व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

बँक ऑफ महाराष्ट्र सभासदांच्या हितासाठी कार्यरत : हरीश नेरूरकर

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील
बॅंक ऑफ महाराष्ट्र ही सर्वसामान्य सभासदांच्या हिताच्या योजना राबवत आहे. जास्तीत- जास्त महिलांनी एकत्र येऊन बचत गट स्थापन करावे. त्यांनी बँकेला संलग्न राहून लघुउद्योगातून स्वतःच्या कुटुंबासाठी व आपाल्या गटातील सर्व सदस्यासाठी धनसंचय करावा. बॅंकेकडून शेती गृह, गाडी व उद्योगासाठी सदैव कार्यरत राहील, असा विश्वास बँक मॅनेजर हरीश आनंत नेरूरकर यांनी व्यक्त केला.

बँक ऑफ महाराष्ट्रच्या तांबवे शाखेचा वर्धापन दिन उत्साहात पार पडला. बॅंकेच्या वर्धापन दिनाला तांबवे परिसरातील महिला बचत गट, शेतकरी वर्ग, बँकेचे सभासद उपस्थित होते.
यावेळी कर्ज वाटप करण्यात आले. शेतकरी बाबासो रघुनाथ पाटील यांना पीक कर्ज मंजूर करून प्रदान करण्यात आले. तसेच माऊली बचत गट- आरेवाडी व स्वयंस्फूर्ती बचत गट- उत्तर तांबवे या महिला बचत गटांना अंतर्गत कर्ज वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास प्रा. सतीश घाडगे, माजी जि. प. सदस्य अण्‍णासो पाटील, पाटण अर्बन बँकचे व्हाईस चेअरमन धनंजय ताटे, माजी सरपंच विठोबा पवार, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर संभाजी शिंदे, आप्पासो पाटील, प्रवीण पाटील, बँकेचे डेप्युटी मॅनेजर अनंत कुमार, अधिक काकडे, रामचंद्र माने, बँक प्रतिनिधी सुनील पाटील व पंढरीनाथ गरुड, बँक सखी मनीषा देसाई इत्यादी मान्यवर उपस्थित होते.