नियमांचे उल्लघंन करणाऱ्या मोबाईल व कापड दुकानांवर कारवाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शासनाच्या नियमानुसार कोरोनाला रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा सोडून इतर दुकाने बंद ठेवण्याची सूचना केली आहे. मात्र तरीही काही दुकानदार नियमाचे उल्लघंन करत असल्याचे दिसून येत आहे. या उल्लघंन करणाऱ्या एक मोबाईल व एक कापड दुकानांवर कारवाई करण्यात आली आहे. कराड शहरातील नामांकित शिवाजी मार्केटमधील मानव टेक्सटाईल व विजय दिवस चाैकातील स्माईल … Read more

गांधीगिरी ः मास्क न वापरणाऱ्यांच्या चक्क पाया पडून कोविड डिफेंडर ग्रुपचे आवाहन

सातारा |  प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही मास्क न वापरणाऱ्या बेफिकीर नागरिकांच्या चक्क पाया पडून सातारा कोविड डिफेंडर ग्रुपच्या सदस्यांनी बाजारपेठेत गांधीगिरी केली. यावेळी ग्रुपतर्फे अनेकांना मास्कचे वितरणही करण्यात आले. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने सर्वांना मास्क वापरण्याचे बंधन घातले आहे. तरीही अनेक नागरिक मास्कचा वापर न करता बेफिकीरपणे राहात होते. या नागरिकांमुळे अनेकांचे आरोग्य धोक्‍यात येत … Read more

लाॅकडाऊनचा परिणाम ः खेरदीसाठी गर्दीच गर्दी, वाहतूकीची कोंडीच कोडी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी आज पासून राज्यात रात्री आठ नतंर कडक लाॅकडाऊनची अमंलबजाणी होणार आहे. त्यातच सकाळी सात ते आकरा अत्यवश्यक सेवांचा लाभ घेण्यासाठी सकाळपासून शहर व परिसरात गर्दी झाली होती. त्यामुळे आज सकाळी येथील कृष्णा कॅनालवर वहातूकीची कोंडी झाली. अकराच्या आत खरेदी व घरी जाण्याच्या घाईमुळे शहरातील मंडई व कृष्णा नाका, कृष्णा कॅनाॅल … Read more

पाठलाग करून त्रास देणाऱ्या परप्रांतियावर विनयभंगाचा गुन्हा 

crime

सातारा | येथील एका युवतीला मोबाईलवरून तुझ्याशी लग्न करायचे असे म्हणून, युवतीचा पाठलाग करून त्रास देणाऱ्या परप्रांतियावर शहर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. अजय विश्वनाथ यादव (रा. एमआयडीसी, सातारा, मूळ रा. बिहार) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, 2020 ते 12 एप्रिल 2021 या कालावधीत मोबाईलवर कॉल करून मला तुझ्याशी लग्न … Read more

‘सोनम गुप्ता बेवफा है’ यानंतर २० रुपयांच्या नोटेवरील ‘हा’ मेसेज वायरल

20 rs note

सातारा : हॅलो महाराष्ट्र्र – पूर्वीच्या काळात प्रेमीयुगल कबुतराच्या पायावर प्रेमाची पत्र बांधून एकमेकांना संदेश पाठवत होते. पण आताच्या काळात असे कबुतर पाहायला मिळत नाहीत. आताच्या काळात कोण कसे आपले प्रेम व्यक्त करेल सांगता येत नाही. अशीच एक घटना सातारा येथे घडली आहे.आताच्या जमान्यात लोक निरोप देण्यासाठी माेबाईलचा वापर करतात. एखादा महत्वाचा संदेश द्याचा असेल … Read more

दारू पिणे पडले महागात ः सहाजणांनी कोयता गळ्याला लावून दोन लाख केले लंपास

Crime

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके शिवथर (ता. सातारा) गावच्या हद्दीत धोम डाव्या कालव्यालगत रस्त्याच्या कडेला मद्यपान करत बसलेल्या दोघांना सहाजणांनी गळ्याला कोयता लावून 1 लाख 73 हजारांची रोकड, मोबाईल, किंमती घड्याळ असा एकूण 2 लाख रूपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याबाबतची सातारा तालुका पोलीस ठाण्यात अजित शिवाजी निकम (वय 43, … Read more

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 14 व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई

कराड | उंब्रज येथील ग्रामपंचायत प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 14 व्यावसायिकांच्यावर दंडात्मक कारवाई करून सुमारे 14 हजार रुपयांचा दंड वसूल केला. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जास्तीत जास्त व्यावसायिकांनी आरटीपीसीआर तपासणी करून घ्यावी, असे आवाहन सरपंच युवराज जाधव यांनी केले आहे. यासाठी येथील ग्रामपंचायतीने सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून भाजी मंडई बंद करून त्याचे माणिक चौक, … Read more

अभिनंदनीय ः पहिल्याच प्रयत्नात दिल्ली पोलिसमध्ये पीएसआय

कराड | कराड तालुक्यातील तांबवे येथील नंदकिशोर आण्णासाहेब पाटील यांची केंद्र सरकारच्या स्टाफ सिलेक्शन अंतर्गत दिल्ली पोलिसमध्ये पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) म्हणून पहिल्याच प्रयत्नात निवड झाली आहे. शेतकरी कुटुंबातील नंदकिशोरने कोणत्याही क्लासविना यश मिळवून देशाच्या राजधानीत गावचा झेंडा रोवला आहे. अवघ्या वयाच्या 26 व्या वर्षी नंदकिशोरने यश मिळविले आहे. त्याच्या या यशाने तांबवे गावाचाही नावलौकीक वाढला … Read more

विनाकारण फिरणाऱ्यांस पोलिस ठाण्याच्या आवारात क्वारंटाइन केले जाणार ः गणेश किंद्रे

koregoan Police

सातारा | कोरेेगाव शहरात विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. पोलिसांनी 101 वाहन धारकांकडून दिवसभरात 20 हजारांचा दंड पोलिसांनी वसूल केला आहे. शहरात काही जण विनाकारण नियम मोडत आहेत. असे प्रकार रोखण्यासाठी कोरेगाव शहरासह पुसेगाव, रहिमतपूर व वाठार स्टेशन पोलिस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी जप्त करून संबंधितास पोलिस ठाण्याच्या आवारात क्वारंटाइन केले जाणार आहे, … Read more

ना सनईचा सूर… ना किर्तन… ना प्रवचन तरीही रामजन्मकाळ मंगलमय साजरा

कराड | सातारा जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र चाफळ, गोंदवले व फलटण येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिरामध्ये यावर्षीचा श्रीराम नवमी जन्मोत्सव कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने व ठराविक पुजारी मानकरी व भक्तगणांच्या उपस्थितीत पार पडला. गेल्या अनेक वर्षापासून गुढीपाडव्यापासून दहा दिवस चाफळच्या श्रीराम मंदिरात चालणारा श्रीराम नवमी उत्सव यावर्षी साधेपणाने साजरा करण्यात आला. बुधवारी पहाटेपासून मंदिरात विविध धार्मिक … Read more