सावळज येथे पिस्तुलासह जिवंत काडतुसे हस्तगत, एकाला अटक

सांगली | तासगाव तालुक्यातील सावळज येथे एका तरुणाकडून गावठी बनावटीचे पिस्टल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जयहिंद चौक येथे सापळा रचून कारवाई केली. या प्रकरणी प्रवीण भीमराव साळुंखे या तरुणास अटक केली आहे. अटक केलेल्या तरूणांकडून ५० हजार रुपये किमतीचे गावठी पिस्टल आणि ४ हजार रुपये किमतीची दोन जिवंत … Read more

मराठा आरक्षण : मागास ठरवण्याचा अधिकार केंद्राचा त्यामुळे जबाबदारी केंद्र सरकारचीच, राज्याची नाही : पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी मराठा आरक्षण हा बिलकुल राज्याचा विषय नाही. 102 वी घटना दुरूस्ती झाल्यानंतर कुठल्या घटकाला मागास ठरावयाचे हे सर्व अधिकार केंद्र सरकारने स्वताः कडे ठेवलेले आहेत. त्यामुळे मराठा आरक्षण संदर्भात सुप्रीम कोर्टाने ही केंद्र सरकारचीच जबाबदारी आहे, असा निर्णय दिलेला असल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. छ. संभाजीराजे सध्या राज्यभर … Read more

अशोकराज समूहाने अनेकांना अडचणीच्यावेळी आधार दिला : अशोकराव पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनामुळे अनेकांचा रोजगार बुडाला. अशा लोकांच्या उदरनिर्वाहासाठी साकुर्डीतील अशोकराज चॅरिटेबल ट्रस्ट व अशोकराज पतसंस्थेने अडचणीच्यावेळी धान्य देऊन गरजूंना मोठा आधार दिला आहे, असे प्रियदर्शनी उद्योग समूहाचे अशोकराव पाटील यांनी नमूद केले. कोरोना काळात साकुर्डी येथील अशोकराज पतसंस्था, अशोकराज ट्रस्ट व अशोकराज इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने गरजूंना धान्याच्या किटचे वाटप करण्यात आले. … Read more

कोरोनाचा विस्फोट : सातारा जिल्ह्यात नवे 2 हजार 675 पाॅझिटीव्ह तर केवळ 943 कोरोनामुक्त

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात बुधवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 2 हजार 675 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 943 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 22 हजार 761 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख … Read more

अवैध दारूविक्री प्रकरणी चाैघांवर गुन्हा तर 1 लाख 45 हजारांचा मुद्देमाल जप्त

Crime

सातारा | पुसेगाव आणि सोकासन याठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने बेकायदा दारु विक्री सुरु असलेल्या ठिकाणी छापे टाकण्यात आले. यावेळी चौघांवर गुन्हा दाखल केला असून 1 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अनिल चासकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत निरीक्षक भरारी पथकाने छापे टाकले. या छाप्यात नसरुद्दीन … Read more

हनी ट्रॅप : फलटणला आणखी एका व्यापाऱ्याला अडकविले, दोन लाखांची खंडणी उकळली

फलटण | सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात हनी ‘ट्रॅपद्वारेचे एका भेंडी व्यापाऱ्यांचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एका पशुखाद्य व्यापाऱ्याकडून दोन लाखांची खंडणी हनी ट्रॅपद्वारे उकळल्याचा गुन्हा फलटण शहर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. भेंडी व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीतीलच संशयित राजू बोके व त्याच्या अन्य चार साथीदारांनीच हा हनी ट्रॅप केल्याची तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती … Read more

जम्बो कोव्हिड सेंटर मधील कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन, पगार न झाल्याने ठेकेदारांच्या गाडीवर दगडफेक

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा येथील जम्बो कोव्हीड रुग्णालयातील 45 सफाई कर्मचारी आणि वार्ड बॉय यांनी एप्रिल महिन्याचा पगार मे महिना संपत आला असताना झाला नाही. त्यामुळे अचानक रात्री 10 वाजण्याच्या सुमारास कामबंद आंदोलन सुरू केले. यावेळी ठेकेदारांच्या चारचाकी गाडीवर दगडफेक केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गेल्या महिन्यातील पगार अद्याप न मिळाल्याने सफाई … Read more

रिटर इंडिया प्रा.लि.कंपनीकडून कोरोना बचावासाठी 100 सुरक्षित मास्कचे वाटप

सातारा | शासकीय विश्रामगृह, सातारा येथे सामाजिक बांधिलकी म्हणून रिटर इंडिया प्रा.लि.कंपनीकडून कोविड सुरक्षिततेसाठी PAPR (Powered Air Purifying Respirator) या 100 सुरक्षित मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी राज्याचे सहकारमंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. वाटप करण्यात आलेले मास्क अत्याधुनिक असून यामध्ये 99.8 टक्के शुद्ध हवा येते, त्यामुळे कसलाही थकवा जाणवत … Read more

यूथ क्लब ऑफ कराडमधील तरूणांकडून एक पाऊल माणुसकीचे

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी यूथ क्लब ऑफ कराड एक पाऊल माणुसकीचे हा नविन क्लब तरूणांनी केलेला आहे. या क्लबने हेल्पलाईन नंबर चालू केलेला असून त्याच बरोबर, गोरगरीब कुटूंबीयाना देखील या उपक्रमाच्या मध्यमातून लहान मुलांच्या बिस्किटापासून ते घरच्या किचन पर्यंतचे संपूर्ण साहित्य आपण ओगलेवाडी, हजारमाची व कराड शहरामध्ये कुटूंबीयाना किटबॅग दिलेल्या आहेत. यूथ क्लब ऑफ … Read more

जेष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचे निधन , रंगभूमीवर साकारल्या होत्या थोर पुरुषांच्या भूमिका

kantabai satarkar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचे संगमनेर इथे निधन झाले आहे. त्या 82 वर्षांच्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान रघुवीर खेडकर यांच्या कुटुंबातील इतर सदस्य पॉझिटिव्ह होते त्यातील काही जणांना काल घरी सोडण्या, आले आहे. सातारकर यांची मुले, मुली, जावई आणि नातवंडे देखील तमाशा क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या … Read more