नवरात्रीत “हाॅरर शो” साठी भाड्याने ग्रेडसेपरेटरची पालिकेकडे मागणी

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरातील पोवई नाक्यावर असलेला ग्रेडसेपरेटर मंडळाचा देखावा दाखविण्यासाठी भाड्याने मागण्यात आलेला आहे. याबाबतचा अर्ज सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना बाल गोपाल गणेश मंडळाने दिले आहे. नवरात्र उत्सवात ग्रेडसेपरेटर भाड्याने घेवून त्यामध्ये “हाॅरर शो” दाखविणार असल्याचे अर्जात म्हटले आहे. या मागणीमुळे सध्या ग्रेडसेपरेटरच्या कामावर सातारकरांकडून टीकस्त्र होवू लागले आहे. मुख्याधिकारी यांना … Read more

साताऱ्यात अतिक्रमण कारवाईवेळी पालिका कर्मचाऱ्यांवर खोके धारकांची दादागिरी

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा नगरपालिकेच्या वतीने पोवई नाका, मोती चौक आणि पंचपळे हौद या ठिकाणी कारवाई करून 11 खोकी हटवण्यात आली. यावेळी अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध करत काही खोकेधारकांनी आणि संघटनांनी पालिका कर्मचाऱ्यांवर दादागिरी करत वाद घातला. दंगा करणाऱ्यांना मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी चांगलेच खडेबोल सुनावले आहे.. सातारा शहरात अतिक्रमणांनी मोठे हातपाय पसरले … Read more

अहो आश्चर्यम!! काळ्या कुळकुळीत म्हशीला झाले पांढरेशुभ्र रेडकू

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके साताऱ्यातील कराड तालुक्यातील येरवळे जुने गावठाण येथे चक्क म्हैसीला पांढरे शुभ्र रेडकू झाल्याची आश्चर्यकारक घटना घडली आहे. हा चमत्कार पाहण्यासाठी येरवळेसह परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गर्दी केलीये. पांढऱ्या रेडकाला पाहून म्हशीचे मालक नितीन मोहिते आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही आश्चर्याचा धक्का बसला. काळ्याभोर म्हशीला काळेच रेडकू होत असते मात्र येरवळे जुने गावठाण … Read more

रेकॉर्डवरील गुंडाला सापळा रचून पकडला; दोन पिस्टल, काडतुसांसह 1 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी देशी बनावटीची पिस्टल विक्री करणारा अट्टल गुन्हेगार परशुराम रमेश कुरवले यास स्थानिक गुन्हे शाखेने नामिशक्कल लढवत माण तालुक्यातील शेणवडी येथून ताब्यात घेतले. सदर आरोपीच्या बोगस मित्राच्या नावे कॉल करून त्याला शेनवडी या ठिकाणी बोलवून पोलिसांनी सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतले. यावेळी त्याच्याकडून दोन पिस्टल, काडतुसे व एक दुचाकी असा एक … Read more

अंगावर दगडी भिंत कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू; 3 गंभीर जखमी

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यामध्ये कुडाळ भागात गेल्या दहा दिवसापासून सतत पाऊस पडत आहे त्यामुळे बऱ्याच भागात छोटे मोठे नुकसान होत आहेत. त्यातच पावसामुळे एक दुर्दैवी घटना घडली आहे. पावसाच्या या तडाख्यात दहा फूट उंचीची दगडी भिंत कोसळली व भिंतीच्या शेजारी बसलेल्या प्रभावती मतकर , मुक्ताबाई महामुलकर, कुसुम महामुलकर, पद्मावती महामुलकर … Read more

ट्रॅव्हल्सची आयशरला धडक; 2 जखमी

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील इंदोली फाट्यावर नविन ब्रिज जवळील सातारा ते कराड लेन वर आयशर आणि ट्रॅव्हल्स मध्ये भीषण अपघात झाला. यामध्ये ट्रॅव्हल्स मध्ये असलेला एक पॅसेंजर आणि आयशर चालक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, इंदोली फाटा नविन ब्रिज जवळ आज सातारा ते कराड लेन … Read more

साताऱ्याच्या साक्षी पाटील यांची NASA मध्ये प्रोजेक्ट साठी निवड; ठरल्या देशातील एकमेव व्यक्ती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कराड तालुक्यातील धोंडेवाडी गावच्या कन्या साक्षी चंद्रकांत पाटील यांची नॅशनल एयरोनॉटिक्स अँड स्पेस एडमिनिस्ट्रेशन (NASA) या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेत प्रोजेक्ट साठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे त्या भारतातील एकमेव कॅंडिडेट आहेत. साक्षी यांची निवड सातारकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. साक्षी पाटील यांनी … Read more

हॅलो महाराष्ट्रतर्फे 3 दिवसीय योग शिबीराचे आयोजन; पोलीस- पत्रकारांची उपस्थिती

कराड । गणेशोत्सवाच्या निमित्ताने हॅलो महाराष्ट्रच्या वतीने कराड येथे ३ दिवसीय योगशिबीर आयोजित करण्यात आले आहे. काल शनिवार दिनांक ०३-०९-२०२२ रोजी या योगशिबिराचे उदघाटन उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. रणजित पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी बी. आर. पाटील, हॅलो महाराष्ट्र समूहाचे संस्थापक सीईओ आदर्श पाटील, राष्ट्रीय कीर्तीचे योगाचार्य श्रीकृष्ण … Read more

अवसरी येथे 22 वर्षे युवक तलावात बुडाला

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील अवसरी येथे जनावरे धुण्यासाठी घेऊन गेलेला बावीस वर्षीय युवक बुडाल्याची घटना घडली आहे. दत्ता रघुनाथ शिर्के (रा. अवसरी, या. पाटण) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पाटण तालुक्यातील अवसरी येथील दत्ता शिर्के हा युवक जनावरे करण्यासाठी घेऊन गेला होता. त्यानंतर जनावरे धुण्यासाठी पाझर तलावाजवळ त्याने … Read more

वि.स.खांडेकर यांच्या साहित्याची नव्या पिढीला ओळख करून देणे हीच त्यांना आदरांजली ठरेल- प्राचार्य डॉ. बी.टी. जाधव

सातारा: येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधील इंग्रजी विभागाच्या रिडर्स क्लबमार्फत २ सप्टेंबर २०२२ रोजी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक वि.स. खांडेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त “वि.स. खांडेकरांच्या साहित्याचे अभिवाचन” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.टी. जाधव यांनी वि.स.खांडेकर यांच्या साहित्यातून समाजाप्रती असलेली त्यांची जाणीव, कणव, अन्याय अत्याचारविरोधात त्यांनी … Read more