भाजपाकडून शिवराज पाटील यांचा निषेध, जोडे मारो आंदोलन

BJP Satara Protest

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके काँग्रेसचे नेते, माजी गृहमंत्री, माजी राज्यपाल शिवराज पाटील- चाकूरकर यांनी भगवतगीतेचा दाखला देताना अत्यंत सडक्या मेंदूचे आणि काँग्रेसच्या सडक्या विचारधारेचे प्रदर्शन करत अपशब्द वापरले. त्याबद्दल भाजपा सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी आणि सातारा ग्रामीणचे अध्यक्ष राजेंद्र इंगळे यांच्या नेतृत्वाखाली पोवई नाका सातारा येथे निषेध आंदोलन करण्यात आले. तसेच शिवराज पाटील यांच्या … Read more

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा : सातारा जिल्हा काॅंग्रेसची मागणी

Satara District Congress

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यामध्ये कोरेगाव, खंडाळा, महाबळेश्वर, खटाव, कराड या पाच तालुक्यांच्या 77 गावांमध्ये 600 हेक्टर वरील पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्य शासनाने हेक्टरी 75 हजार रुपये अनुदान जाहीर करून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी … Read more

साताऱ्याचे नवे एसपी समीर शेख

Satara SP Sameer Shaikh

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके गडचिरोलीचे अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख यांची पदोन्नतीने सातारचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. यापूर्वीही साताऱ्यात सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून समीर शेख यांनी धडक कामगिरी बजावली होती. तर सध्याचे एसपी अजय कुमार बन्सल नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. गृहमंत्रालयाचे सहसचिव व्यंकटेश भट यांच्या आदेशानुसार राज्यातील 24 आयपीएस पोलिसांच्या अधीक्षकांच्या बदल्याचे आदेश … Read more

साताऱ्यात ‘तरस’ रात्री रस्त्यावर तर सकाळी घरात घुसले, गोंधळ उडाला

Satara Taras

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पुणे- सातारा महामार्गावरून सातारा शहराच्या हद्दीमध्ये प्रवेश करताना लिंब फाट्यावरून मोळाच्या ओढ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्री 8.30 वाजता हा तरस प्राणी प्रवाशांना दिसला होता. त्यानंतर चक्क सातारा शहरातील मंगळवार पेठेतील एका घरात तरस घुसला होता. त्यामुळे नागरिकांच्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदरचा तरस एक आहे की अनेक याबाबत आता चर्चांना … Read more

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्तीचा सातारा जिल्ह्यातील 82 हजार 435 शेतकऱ्यांना मिळणार लाभ

Mahatma Jyotirao Phule farmer loan waiver

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभ वितरण शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आला. मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमास पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह मंत्री मंडळातील इतर सदस्य, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे … Read more

सातारा जिल्हा परिषदेचे कंत्राट मिळाल्याचे सांगून 38 लाखांची फसवणूक

ZP Satara

पुणे | सातारा जिल्हा परिषदेच्या एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण संस्थेत लागणार्‍या वस्तूंचा पुरवठा करण्याचे कंत्राट मिळाल्याचे सांगून व्यावसायिकाला तब्बल 38 लाख 20 हजाराला गंडा घातला आहे. या प्रकरणी साताऱ्यातील एकासह पुण्यातील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार पोलिसांनी अमोल वसंत क्षीरसागर (वय- 38, रा. … Read more

PFI संघटनेशी संबधितांची चाैकशीसाठी हिंदू एकताचे जिल्हाभर निवेदने

Hindu Ekata PFI

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी हिंदुत्ववादी संघटनांनी काही लोकांचा PFI शी संबंध असल्याबाबतच्या शक्यतेवरून चौकशीची मागणी करण्यात आली आहे. कराड तालुक्यातील रेठरे बु, वडगाव हवेली, खंडाळा, फलटण, भुईंजसह जिल्ह्यात अनेक ठिकाणच्या पोलिस स्टेशनमध्ये याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. कराड येथे हिंदू एकता आंदोलन समितीकडून निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, … Read more

ॲथलेटिक्स स्पर्धा : कुवेतमध्ये वर्णेच्या अनुष्काला सुवर्णसह कास्य पदक

Sports Anushka Kumbhar

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा तालुक्यातील वर्णे येथील धावपटू अनुष्का कुंभार हिने कुवेतमधील एशियन ॲथलेटिक्स स्पर्धेत गगनाला गवसणी घातली. तिने ‘मिडले रिले’ या स्पर्धेत सुवर्ण व 400 मीटर वैयक्तिक स्पर्धेत कांस्य पदक पटकाविले आहे. तिच्या या सुवर्ण यशामुळे साताऱ्याचा सातासमुद्रपार झेंडा फडकला आहे. ग्रामीण भागातील अत्यंत सामान्य कुटुंबातील अनुष्काने कामगिरीतील सातत्य कायम राखले आहे. … Read more

सातारा जिल्ह्यातील कारखान्यांनी गुजरातचा दाैरा करावा : सचिन नलवडे

Karad Sugher Price Meeting

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी गुजरातमध्ये साखर कारखाने ऊसाला चार हजाराच्या पुढे दर देतात. सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यानी गुजरातचा एखादा अभ्यास दौरा काढून ते कारखाने एवढा कसा देतात, हे शिकून घ्यावे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात एकरकमी एफआरपी दिली जाते. तसेच तीन हजार रुपयाच्या पुढे ऊस दर दिला जात आहे. मग सातारा जिल्ह्यातच उस दर कमी का … Read more

मंत्री पदाचा दर्जा : माजी आ. नरेंद्र पाटील पुन्हा अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अध्यक्षपदी

Narendra Patil

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी अण्णासाहेब पाटील अर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी पुन्हा माथाडी कामगार नेते व माजी आ. नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. त्याबाबतचे पत्र आज शासनाने काढले आहे. मराठा समाजातील मुलांना व्यावसायिक कर्ज मिळावे, यासाठी नरेंद्र पाटील यांचे मोठे योगदान आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांना पदावरून हटविण्यात आले होते. त्यानंतर … Read more