माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण करणार व्यापाऱ्यांसाठी मध्यस्थी

 कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी साेमवारी रात्री काढलेल्या लाॅकडाउनच्या आदेशाच्या विरोधात शहरातील व्यापारी रस्त्यावर उतरले. शहरातील मुख्य बाजारपेठेतील सराफ, कापड, हार्डवेअर, हाॅटेल व्यावसायिकांनी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. यापूर्वीच्या लाॅकडाउनमुळे व्यापाराचे कंबरडे मोडले आहे. त्यात नव्याने लाॅकडाऊन झाल्याने व्यवसायिक पूर्ण बरबाद होणार आहे. तरी लाॅकडाउनमध्ये शिथिलता … Read more

आम्ही व्यवसाय चालू ठेवणार हायं, कोरोनाचे नियम पाळणारं हाय

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके कुणाच्या पोठावर येवून देणार नायं पाय, यासाठीच आम्ही व्यवसाय चालू ठेवणार हायं, कोरोनाचे नियम पाळणारं हाय, मायबाप सरकार आमची विनंती ऐका, आम्ही कोरोनाला हद्दपार करणार आहोत अशा घोषणा देत सातारा शहरातील व्यापाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाच्या आदेशाला विरोध करित दुकाने उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या काही दिवसांवर लग्नसराई तसेच पाडव्याचा सण आहे. … Read more

सातारा जिल्ह्यात ५१४ बाधित ः चोवीस तासांत ६ जणांचा मृत्यू

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सोमवारी रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये सातारा जिल्ह्यातील ५१४ जण बाधित आले आहेत. तर चोवीस तासांत जिल्ह्यात ६ बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले. जिल्ह्यात कोरोना बांधितांची होणारी वाढ सोमवारी  रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये पाचशेपार बांधितांचा आकडा आलेला आहे. मात्र तरीही समाधानकारक कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झालेली नाही. … Read more

खळबळ ः पेट्रोल टाकून जाळलेला अनोळखी मृतदेह सापडला

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा शहरातील खंडोबाचा माळ येथील घटना अनोळखी मृतदेह पेट्रोल टाकून जाळला असल्याची घटना उघडकीस आलेली आहे. सदरील मृतदेह हा पुरूष कि महिला यांची ओळख पटलेली नसल्याचे अप्पर पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांनी सांगितले आहे. सातारा शहराच्या हद्दीतील मध्यवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल … Read more

भाडेकरु पती पत्नीचा घरमालकाच्या दागिन्यांवर डल्ला; घरात कोणी नाही पाहून केला कार्यक्रम, पण..

लोणंद : घरात कोणी नाही हे पाहून भाडेकरु पती पत्नीने घरमालकाच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचा प्रकार सातारा जिल्यातील लोणंद येथे घडला. लोणंद पोलीस ठाणे हद्दीतील रहिवाशी अशोक अनंत महामुनी यांचेकडे गेली 1 महिन्यापासून भाडेकरु म्हणून राहणारे पती पत्नीने घरमालक घरात नसलेचे पाहुन घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम घेवून रुम खाली करुन पळून गेलेबाबत फिर्यादी अशोक … Read more

सातारा : जिल्ह्यात 30 एप्रिल पर्यंत सुधारित निर्बंध लागू; धार्मिक स्थळे, सलूनसह ‘या’ गोष्टी राहणार बंद

सातारा : सातारा जिल्हयात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने निर्बंध वाढवणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी क्रिमिनल प्रोसिजर कोड 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार, प्राप्त असलेल्या अधिकारान्वये, सातारा जिल्हयात दि. 05/04/2021 रोजीचे 20.00 वाजले पासून ते दिनांक 30/04/2021 रोजीचे 23.59 वा. पर्यंत खालीलप्रमाणे आदेश जारी केले आहेत. सातारा जिल्हयामध्ये दि. 05 एप्रिल 2021 … Read more

मेडिकलमध्ये आईसक्रिम, चाॅकलेट व स्नॅक्स विक्रीस मनाई ः जिल्हाधिकारी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक कायदा लागू केला आहे. जिल्ह्यात अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे,  त्यामध्ये अत्यावश्यक सेवेत असलेल्या मेडिकल व औषध दुकानात संध्याकाळी ८ नंतर आईसक्रिम, चाॅकलेट व स्नॅक्स विकण्यास मनाई करण्याचा आदेश जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी दिलेला आहे. जिल्ह्यात हाॅटेल, किराणा दुकान तसेच आईसक्रीम दुकाने रात्री … Read more

राष्ट्रीय महामार्गावर झाड पडल्याने दुचाकीवरील दोनजण जखमी ः तीन तास वाहतूक बंद

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वळसे गावच्या हद्दीतील हॉटेल इंद्रप्रस्थच्या समोर चारचाकी व एका दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्यावर एक भलेमोठे वडाचे झाड पडल्यामुळे दोनजण जखमी झाले आहेत. शैलेश भोसले (वय :-३५), महेश भास्कर (वय :- ३२,दोघेही- रा. रंकाळा कोल्हापूर) अशी दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या जखमीची नावे आहेत. तर महाकाय वृक्ष पडल्यामुळे तीन … Read more

बाजार समितीच्या गुळ मार्केट कमानीस स्व.यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्याची मागणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाराष्ट्र राज्याचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री व कराडचे सुपुत्र असलेले स्व.यशवंतराव चव्हाण यांची जन्म शताब्दी नुकतीच झाली आहे. स्व. चव्हाण साहेब यांच्या जन्म शताब्दी निमित्त शासनाने बाजार समितीच्या आवारात अनेक कामे केली आहेत. त्यामुळे शेती उत्पन्न बाजार समितीच्या गुळ मार्केटच्या 4 नं. गेटला ऊभी करण्यात आलेल्या कमानीस स्व.यशवंतराव चव्हाण (साहेब) … Read more

सातारा जिल्ह्यात ४९८ जणांचा अहवाल पाॅझिटीव्ह

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके शनिवारी रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये सातारा जिल्ह्यातील ४९८ जण बाधित आले आहेत. तर चोवीस तासांत जिल्ह्यात दोन बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले. जिल्ह्यात कोरोना बांधितांची होणारी वाढ शनिवारीही काही अंशी कमी आलेली आहे. मात्र तरीही समाधानकारक कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झालेली नाही. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण … Read more