ऊसाच्या मोळ्याखाली सापडून 12 वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

सातारा | धकटवाडी गावाच्या हद्दीत ऊसाने भरलेली ट्रॅक्टर- ट्राँली पलटी होऊन ऊस मोळ्या अंगावर पडल्याने सजनी अमर काळे (वय- 12) हिचा मृत्यू झाला. सदर घटनेची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली आहे. याबाबत पोलीस सुत्रांकडून समजलेली माहिती अशी की, मंगळवार सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास गायत्री लकी शिंदे, झिंगाट साजन शिंदे व सजनी अमर काळे हे उपजिवेकेसाठी … Read more

राष्ट्रवादी महिला पदाधिकाऱ्याच्या घरावर जीवघेणा हल्ला

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या कार्याध्यक्षा मुमताज मुलाणी यांचे घर व हॉटेलवर हल्ला करण्यात आला. बेकायदेशीर दारू विक्रेते बाळासाहेब माने व त्यांच्या कुटुंबीयांनी मुलाणी यांच्या घरावर खुनी हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच चारचाकी गाडीची तोडफोड व चिकन सेंटरच्या दुकानाची तोडफोड करून अश्लील लज्जास्पद शिवीगाळ करून, जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे म्हटले … Read more

हॅलो महाराष्ट्र इफेक्ट : साताऱ्यात ग्रेड सेपरेटमध्ये नो एंन्ट्री

Satara grade separate

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके सातारच्या ग्रेड सेपरेटर मधून कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा जीवघेणा पायी प्रवास या बातमीची दखल घेत विद्यार्थ्यांची जनजागृती करण्याचं काम वाहतूक शाखेच्या वतीने सुरू करण्यात आले आहे. यापुढे जीव धोक्यात घालून काॅलेजच्या विद्यार्थ्यांना ग्रेड सेपरेटमध्ये नो एंन्ट्री केली आहे. भुयारी मार्गात अनेक वाहने भरधाव वेगाने येत असल्याने या मार्गावरील प्रवेश हा अपघाताला निमंत्रण देणारा … Read more

माण- खटावमधील रस्त्यांसाठी 43 कोटींचा निधी : आ. जयकुमार गोरेंचे प्रयत्नांना यश

Jaykumar Gore

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके माण – खटाव विधानसभा मतदारसंघातील महत्वाच्या 9 रस्त्यांच्या कामांसाठी आ. जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून तब्बल 42 कोटी 71 लाख 68 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.  प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून या रस्त्यांची कामे मार्गी लागणार असल्याने दळणवळण सुलभ होणार आहे. माण तालुक्यातील दहिवडी – तुपेवाडी ते शिंदी बुदृक रस्त्यासाठी 4 कोटी … Read more

पाण्याच्या टाकीचा वाद : महिला सरपंचाच्या पतीविरोधात पोलिसात तक्रार

Bambwade water tank

कराड | राष्ट्रीय पेयजल योजनेच्या टाकीचे पूर्ण झालेल्या कामाचे आकसापोटी खुद्द सरपंचाच्या पतीनेच नुकसान केल्याबाबत व बिल मिळू नये. यासाठी आडकाठी केल्याप्रकरणी उंब्रज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ठेकेदारानेच तक्रार दिल्याने यातील गांभीर्य वाढले आहे. विभागात याची उलट- सुलट चर्चा सुरू झाली आहे. ठेकेदार सादिक आंबेकरी (रा. पाल, ता. कराड) याने सरपंचांचे पती सुनील … Read more

सातारा एमआयडीसीतील कचऱ्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावा : जिल्हाधिकारी

Satara Collector

सातारा प्रतिनिधी। शुभम बोडके सातारा येथील औद्योगीक वसाहत व कोडोली धनगरवाडी गावातील कचऱ्याचाप्रशन तातडीने मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगीक विकास महामंडळ, ग्रामपंचयात व उद्योजक यांनी समन्वयाने काम करावे. एमआयडीसीने त्यासाठीचा प्रस्ताव पाठपुरावा करुन लवकरात लवकर मंजूर करुन आणावा अशा सूचना जिल्हाधिकारी रुचंश जयवंशी यांनी केल्या. जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात जिल्हा … Read more

वडोली निळेश्वर येथे दुचाकी लावण्याच्या कारणावरून मारहाण

Karad Police

कराड | घरासमोर लावलेली दुचाकी बाजूला लावण्याच्या कारणावरून दोन शेजाऱ्याच्यात मारहाण झाल्याची घटना घडली. कराड तालुक्यातील वडोली निळेश्वर येथे रात्री उशिरा ही घटना घडली. याबाबतची फिर्याद सतिश बबन यादव (वय- 55, रा. वडोली निळेश्वर, ता. कराड) यांनी कराड तालुका पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 16/1/2023 रोजी रात्रौ 10.00 वाजणेचे सुमारास फिर्यादी … Read more

विकासकामात श्रेयवाद महत्वाचा नाही, तळमळ महत्वाची : सारंग पाटील

NCP Sarang Patil

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी श्रेयवाद हा महत्वाचा नसून जनतेच्या विकासकामांसाठी सक्रीय रहाणे महत्वाचे आहे. श्रेयवाद घडवून सामान्य माणसांची चेष्टा करण्याऐवजी विकासाची तळमळ महत्वाची असते, असे मत राष्ट्रवादीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी व्यक्त केले. या विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी कोम कोणाचे अन् श्रेय कोणाचे हा फलक राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून लावण्यात आला होता. त्यामुळे या फलकाची … Read more

शिवानीताई कळसकर यांच्या पुढाकाराने सफाई कर्मचारी महिलांचा सन्मान

Shivanitai Kalaskar

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके सातारा विकास आघाडीच्या शिवानीताई प्रीतम कळसकर यांनी महिलासाठी आयोजित केलेल्या हळदी- कुंकू कार्यक्रमास सफाई कर्मचारी महिलांनी लक्षणीय सहभाग नोंदवला. शिवानीताई यांनी प्रभाग 5 मधील महिलांनी या सफाई कर्मचारी महिलांसोबत मकर संक्रांतीचे वाण लुटले. शिवानीताई कळसकर म्हणाल्या, प्रत्येक सण हा सुख- दुःख वाटून घेण्याचा असतो. सातारा शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सफाई … Read more

पुणे- बंगळूर महामार्गावर कराडजवळ सहलीच्या बसला अपघात : विद्यार्थी व शिक्षक जखमी

Accident School Tour Bus

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील तासवडे गावच्या हद्दीत शाळेची सहल घेऊन जाणा-या एसटी बस व कंटेनर यांच्यात अपघात झाला आहे. यामध्ये तीन विद्यार्थी व दोन शिक्षक किरकोळ तर एक शिक्षक गंभीर जखमी झाला. जखमींना कराडच्या कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कोरेगाव तालुक्यातील वाघोली येथील … Read more