देशातील 75 बँकांच्या डिजिटल बँकींग कार्यप्रणालीत साताऱ्याच्या बँक ऑफ महाराष्ट्रचाही समावेश

Satara Banking

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त देशातील 75 डिजिटल बँकींग युनिटची स्थापना करण्यात आली असून यामध्ये सातारा येथील बँक ऑफ महाराष्ट्रचाही समावेश आहे. डिजीटल कार्यप्रणालीचे लोकार्पण दूरदृष्य प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यावेळी दूरदृष्य प्रणालीद्वारे केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सितारामण उपस्थित होत्या. तर पायोनिर टॉवर, सातारा येथून खासदार धनंजय महाडीक, आमदार … Read more

सदर बझारमध्ये बीफ हाॅटेल विरोधात महिला आक्रमक

Satara Beef Hotel

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरातील सदर बझार येथील बिस्मिल्लाह आणि मदिना या दोन हॉटेलमध्ये बीफ विक्री केली जाते. गेल्या महिन्यात सातारा नगर पालिकेने कारवाई करत ही दोन्ही हॉटेल सील केली होती. सातारा नगरपालिकेने अटी- शर्तीचे नियम घालून ही हॉटेल संबंधितांकडून लेखी लिहून घेत पुन्हा सुरू करण्यास परवानगी दिली. या बीफ हाॅटेल विरोधात स्थानिक … Read more

साताऱ्यात भाजप अन् राष्ट्रवादीचा धुव्वा : भणंग ग्रामपंचायतीत सर्व जागांवर अपक्ष विजयी

Gram Panchayt Election

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके साताऱ्यातील जावली तालुक्यातील भणंग ग्रामपंचायतीत चक्रावून सोडणारा निकाल लागला. भाजप आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना धक्का देत अपक्षांनी बाजी मारली. भणंग ग्रामपंचायतीच्या 7 जागांसाठी राष्ट्रवादी अन् भाजपाचे 14 उमेदवार रिंगणात होते. या सर्वांचा अपक्ष उमेदवारांनी पराभव केला आहे. केवळ राष्ट्रवादीचा सरपंच पदाचा उमेदवार निवडूण आला आहे. साताऱ्यात जावली तालुक्यातील भणंग या एकमेव … Read more

राज्यातील पंधरा हजार शाळा बंदला विरोध : अशोकराव थोरात

Ashokrao Thorat

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आधी गृहपाठ बंद, आता शाळा बंद, काही दिवसांनी गरिबांचे शिक्षण बंदचा निर्णय होईल हे सर्व अजब आहे. राज्यातील वीसच्या आत पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय सध्याच्या शिंदे फडणवीस सरकारने घेतला आहे. त्यास राज्यातील 20 पेक्षा कमी पट असलेल्या 15 हजार शाळा बंदला विरोध असल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ … Read more

वासोटा किल्ला आजपासून पर्यटनासाठी सुरू; वाढीव शुल्कामुळे खिशाला बसणार चाप

vasota fort

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेला वासोटा किल्ला आजपासून पर्यटकांसाठी खुला करण्यात येणार आहे. पावसाळ्यात हा किल्ला पर्यटनासाठी बंद ठेवण्यात आला होता मात्र आता हा किल्ला पर्यटकांना फिरण्यासाठी सुरु करण्यात येणार आहे. येथे असलेली स्वयंभू तीर्थक्षेत्र नागेश्वर,चक्रदेव, पर्वत ही ट्रेकिंगची पर्यटन स्थळे पर्यटकांना खुली होणार आहेत. मात्र पर्यटकांना येथे फिरण्यासाठी … Read more

स्टार्टअप स्पर्धेमुळे सामान्य तरुणांच्या नव संकल्पनांना व्यासपीठ : रुचेश जयवंशी

Satara Strat up

सातारा | स्टार्टअप स्पर्धेमुळे सामान्य तरुणांच्या नव संकल्पनांना व्यासपीठ मिळवून दिल्याने त्याचा जास्तीत जास्त उमेदवारांनी फायदा करुन घ्यावा व प्रभावीपणे आपल्या नव्या संकल्पनांचे सादरीकरण करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नानिन्यता विभागामार्फत कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी विद्यालय सातारा येथे जिल्हास्तरीय स्टार्टअप यात्रेचे सादरीकरण स्पर्धा पार पडली. त्यावेळी श्री. जयवंशी … Read more

शिंदे- फडणवीस सरकारने 100 दिवसांत 700 शासन निर्णय काढले : आ. शंभूराज देसाई

Shamuburaj- Shinde- Fadnvis

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी जिरायती क्षेत्रासाठी साडेतेरा हजार रुपये आणि बागायतीसाठी साडेसव्वीस हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. मदतीची दोन हेक्टरपर्यंत मुदत तीन हेक्टरपर्यंत वाढवली आहे. शंभर दिवसांत शिंदे-फडणवीस सरकारने जनकल्याणाचे 700 शासन निर्णय काढले, असल्याची माहिती उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री … Read more

साताऱ्यात मेडिकल काॅलेजचे काम सुरू होण्यासाठी बेमुदत उपोषण सुरू

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा येथील शासकीय मेडिकल कॉलेजचे काम सुरू करावे आणि विस्थापित केलेल्या गाळेधारकांचे पुनर्वसन करावे, या मागणीसाठी खेड ग्रामपंचायत सदस्य निखिल यादव यांनी मेडिकल कॉलेजच्या जागेवर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आ. महेश शिंदे यांच्या समर्थकांनी गुरूवारी मेडिकल कॉलेजचे बांधकाम बंद पाडले होते. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीचे सदस्य निखिल यादव, कामेश कांबळे … Read more

ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकात राष्ट्रावादीचा झेंडा फडकावा : आ. बाळासाहेब पाटील

पुसेसावळी | मतदार संघातील गावांचे अनेक प्रश्न मार्गी लावले असुन पुसेसावळी भागातही अनेक विकासकामे केलेली आहेत. आता आगामी काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती व मार्केट कमिटीच्या निवडणुका येत आहेत. या निवडणुकीच्या दृष्टीने सर्वानी काळजी घेणं आवश्यक आहे. गावाचं विकासाचं केंद्र आहे ते ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून आपल्याला हे काम करायच आहे. त्यासाठी … Read more

साताऱ्यात आयुर्वेदिक केंद्रात बीड जिल्ह्यातील 55 वर्षीय महिला मृत्यू

Satara Taluka Police

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा येथील यवतेश्वर येथे असलेल्या आयुर्वेदिक केंद्रात परजिल्ह्यातील 55 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. पंचकर्म केल्यानंतर महिलेचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. शैलजा चौधरी असे मृत महिलेचे नाव आहे. घटनास्थळावरू मिळालेली माहिती अशी, सातारा शहरापासून कास रोडला यवतेश्वर येथे एक प्रसिध्द पंचकर्म केंद्र आहे. येथे जिल्ह्यासह परजिल्ह्यातील लोक उपचारासाठी … Read more