दारू पिऊन तरुणांची पोलिसांना मारहाण; कराड येथील घटना

Karad News

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या चौघांनी पोलीस व होमगार्डला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. चैतन्य बाळासो ओव्हाळ (वय 25), पंकज संजय डुबल (वय 25), रोहीत शशिकांत चन्ने (वय 28), आफताब सिंकदर शेख (वय 22 सर्व रा. मळावार्ड ओगलेवाडी, ता. कराड) अशी ताब्यात … Read more

अकलूजमध्ये लडाख, हिमालयातून नवीन पाहुण्याचे आगमण; कंपन पक्षाचे सयाजीराजे पार्कमध्ये स्थलांतर

सातारा प्रतिनिधी | हिमालयाच्या पर्वतरांगेत व लेह – लडाखमध्ये मूळ वास्तव्याला असलेला थिरथिरा अर्थात कंपनपक्षी हिवाळी पाहुणे म्हणून येथील सयाजीराजे पार्कमध्ये येऊन दाखल झाल्याची माहिती पक्षी अभ्यासक डॉ. अरविंद कुंभार यांनी दिली. कंपनपक्ष्याबद्दल डॉ. कुंभार यांनी सांगितलेली माहिती अशी की, कस्तूरिका कुलातील‌ या पक्षाला इंग्रजीत रेड स्टार्ट असे नाव आहे. मे व जून महिन्यात विणीवर … Read more

महाबळेश्वर नगरपालिकेने आ मकरंद पाटलांना डावलले

पाचगणी प्रतिनिधी | सादिक सय्यद महाबळेश्वर नगरपालिकेकरीता महाराष्ट्र शासनाच्या सन २०२० -२०२१ या अर्थसकल्पात १०० कोटीची तरतुद करण्यात आली आहे . याबाबत महाराष्ट्र शासनास महाबलेश्वर नगरपरीषदेकडुन १०० कोटीची तरतुद केल्याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमत्री याच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला आहे . मात्र हा ठराव करत असताना वाई खंडाळा महाबळेश्वर चे स्थानिक आमदार मकरंद पाटील यांना या … Read more

सातारा जिल्ह्यातील ‘या’ गावात कोंबड्यांचा मृत्यू; जिल्हाधिकार्‍यांकडून सतर्क क्षेत्र घोषीत

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी खंडाळा तालुक्यातील मौजे मरिआईचीवाडी (कापरेवस्ती व शिंदेवस्ती) येथे अज्ञात आजाराने कोंबड्या दगावल्याचे आढळून आले असून मृत्युचे कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झाले नसल्याने कोंबड्यांना कोणते आजार झाले हे अनिष्कर्षीत असल्याने रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या अनुषंगाने मौजे मरिआईचीवाडी (कापरेवस्ती व शिंदेवस्ती) ता. खंडाळा येथील सर्व्हेक्षणाचे काम … Read more

उदयनराजेंनी उद्घाटन केलेल्या ग्रेड सेपरेटरचे पुन्हा होणार उद्घाटन – जिल्हाधिकारी

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा शहरातील पवई नाका येथे होणाऱ्या वाहतूक कोंडी निवारणासाठी बांधण्यात आलेल्या ग्रेड सेपरेटरचे पुन्हा एकदा उद्घाटन होणार आहे. या ग्रेड सेपरेटरचे फॉर्मल उद्घाटनासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी बांधकाम विभागाला सूचना दिल्या आहेत. सातारा शहरातील पवई नाका येथे होणाऱ्या वाहतूक कोंडी निवारणासाठी ग्रेड सेपरेटर चे काम हाती घेण्यात आले होते. 76 … Read more

‘त्या’ प्रकरणातून शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह 18 जणांची निर्दोष मुक्तता, वाई न्यायालयाने दिला निकाल

सातारा प्रतिनिधी । महामार्गावर पडलेले खड्डे आणि टोल नाक्याकडून होत असलेली गैरसोय याबाबत आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी दि.18 डिसेंबर 2019 ला आनेवाडी टोलनाक्यावर आंदोलन केले होते. त्याप्रकरणी भुईंज पोलीस ठाण्यात त्यावेळी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी आज वाई न्यायालयात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.एन.गिरवलकर यांच्यासमोर अंतिम सुनावणी होऊन सबळ पुराव्या अभावी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह 18 जणांची निर्दोष … Read more

काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद कोणाकडे जाणार? माजी मुख्यमंत्री चव्हाण अन् महसूलमंत्र्यांमध्ये कमरा बंद चर्चा

Prithviraj Chavan with Balasaheb Thorat

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद कोणाकडे जाणार याबाबत राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. अशात आज राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांची कराड येथे कमरे बंद चर्चा झाली. यावेळी या दोघांमध्ये प्रदेशाध्यक्षपदाबाबत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या निधनानंतर कुटुंबीयांचे … Read more

म्हणुन तो बिबट्या NH4 हायवेवर बसून राहिला; कराड-नांदलापूर फाट्याजवळील घटना (Video)

Leopard

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी पाचवड फाटा (नांदलापूर) ता. कराड दरम्यान पुणे-बेंगलोर महामार्गालगत बिबट्याने काही क्षण ठोकला. एवढ्या वाहनांच्या रहदारीतही बिबट्याने महामार्गावर तळ ठोकल्याने वाहनधारकांचीही भंबेरी उडाली. बिबट्याने महामार्गावर काही क्षण विश्रांती घेतलयानंतर त्याने तेथून धूम ठोकली. दरम्यान, महामार्गवर बसलेल्या बिबट्याचे काही वाहनधारकांनी केलेले चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी … Read more

सातार्‍याचा जवान सुजित किर्दत चीनच्या सीमेवर शहीद; वडील सैन्यातून सुभेदार पदावरुन सेवानिवृत्त

Sujit Kirdat

सातारा प्रतिनिधी | सिक्कीम येथे चीनच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना इंजिनिअरिंग रेजिमेंटमधील हवालदार सुजित नवनाथ किर्दत (वय ३७, मूळ रा.चिंचणेर निंब ता. सातारा) हे जवान हुतात्मा झाले. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाने या घटनेला दुजोरा दिला आहे. रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मात्र दुर्घटनेचा तपशील समजू शकला नाही. जवान किर्दत यांच्या पश्चात पत्नी, … Read more

रयत शिक्षण संस्थेच्या सचिवांचा राजीनामा ; बैठकीसाठी शरद पवार साताऱ्यात दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेल्या रयत संस्थेच्या सचिव कराळे यांनी पुण्यात राजीनामा दिला आहे. त्यानंतर खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेची बैठक पार पडणार आहे. शरद पवार डॅमेज कंट्रोल करण्यासाठी साताऱ्यात पोहोचल्याचं बोललं जात आहे. या बैठकीला रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील आणि सर्व पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. … Read more