Monday, January 30, 2023

ग्रामीण भागात ‘आनंदाचा शिधा’ पोचलाच नाही; सरकारकडून गरिबांची चेष्टा??

- Advertisement -

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
दिवाळीनिमित्त राज्य सरकारने अंत्योदय आणि केशरी शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानांतून शंभर रुपयांत रवा, साखर, तेल, चणाडाळीचे किट देण्याचा निर्णय घेतला. मात्र आता दिवाळी उद्यावर येऊन ठेपली असतानाही अद्यापही अनेक गरजूना याचा लाभ मिळालेला नाही. कराड तालुक्यातील एकूण 55213 लाभार्थ्यांपैकी फक्त कराड शहरातील १० हजार लाभार्थ्यांना सरकारच्या दिवाळी आनंदाचा शिधा किटचा लाभ झाला आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात अजूनही हे किट पोचलं नाही. त्यामुळे सरकारचा १०० रुपयात किट देण्याचा निर्णय हा फक्त जुमला होता का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कराड तालुका प्रशासनाकडे आनंदाचा शिधा या सरकारच्या दिवाळी किटमध्ये चार वस्तूंचा समावेश आहे. गोरगरिबांना शिंदे फडणवीस सरकारने शंभर रुपयात हे कीट उपलब्ध केले आहे. त्यामुळे गरिबांच्या आनंदाचे वातावरण आहे परंतु उद्या दिवाळीचा पहिला दिवस असताना अद्याप हे किट कराड पुरवठा शाखेपर्यंत पोहोचले नाही. त्यामुळे ग्रामीण भागात दुकानदारांच्या कडे हे कीड जायला अद्याप अजून वेळ लागणार असून दिवाळी सुरू झाली तरी हे किट गोरगरिबांना मिळाले नाही

- Advertisement -

गोडेतेल न आणल्याने या आनंदाची शिधा या किटचे अद्याप वाटप करण्यात आलं नाही अशी माहिती कराड प्रशासन पुरवठा विभागाने दिली आहे . त्यामुळे 45000 लोक अद्याप या शिद्यापासून वंचितच राहिले आहेत. दिवाळी उद्या असून अजूनही शिधा वाटप न झाल्याने गरिबांच्या तोंडाला सरकारने पान पुसल्याचा हा प्रकार आहे.