सातारा जिल्ह्यातील ‘या’ गावात उमेदवारांपेक्षा नोटालाच अधिक मते; निवडणुक अधिकारी पेचात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल आज जाहीर होत आहे. अनेक ठिकाणी भाजप-काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यात जोरदार लढत होत असल्याचे चित्र आहे. काही दिग्गज नेत्यांनाही आपल्या गावात हार पत्करावी लागत आहे. मात्र सातारा जिल्ह्यातील एका गावात अजब निकाल लागल्याचे पहायला मिळत आहे. खंडाळा तालुक्यातील धनगरवाडी ग्रामपंचायतीत उमेदवारांपेक्षा नोटालाच अधिक मते मिळाली आहेत.

सातारा जिल्ह्यातील धनगरवाडी ग्रामपंचायत ता.खंडाळा येथे अजब निकाल लागला आहे. येथील ग्रामपंचायतीच्या 2 जागांवर उमेदवारांपेक्षा नोटा लाच अधिक मतदान मिळाली आहेत. केवळ दोन जागेवर निवडणूक झाली. वाॅर्ड क्रमांक दोन मधील उमेदवार जयवंत मांढरे, पाचे निवृत्ती, चंद्रभागा कदम, चैत्राली कदम यांच्याोेक्षा नोटाला अधिक मते मिळाली आहेत. या ग्रामपंचायतीत इतर जागा बिनविरोध झाल्या आहेत. पहिल्या जागेवर नोटा ला 211 तर दुसऱ्या जागेवर 217 असे मतदान झाले.

https://t.co/G5kcUA5uqq?amp=1

दरम्यान, वाॅर्ड क्रमांक दोन मध्ये लागलेल्या अजब निकालामुळे निवडणुक निर्णय अधिकारी, धनगरवाडी यांच्यासमोर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. याबाबत आता जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे कळवण्यात आले असून काय निर्णय घ्यावा याबाबत मार्गदर्शन करावे अशी विनंती करण्यात आली आहे.

https://t.co/odT6yryn2c?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment