना क्वारंटाइन ठेवण्यात येत आहे. शासनाच्या आदेशानुसारच ही कार्यवाही होत असली तरी ग्रामीण भागात यावरून तंटे सुरू झाले आहेत. अशीच एक घटना नगर जिल्ह्यात समोर आली आहे. भावकीतील लोकांना क्वारंटाइन केल्यामुळे दोन जणांनी महिला सरपंचाला मारहाण केली आहे. कर्जत तालुक्यातील चिंचोली काळदात येथे काल रात्री हा … Read more