व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

साताऱ्याचे नवे एसपी समीर शेख

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
गडचिरोलीचे अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख यांची पदोन्नतीने सातारचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. यापूर्वीही साताऱ्यात सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून समीर शेख यांनी धडक कामगिरी बजावली होती. तर सध्याचे एसपी अजय कुमार बन्सल नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. गृहमंत्रालयाचे सहसचिव व्यंकटेश भट यांच्या आदेशानुसार राज्यातील 24 आयपीएस पोलिसांच्या अधीक्षकांच्या बदल्याचे आदेश निघाले होते. तर उर्वरीत प्रतिक्षा यादीत आहेत.

अजय कुमार बन्सल यांनी 7 ऑक्टोबर 2020 रोजी साताऱ्याचे एसपी म्हणून गडचिरोली येथूनच पदभार स्वीकारला होता. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी तब्बल 149 जणांच्या टोळीला जिल्ह्यातून तडीपार केले होते. तसेच संघटित गुन्हेगारी त्यांनी मोडीत काढत 85 जणांना तुरुंगात पाठवले. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तब्बल 328 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. बन्सल यांनी 56, 57 च्या प्रस्तावद्वारे 91 जणांना तडीपार केले बंसल यांच्या कार्यकाळात एलसीबीने संपूर्ण जिल्ह्यात धडक कारवाई केली 18 खुनाचे गुन्हे उघडकिस जाणून 54 आरोपींना अटक केली. नऊ दरोड्याची प्रकरणे यशस्वीरित्या तपासून यामध्ये 46 जणांना अटक केली होती.

गडचिरोलीचे अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख यांची सातारा पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे. समीर शेख यांनी साताऱ्यात उपअधीक्षक म्हणून पदभार 2018 मध्ये स्वीकारला होता. साधारण 17 महिने त्यांनी साताऱ्यात धडक कामगिरी केली आहे. सुरूची राडा प्रकरणाचा तपास समीर शेख यांनी केला होता. शंभर हून अधिक जणांवर गुन्हा दाखल केला होता.