राज्य सरकारने वीज ग्राहकांचा विश्वासघात केला ; राजू शेट्टी कडाडले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्य सरकारने घरगुती वीज ग्राहकांचा विश्वासघात केला आहे. लॉकडाऊनच्या काळातील एप्रिल, मे, जून महिन्याचे बील माफ करावे म्हणून आम्ही सातत्याने आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे झाले, वीज बिल जाळून झाली, महावितरण कार्यालयाला कुलुपे लावली. सरकारने सुरवातीला सकारत्मक प्रतिसाद दिला. ऊर्जामंत्र्यांनी गोड बातमी देतो म्हणून सांगितले. सरकारने जाहीर केले होते, आम्ही … Read more

सहकारमंत्री बाळासाहेब पाटलांच्या सह्याद्री कारखान्यानेच एफआरपीचा नियम मोडला; राजु शेट्टींचा आंदोलनाचा इशारा

raju shetty balasaheb patil

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्यातील अनेक कारखान्यांनी एक रकमी एफ आर पी न दिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेना आक्रमक झाली आहे. मागील आठवाड्यात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या राजारामबापू कारखान्यावर आंदोलन केल्यानंतर आता सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या सह्याद्री साखर कारखान्यावर आंदोलन करणार असल्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. खुद्द सहकार मंत्र्यांनी च शेतकऱ्यांची … Read more

कारखाना अधिकार्‍यांचा संशयास्पद मृत्यू प्रकरणी माजी आमदार प्रभाकर घार्गे, मनोज घोरपडे यांच्यावर गुन्हा दाखल

Prabhakar gharge

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके खटाव तालुक्यातील पडळ येथील के. एम. शुगर कारखान्यातील अधिकार्‍यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना. गुरुवारी (दि. 11) रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान, मारहाण करणार्‍या संशयितांना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने हॉस्पिटल परिसरात तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणात वडूज पोलिस ठाण्यातकारखान्याचे चेअरमन मनोज घोरपडे माजी आमदार … Read more

मराठा आरक्षण प्रश्‍नी रक्तपात एवढाच मार्ग आणि तो होणारच; खासदार छ. उदयनराजे भोसले यांचे स्फोटक वक्तव्य

udayanraje 1

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके आरक्षण ठेवायचं असेल तर ठेवाना आर्मी, नेव्ही, एअरपोर्समध्ये ठेवाना. तेथे कोण जाते एक तर मराठा, रजपूत, सीख बॉर्डरवर असतात. आज हे सगळे म्हणाले राहूद्या आपल्या कुटुबांवर अन्याय होत आहे आणि बॉर्डर सोडली तर काय होईल. सगळ्या गोष्टी पैशावर अंवलबून नसतात. जशी बेकारी वाढणार तशा या गोष्टी होणार. आता मराठा आरक्षणावर … Read more

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व कृष्णा हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

कराड प्रतिनिधी :- जागतिक महिला दिनानिमित्त सह्याद्री व्याघ्र प्रकल्प व कृष्णा हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील पाटण तालुक्यातील दुर्गम भागातील मळे, कोळणे, पाथरपुंज या तीन गावातील ग्रामस्थांसाठी तसेच वन्यजीव विभागातील सर्व कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरासाठी कृष्णा हॉस्पिटल तर्फे तज्ञ डॉक्टर यांनी सहभाग घेतला. तीन गावातील जवळपास दोनशेपेक्षा … Read more

प्राथमिक शाळेतील शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या; शिक्षण विभागात खळबळ

पाटण | प्राथमिक शिक्षकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात सदर घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी शिक्षकाने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाटण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंब्रूळे येथे कार्यरत असलेले शिक्षक विश्वनाथ लक्ष्मण लाड (वय- ४५) यांनी आपल्या … Read more

खटाव -माण तालुक्यात १२० पैकी ६८ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी, समविचारी पक्षाचा दावा – प्रभाकर देशमुख

Prabhakar deshmukh

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके नुकत्याच संपन्न झालेल्या खटाव व माण तालुक्यातील एकूण १२० ग्रामपंचायती पैकी ६८ ग्रामपंचायती वर राष्ट्रवादी काँग्रेस व समविचारी पक्षाचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झालं असल्याचे खटाव माण चे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते ,माजी विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी सांगितले. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील वडूज पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत देशमुख बोलत … Read more

कलिंगड मालवाहतूक एसटी पाचशे फूट खोल दरीत कोसळली; चालकासह दोघे गंभीर जखमी

सातारा :- महाड वरून कलिंगड भरून सातारच्या दिशेने येणारी देवरुख सावंतवाडी डेपोची मालवाहतूक एसटी केळघर घाटात पाचशे फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात मालवाहतुक एसटीच्या चालकासह आणखी एक सहकारी असे दोघेजण जखमी झाले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहाणी झाली नाही. दोघा जखमींवर उपचार सुरु आहेत. देवरुख सावंतवाडी डेपोची मालवाहतुक एसटी महाडवरुन साताऱ्याकडे कलिंगड घेऊन येत होती. … Read more

वांग नदीवरील पुलाचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील अंबवडे येथील वांग नदी जुना बंधारा पुलावरून दुचाकी नदीत घसरून दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी वांग नदीवरील जुना बंधारा पुलाचे काम करणार्‍या ठेकेदारावर कराड तालुका पोलिसात गुन्हा नोंद कण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येरवळे येथील शरद यादव हे त्यांची आई मालन, मुलगी तनुजा, मुलगा पियुष हे … Read more

दुचाकीच्या समोरासमोर धडकेत एकजण ठार

कराड प्रतिनिधी ।सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील पाचवड फाटा येथील साई मंगल कार्यालयासमोर दुचाकीची समोरासमोर जोराची धडक दिली. यामध्ये एकजण जागीच ठार झाल्याची घटना दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास घडली. तर एकजण गंभीर जखमी झाला.रामचंद्र शेटे (वय 49, रा. येळगाव, ता. कराड) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. जखमीचे नाव समजू शकले नाही. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती … Read more