Tuesday, June 6, 2023

तुळसण फाट्यावर ऊसाचा ट्रॅक्टर- ट्राॅली पलटी

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील तुळसण फाटा येथे उसाच्या ट्रॅक्टर- ट्राॅली पलटी झाली. आज शुक्रवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. रस्त्या शेजारील नाल्यात ट्रॅक्टर गेल्याने चालक किरकोळ जखमी झाला आहे. सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, तुळसण फाटा (सवादे) येथे रयत कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर- ट्राॅलीचा अपघात झाला. कारखान्याकडे ऊस घेवून जाताना हा अपघात झाला. ट्रॅक्टर क्रमांक (एमएच- 11- जी- 2775) असा अपघातातील वाहनांचा नंबर आहे.

सध्या ऊस तोडीचा हंगाम सुरू असून अनेक ठिकाणी वाहने पलटी होण्याचा घटना घडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे अर्थिक नुकसान होत आहे. या अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत चालकाला बाजूला केले आहे.