महाबळेश्वर नगरपालिकेने आ मकरंद पाटलांना डावलले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाचगणी प्रतिनिधी | सादिक सय्यद

महाबळेश्वर नगरपालिकेकरीता महाराष्ट्र शासनाच्या सन २०२० -२०२१ या अर्थसकल्पात १०० कोटीची तरतुद करण्यात आली आहे . याबाबत महाराष्ट्र शासनास महाबलेश्वर नगरपरीषदेकडुन १०० कोटीची तरतुद केल्याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमत्री याच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला आहे . मात्र हा ठराव करत असताना वाई खंडाळा महाबळेश्वर चे स्थानिक आमदार मकरंद पाटील यांना या अभिनंदनाच्या ठरावातुन डावलले असल्याची खळबळजनक माहीती समोर आली आहे .
महाबळेश्वर गिरीस्थान नगरपीलीकेकडुप विषेश सभेचे आयोजन करुन १०० कोटी रुपये दिल्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या अभिनंदनाच ठराव करत असताना . राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे , उपमुख्यमत्री अजितदादा पवार , नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे , पर्यावरण मत्री आदित्य ठाकरे , याच्यासह नगराध्यक्षा व उपनगराध्यक्षानसह सर्व नगरसेवक व नगरसेविका याचे देखील अभिनंदन केले आहे . मात्र स्थानिक आमदार मकरंद पाटील यांचे नाव डावलले गेल्याची धक्कादायक माहीती समोर आल्याने .महाबळेश्वरमध्ये चर्चेचा विषय झाला आहे . वाई खंडाळा महाबळेश्वरचे आमदार म्हणुन मकरंद पाटलांचा महाबळेश्वर सदैव लक्ष असते .

विकास कांमाचा डोगंर उभा करताना स्थानिक नगरपालीकेतील घोडा व्यवसायिक , स्थानिक टॅक्सी चालक , तसेच विकासाच्या आड येणारे मुद्दे दुर करत . प्रशासनावर महाबळेश्वर नगरपालीकेचा विकासाच मुद्दा सदैव स्थानिक आमदार म्हणुन मकरंद पाटील मार्गी लावत असतात . महाबळेश्वर नगरपालीकेत गत काही दिवसापासुन राजकारण चांगलेच पेटले आहे . उपनगराध्यक्ष अफजल सुतार याच्या माध्यमातुन सभागृहात मकरंद पाटलांच्या विचाराचे नगसेवकांचा गड राखला गेला आहे . मात्र अभिनंदन ठरावावर सुचक नगरसेवक कुमार शिंदे व नगरसेवक अनुमोदक युसुफ शेख यांच नाव अधोरेखीत आहे .

महाराष्ट्राच नंदनवन गिरीस्थान नगरपालीकेच्या महाबळेश्वर नगरपालीकेच्या १०० कोच रुपायाच्या निधीच्या अभिनंदन ठरावातुन स्थानिक आमदार मकरंद पाटील यांचे नाव वगळ्याल्याने स्थानिक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानकडुन नाराजी व्यक्त होताना दिसत आहे . सभागृहात आमदार मकरंद पाटील याच्या विचाराचे १२ नगरसेवक असताना देखील . आ मकरंद पाटील यांचे नाव अभिनदनाच्या ठरावातुन वगळले असल्याने आश्चर्य देखील व्यक्त केले जात आहे . राज्याचे उपमुख्यमत्री अजित पवार यांना १०० कोटीचा निधी महाबळेश्नर नगरपालीकेला देताना स्थानिक आमदार मकरंद पाटील याच्या मार्गदर्शनाखाली त्याचा सुयोग्य वापर करा हे ठणकावुन सांगितले असताना . महाळेश्वर नगरपालीकेच्या महाराष्ट्र शासनाच्या अभिनंदन. ठरावाचं स्थानिक आमदार मकरंद पाटील यांचे नाव नसल्याने आ मकरंद पाटील गटाचे नगरसेवक काय भुमीका घेणार याबाबत उत्सुकता वाढली आहे .

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment