वासोटा किल्ल्यावर एकाच वेळी 80 बोटीतून 2 हजार पर्यटक

Vasota fort

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके सातारा जिल्हा निसर्ग संपन्न व गडकिल्यांचा असा आहे. महाबळेश्वर, पाचगणी, कास, तापोळा, प्रतापगड भागात सध्या पर्यंटकांची मोठी गर्दी पहायला मिळत आहे. अशातच सर्वात गड सर करण्यासाठी अवघड असणारा, ट्रेकिंगसाठी मनमोहित करणारा किल्ला म्हणजे वासोटा हा होय. या वासोटा किल्ला या पर्यटन स्थळी आज 80 बोट मधून तब्बल २ हजार पर्यटक आणि … Read more

मोटर सायकल चोरणारे 3 जण सातारा व सांगली जिल्ह्यातून तडीपार

Karad Tadipar

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके कराड तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मोटार सायकल वाहन चोरी करणाऱ्या टोळीप्रमुखांसह तिघांना तडीपार करण्यात आले आहे. याबाबतची कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी केली आहे. तिघांना सातारा जिल्हा व सांगली जिल्ह्यातील वाळवा, कडेगाव व शिराळा तालुक्यातून हद्दपार करण्यात आले आहे. याबाबतची पोलिस प्रमुख समीर शेख यांनी दिलेली माहिती अशी, कराड … Read more

अभिमानस्पद! साताऱ्याच्या सुपुत्राने बनवलं भारतीय बनावटीचे पाहिलं विमान; सरकार देणार 12 कोटी

Indian-Made Aircarft

कराड | भारतीय बनावटीचे पहिले विमान तेही सातारा जिल्ह्याच्या सुपुत्राचे लवकरच पहायला मिळणार आहे. ढेबेवाडी विभागातील अमोल यादव यांच्या विमान निर्मितीच्या पुढील संशोधनासाठी 12 कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या बैठकीत घेतला आहे. याबाबतची माहिती स्वतः अमोल यादव यांनी दिली आहे. पाटण तालुक्यातील सळवे येथील कॅप्टन अमोल यादव यांचे मूळ गाव आहे. भारतीय बनावटीचे पहिले … Read more

पुणे- सातारा राष्ट्रीय महामार्ग 97. 50% पूर्ण : आ. रविंद्र चव्हाण

Pune-Satara National Highway

सातारा | पुणे- सातारा राष्ट्रीय महामार्ग 97. 50% पूर्ण झाला आहे. या महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असून जे काही काम राहिले आहे. ते काम लवकरच पूर्ण करण्याचा शासनाचा मनोदय असल्याचे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात सदस्यांकडून वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहे. राज्यातील विकास कामांची माहिती … Read more

टेंभू-सयापूर-कोरेगाव उपसा जलसिंचन योजनेच्या चेअरमनपदी जे. के. पाटील

Tembhu-Sayapur-Koregaon Upsa Irrigation Scheme

कराड | टेंभू-सयापूर-कोरेगाव उपसा जलसिंचन योजनेची चेअरमन, व्हा. चेअरमनपदाची निवड टेंभू येथे पार पडली. चेअरमनपदी टेंभूचे जयवंत किसन पाटील (जे.के.) तर व्हा. चेअरमनपदी गोवारेचे मानसिंग बाबुराव सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. आर. मोरे यांनी काम पाहिले. चेअरमन, व्हा. चेअरमनपदाच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला. यावेळी निवडणूक … Read more

आप्पा मांढरेवरील फायरिंग बदला घेण्यासाठी : मुख्य सूत्रधाराची माहिती

Satara Police

सातारा | सातार्‍यातील राजवाडा परिसरात आप्पा मांढरे यांच्यावर फायरिंग केल्याप्रकरणी मुख्य दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. सुमारे दीड महिन्यापूर्वी घडलेल्या घटनेनंतर पोलिस संशयितांपर्यंत पोहोचले आहेत. सन 2017 मध्ये मंगळवार तळे परिसरात अक्षय वाघमळे या युवकाचा खून झाला होता व तो फायरिंग प्रकरणातील संशयित आरोपींचा मित्र होता. या घटनेतून फायरिंग करून मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी … Read more

चोरट्यांनी काढला राग अन् दुकानातील कपडेच जाळली

Vadgaon Haveli

कराड | सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर चादर टाकून वडगांव हवेली (ता. कराड) येथील चार दुकानांसह एका घराचे कुलूप उचकटून चोरट्यांनी हजारो रुपयांची रोकड लंपास केली. तसेच गावातीलच एका लाँड्री दुकानात चोरी करण्यासाठी गेलेल्या चोरट्यांना काहीच मिळाले नाही. त्यामुळे हताश झालेल्या चोरट्यांनी इस्त्रीसाठी आलेले सर्व कपडे एकत्र करून त्यावर इस्त्री चालू करुन ठेवली. त्यामुळे येथील सर्व कपडे जळून … Read more

निमसोडला घरफोडीत 15 लाखांचा ऐवज लंपास

Satara Police

मायणी | निमसोड (ता. खटाव) येथील संजय हिंदुराव घाडगे यांच्या बंद घराचे कुलूप व कोयंडा तोडून अज्ञातांनी सुमारे 15 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, संजय घाडगे हे व्यवसायानिमित्त उत्तर प्रदेशात राहतात. निमसोड येथे त्यांची आई वास्तव्यास असून त्या बुधवार दि. 21 डिसेंबर … Read more

पूर्ववैमन्स्यातून एकावर धारदार शस्त्राने वार : संशयित तीन आरोपी फरार

Karad Police

कराड |येथील भोई गल्ली येथे पूर्ववैमन्स्यातून चौघांनी एकावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना शनिवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर अन्य तिघेजण फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. शंकर भानुदास नलवडे (वय 29 रा. भोईगल्ली रविवार पेठ, … Read more

साताऱ्यातील युवकाचा मृत्यू : कूल्लू- मनालीत पॅराग्लायडिंग दरम्यान दुर्घटना

Paragliding accident

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातील डोभी भागात पॅराग्लायडिंग करताना युवकाचा अपघात झाला. या अपघातात महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एका 30 वर्षीय पर्यटकाचा शेकडो फूट उंचीवरून पडून मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, पॅराशूटचा बेल्ट निसटल्याने खाली पडून पर्यटकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात मृत्यू झालेला युवक हा सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथील आहे. सूरज शहा असे … Read more