साताऱ्यात शासकीय कार्यालयात तंदूर- बिर्याणी पार्टी

Satara Tandoor-biryani party

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा येथील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक एकच्या कार्यालयात भरदुपारी सर्व कर्मचारी आणि अधिकारी चक्क तंदूर बिर्याणीचा आस्वाद घेत असल्याचे निदर्शनास आले. याबरोबरच टीव्हीवर क्रिकेट मॅच बघण्यात मग्न झालेल्या या कर्मचाऱ्यांनी बाहेर कामासाठी आलेल्या पक्षकारांना मात्र ताटकळत ठेवले. सातारा तहसील कार्यालयाच्या आवारातच सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालय आहे. तालुक्यातील समाविष्ट गावांमधील … Read more

त्रिशंकू शाहूनगर, विलासपूरचा पाणीप्रश्न कायमचा सुटला : आ. शिवेंद्रसिंहराजे

MLA Shivendrasinhraje

सातारा | त्रिशंकू भागातील समस्या सोडविण्यासाठी नेहमीच अग्रेसर असलेल्या आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या अभ्यासपूर्ण पाठपुराव्यामुळे शाहूनगर आणि विलासपूर भागाचा पाणीप्रश्न कायमचा सुटला आहे. शाहूनगर आणि विलासपूरसाठी स्वतंत्र, विस्तारित आणि परिपूर्ण पाणीपुरवठा योजनेला राज्य शासनाकडून तब्ब्ल 32 कोटी 32 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. मुंबई येथे सोमवारी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी नगरविकास विभाग, … Read more

उर्फी जावेद या माॅडेलवर गुन्हा दाखल करा : पोलिसांना निवेदन

Urfi Javed Satara Police Case

सातारा | सोशल मिडियावरील उर्फी जावेद या माॅडेलवर गुन्हा दाखल करावा, यासाठी सातारा पोलिस ठाण्यात निवेदन देण्यात आले आहे. सातारा येथील महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका प्रतिभा शेलार यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल यांना निवेदन दिले आहे. मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक, महायुक्त कमिशनर आयडीआयजीएसपी यांच्यासह संबधित ठिकाणी निवेदन मेलद्वारे पाठवलेले आहे, तरीही अजून गुन्हा दाखल … Read more

डाॅक्टर नोकरीला सरकारी दवाखान्यात अन् सेवा सह्याद्री हाॅस्पीटलला : रूग्णांची लुबाडणूक

Satara Civil Hospital

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके डाॅक्टर नोकरीला सरकारी रूग्णालयात, कमाई सरकारी अन् सेवा खासगी दवाखान्यात अशी परिस्थिती सातारा जिल्हा रूग्णालयात असल्याचे समोर आले आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी चक्क डाॅक्टराला दमबाजीच केली. यामुळे सरकारी दवाखान्यात आलेल्या गरीब, गरजू रूग्णांना खासगी दवाखान्यात पाठवून लुबाडणूक करत असल्याचे समोर आहे. तेव्हा आता डाॅ. मानेवर कारवाई होणे … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अचानक सातारा दाैऱ्यावर : प्रशासनाची पळापळ

Eknath shinde

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्हा दौऱ्यावर आज येत आहेत. आज सकाळी 11 वाजता दरे गावात मुख्यमंत्र्याचे आगमन होणार आहे. मुख्यमंत्री अचानक महाबळेश्वर दाैऱ्यावर येणार असल्याने प्रशासनाची चांगलीच भंबेरी उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या दरे या गावात आज येणार आहेत. खासगी कारणाने मुख्यमंत्री गावी येणार … Read more

पंतप्रधान देशाचे की गुजरात राज्याचे : आ. शशिकांत शिंदे

Sashikant Shinde & Modi

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके देशाचे पंतप्रधानांनी केंद्र सरकारमधील असलेल्या आपल्या अधिकाराचा दुरूपयोग करून देशामध्ये इतर नव्हे तर फक्त आणि फक्त गुजरातमध्येच मोठे मोठे प्रकल्प नेण्याचा प्रयत्न करत आहेत. महाराष्ट्र मधील ‘फॉक्सकॉन’ ‘ब्लक ड्रग’ नंतर ‘सी-295 लष्करी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट’ असे सगळे प्रकल्प एक एक करून गुजरातला नेण्याचा घाट घातला जात आहे. प्रकल्पाच्या संदर्भात होत असलेली … Read more

पालकमंत्र्यावर आ. बाळासाहेब पाटील यांचा पलटवार म्हणाले, सत्तेत कोण ते जनता ठरवेल

Satara Shamburaj & Balasheb

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पालकमंत्री म्हणून सगळ्या जिल्ह्याची जबाबदारी असते. सत्तेत कोण 5 वर्षे की 15 वर्षे राहील ही जनता ठरवेल, त्यामुळे कोणी सांगायची गरज नाही असे म्हणत आ. बाळासाहेब पाटील यांनी पालकमंत्र्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. राज्यात 15 वर्षे शिंदे- फडणवीस यांची सत्ता राज्यात राहणार असल्याचा वक्तव्यावर आ. पाटील यांनी उत्तर दिले. सातारा येथे … Read more

ग्रामीण भागात ‘आनंदाचा शिधा’ पोचलाच नाही; सरकारकडून गरिबांची चेष्टा??

eknath shinde anandacha shidha

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी दिवाळीनिमित्त राज्य सरकारने अंत्योदय आणि केशरी शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानांतून शंभर रुपयांत रवा, साखर, तेल, चणाडाळीचे किट देण्याचा निर्णय घेतला. मात्र आता दिवाळी उद्यावर येऊन ठेपली असतानाही अद्यापही अनेक गरजूना याचा लाभ मिळालेला नाही. कराड तालुक्यातील एकूण 55213 लाभार्थ्यांपैकी फक्त कराड शहरातील १० हजार लाभार्थ्यांना सरकारच्या दिवाळी आनंदाचा शिधा किटचा लाभ … Read more

सातारा RTO कार्यालयात लाचेची मागणी : संभाषणातील चव्हाण साहेब, एजंट, क्लार्क अन् मॅडम कोण?

Satara Rto

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी साताऱ्यातील आरटीओ कार्यालयात अधिकाऱ्यांकडून पैशाची मागणी होत असल्याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कार्यालयातील कर्मचारी आणि एजंटमधील संभाषणाचा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या व्हिडिओत चव्हाण साहेब कोण, संभाषणात असलेले एजंट, क्लार्क अन् मॅडम या सर्वांचाच लाच मागताना समावेश आहे. त्यामुळे आता या सर्वांवर कारवाई … Read more

भाजपाकडून शिवराज पाटील यांचा निषेध, जोडे मारो आंदोलन

BJP Satara Protest

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके काँग्रेसचे नेते, माजी गृहमंत्री, माजी राज्यपाल शिवराज पाटील- चाकूरकर यांनी भगवतगीतेचा दाखला देताना अत्यंत सडक्या मेंदूचे आणि काँग्रेसच्या सडक्या विचारधारेचे प्रदर्शन करत अपशब्द वापरले. त्याबद्दल भाजपा सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी आणि सातारा ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्र इंगळे यांच्या नेतृत्वाखाली पोवई नाका सातारा येथे निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच शिवराज पाटील यांच्या … Read more