मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात फरफट : झेडपीची पोरं 15 वर्षापासून धावतायत अनावणी रस्त्यावर

Competition Road Satara

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात मैदानी स्पर्धा राबविताना चक्क मैदान नेमकं गेली कुठे असा प्रश्न उपस्थित केला जावू लागला आहे. गेल्या 15 वर्षापासून जावळी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या स्पर्धा या महामार्गावर घेतल्या जात आहेत. वनवास 14 वर्षाचा असतो, तो पूर्ण झाला तरी झेडपीच्या शाळेच्या पोरांना अनवाणी रस्त्यावर मैदानी स्पर्धासाठी जीव धोक्यात घालून धावावे लागत … Read more

कोयना वसाहतमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ : लाखो रूपयांचे सोन्यांचे दागिने लंपास

Koyna Colony Karad

कराड प्रतिनिधी |सकलेन मुलाणी कराड शहराजवळील कोयना वसाहत परिसराला मंगळवारी रात्री चोरट्यांनी टार्गेट केले. बंद फ्लॅटचे दरवाजे तोडून चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केल्याची माहिती समोर आली आहे. तर लाखों रूपयांच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला असल्याचे फ्लॅट मालकांनी सांगितले. आज सकाळपासून कोयना परिसरात पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करत आहेत. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कोयना … Read more

कराड- पंढरपूर रस्त्यावर टॅंकरने दोन महिलांना उडविले : एक जागीच ठार

Accident News Karad- Pandharpur Road

सांगली | झरे (ता. आटपाडी) येथे कराड- पंढरपूर रस्त्यावर चालकाचा ताबा सुटल्याने भरघाव टँकरने दोन महिलांना उडविले. यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली. यामध्ये दोन दुचाकींचा चुराडा झाला. संगीता प्रकाश पवार (वय ४५, रा. तरसवाडी, ता. खटाव, जि. सातारा) असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. तर राणी सुरेश पवार … Read more

कराड- पाटण शिक्षक सोसायटी निवडणूक : पॅनेलचा उमेदवार व्हायचे तर पार्टी फंड कम्पलसरी

Karad-Patan Teachers Society

कराड प्रतिनिधी|विशाल वामनराव पाटील कराड- पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीची निवडणूक नुकतीच लागली असून तब्बल 19 जागांसाठी 67 जण रिंगणात आहेत. निवडणूक रिंगणात गुरूजन एकता पॅनेल आणि श्री. गुरूमाऊली पॅनेल आमनेसामने आहेत. परंतु या पॅनेलमधून अधिकृत उमेदवार ठरविण्यासाठी चक्क 3 ते 4 लाख रूपयांचा निधी (पार्टी फंड) पॅनेलकडे सोपवावा, असा आदेश दिला असल्याची चर्चा … Read more

बिबट्या बंगल्यात घुसला अन् परदेशी कुत्र्यांची केली शिकार

Leopard Attack

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील गुंजाळी गावात बंगल्याच्या सुरक्षेसाठी मालकाने 5 परदेशी कुत्री पाळली आहेत. परंतु याच कुत्र्याच्या आता सुरक्षेची काळजी घेण्याची परिस्थिती मालकावर उद्भवली आहे. कारण या कुत्र्यांवर बिबट्याने हल्ला केला असून 2 कुत्र्याचा फडशा पाडला आहे. कुत्र्यावरील हल्ला प्रकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, गुंजाळी येथे आनंद मुळीक … Read more

दुर्देंवी घटना : आईचं दूध श्वसन नलिकेत अडकल्याने चिमुकलीचा मृत्यू

mother's milk

कराड | साताऱ्यात एका चिमुकलीच्या घशात चाॅकलेट अडकल्याने दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. सदरची घटना ताजी असताना आता कराड तालुक्यातील कवठे येथे आईच्या अंगावर दूध पिताना श्वसन नलिकेत दूध अडकून अडीच महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत उंब्रज पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, स्वाती कृष्णत यादव … Read more

महाबळेश्वरातील बंगल्यामुळे शंभूराज देसाई अडचणीत : मंत्रीपद जाणार की राहणार?

Shamburaj Desai

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके नागपूर येथे सुरू असलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारविरोधात महाविकास आघाडी चांगलीच आक्रमक झाली आहे. विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एनआयटी भूखंड विक्री प्रकरणी आरोप करण्यात आला. आतापर्यंत शिंदे-फडणवीस सरकारमधील 5 मंत्र्यांवर आरोप करण्यात आले आहेत. अब्दुल सत्तार, संजय राठोड यांच्यानंतर आता सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व उत्पादन शुल्क … Read more

बिचकुले गावाने राबवली मुलींच्या शिक्षणासाठी ‘सायकल बॅंक’ संकल्पना

'Cycle Bank'

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके सातारा जिल्हा हा पश्चिम महाराष्ट्रातील प्रगतशील जिल्हा समजला जातो. मात्र, याच जिल्ह्यात मुलींना शिक्षणासाठी रोज अनेक किलोमीटर चा प्रवास करावा लागतो. कोरेगाव तालुक्यातील बिचुकले गावातील मुलींना शिक्षणासाठी रोज किमान 8 ते 10 किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागत आहे. या प्रवासात अनेक समस्यांना मुलींना सामोरं जावं लागत आहे. या समस्यांवर उपाय म्हणून … Read more

टोल देणार नाही अन् पासही घेणार नाही : पुणे- बेंगलोर महामार्गावर स्थानिक आक्रमक

Taswade Toll Plaza

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी तासवडे टोलनाका परिसरातील 10 गावांना टोल देणार नाही अन् पास घेणार नाही, अशा घोषणा स्थानिकांनी आज टोलनाक्यावर दिल्या. यावेळी मोठ्या प्रमाणावर स्थानिक जमा होवून त्यांनी निदर्शने केली. तसेच पूर्वीप्रमाणे आरसीबुकवरून गाड्यांना सोडावे व स्थानिक नागरिकांसाठी सेपरेट लेन राखीव ठेवावी अशी मागणी लोकांनी केली. पुणे- बेंगलोर महामार्गावर असलेल्या तासवडे टोलनाक्यावर आज … Read more

पोलिसांची एंन्ट्री : महाबळेश्वर बॅंकेच्या सभेत भागभांडवल व ठेवीवरून गोंधळ उडाला

Mahabaleshwar Bank

सातारा प्रतिनिधी |शुभम बोडके महाबळेश्वर तालुक्याची अर्थवाहिनी असणाऱ्या महाबळेश्वर अर्बन बँकेच्या 87 वी वार्षिक सभा नुकतीच पार पडली. या सभेत संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी 25 हजाराचे भागभांडवल अन् 1 लाखाची ठेव ठेवण्याच्या मुद्द्यावर आक्षेप घेवून हा ठराव रद्द करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, सत्ताधाऱ्यांनी हा ठराव रद्द करण्याचे आमच्या हातात नसल्याचे सांगताच मोठा गोंधळ उडाला. अखेर … Read more