बैलगाडी शर्यत पुन्हा सुरु होणार? श्रीनिवास पाटील, अमोल कोल्हेंचे केंद्र सरकारला निवेदन

नवी दिल्ली । महाराष्ट्रात पुन्हा एकदा बैलगाडा शर्यत सुरु व्हावी म्हणून राजकीय पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचे प्रतिक असणारी बैलगाडा शर्यत पुन्हा एकदा सुरु व्हावी या मागणीचे निवेदन सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री गिरीराज सिंह यांना भेटून दिले … Read more

पाच दिवस, ४६०० किलोमीटर अंतर आणि दोन चालक, श्रीनिवास पाटील यांच्याकडून विशेष कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। सध्या संचारबंदीमुळे आंतरराज्यीय वाहतूक अद्याप सुरु करण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत पश्चिम बंगालमधील कामगारांना घरी पोहोचविण्यासाठी दोन चालकांनी चक्क पाच दिवस प्रवास केला. पाच दिवसाचा प्रवास करून ४६०० किलो मीटरचे अंतर कापत पश्चिम बंगालमधील मजुरांना या दोघांनी सुखरूप घरी पोहचवले. सुरेश तुकाराम जगताप आणि  संतोष सुरेश निंबाळकर असे या दोन एस.टी. चालकांचे नाव असून त्यांनी आज … Read more

आमचा कर्ण वादळाने नुकसान झालेल्यांचे अश्रू पुसतोय; श्रीनिवास पाटीलांचे शरद पवारांप्रति गौरवोद्गार

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी | आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्थापना दिवस आहे. यानिमित्ताने रक्तदानाचा उपक्रम राबविण्याचे राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी ठरविले. तसे त्यांनी आदेश दिले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीमुळे अनेक रक्तदाते आपापल्या गावी निघून गेले आहेत. अशावेळी अनेक रुग्णांना रक्ताची आवश्यकता भासते तेव्हा त्यांना ताजे रक्त मिळत नाही म्हणून पक्षाच्या २२ व्या … Read more

खासदार पाटीलांची शेतात मशागत, सगळं बंद असूनही कोणी उपाशीपोटी नाही याचं श्रेय शेतकर्‍यांना

सातारा प्रतिनिधी | कोरोना व्हायरसने सध्या जगभरात थेमान घातले आहे. कोरोना रोगाच्या साथीमुळे अनेक देशांनी लाॅकडाउन पुकारले आहे. या लाॅकडाउनच्या काळात सर्वत्र बंद असताना कोणीही उपाशीपोटी नाही याचे श्रेय शेतकर्‍यांना द्यावे लागेल असे मत सातार्‍याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले आहे. खासदार पाटीलांनी शेतात मशागत करतानाचा एक फोटो सोशल मिडियावर शेयर करत त्यांनी शेतकर्‍यांच्या … Read more

कोरोना उपाययोजनांसाठी २५ लाखांचा निधी; राज्यातील खासदारांपुढे श्रीनिवास पाटलांचा आदर्श

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्याशी संबंधित पायाभूत सुविधा मिळण्यासाठी सातारचे खा. श्रीनिवास पाटील यांनी आपल्या फंडातील 25 लाख रूपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करण्याची सूचना केली आहे. खासदारांच्या स्थानिक विकास निधीतून हा निधी वर्ग केला जाणार असून कोरोना विरोधात लढा देण्यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाला या निधीतून मदत … Read more

खासदार श्रीनिवास पाटीलांचेही वर्क फ्राॅम होम, कुटुंबातील सर्वांची काळजी घेण्याचे नागरिकांना आवाहन

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोना व्हायरसने सध्या जगभर थैमान घातले आहे. देशात कोरोना रुग्णांची संख्या ३४२ वर पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांनी २२ मार्च च्या दिवशी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन केले आहे. यामुळे देशात सर्वत्र शुकशूकाट असून वर्क फ्रोम होम पद्धतीने काम चालले आहे. सातार्‍याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनीही वर्क फ्रोम होमचा पर्याय … Read more

श्रीनिवास पाटलांच्या दिलखुलास जगण्याचं रहस्य..त्यांच्याच लेखणीतून..!!

श्रीनिवास पाटील. सिक्कीमचे माजी राज्यपाल आणि साताऱ्याचे विद्यमान खासदार. यांच्या मिशा जितक्या भारदस्त आहेत त्यापेक्षा भारदस्त आहे त्यांचं एकूण राहणीमान आणि राजकीय जीवनातील वावर. ज्या वयात नातवंडांना करियर करताना पहायचं, त्या वयात हा माणूस जिल्ह्याची धुरा समर्थपणे पेलतोय. हे सगळं हा माणूस साध्य करु शकतोय ते अंतप्रेरणेच्या जोरावर आणि मिळालेल्या चांगल्या साथीदारांच्या पाठिंब्यावर. आज हे खास नमूद करण्याचं कारण म्हणजे श्रीनिवास पाटील यांनी स्वतः लिहिलेली फेसबुक पोस्ट. आपल्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरुन श्रीनिवास पाटील यांनी आपल्या सामाजिक जीवनातील ५० वर्षांच्या सातत्याविषयी खुलासा दिला आहे. लोकनेता बनणं हे सहज शक्य होत नाही हीच धारणा पाटील साहेबांनी लिहिलेला मजकूर वाचून मनात आल्याशिवाय राहत नाही.

फर्ग्युसन रोडवरच्या वैशालीसमोरुन जेव्हा शरद पवारांना पोलीसांनी काॅलर धरुन उठवलं होतं…

किस्से राजकारणापलीकडचे | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि नुकतेच सातार्‍यातून उदयनराजे भोसले यांचा पराभव करुन खासदार म्हणुन निवडुन आलेले श्रीनिवास पाटील यांच्या मैत्रीबद्दल सध्या सोशल मिडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे. पवार आणि पाटील काॅलेजमध्ये असल्यापासूनचे मित्र आहेत. त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से तुम्ही याआधी बर्‍याचदा एकले असतील. मात्र पुण्याच्या फर्ग्युसन रस्त्यावरील वैशाली हाॅटेल समोरुन … Read more

आदरणीय पाटील साहेब जिंकले हे खरं आहे, पण लोकसेवा काय केली?- उदयनराजे भोसले

सर्व राज्याचे लक्ष लागून असलेल्या सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांचा श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला. अतिशय प्रतिष्ठेच्या बनलेल्या या निवडणुकीत साताकर मतदारांनी श्रीनिवास पाटील यांना पसंती देत मोठ्या मताधिक्क्याने त्यांना निवडून दिले. मात्र, उदयनराजेंना हा पराभव जिव्हारी लागल्याचे आता दिसत आहे.

घड्याळासमोरचं बटन दाबले तरी मत कमळाला ! सातार्‍यात खळबळ

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी राज्यभरात मतदान पार पडलं. दरम्यान, सातार्‍यात लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी देखील मतदान झालं. मात्र, सातारा जिह्यातील नवलेवाडीमध्ये मतदान केंद्रावर घड्याळासमोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधीत ग्रामस्थांनी यासंदर्भातील आरोप केला आहे.

साताऱ्यातील नवले गावातील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. मतदान सुरू झाल्यावर काही मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारासाठी घड्याळासमोरील बटन दाबले. मात्र व्हीव्हीपॅटमध्ये कमळ चिन्ह असलेल्या भाजपाच्या उमेदवाराला मत जात होते. हा प्रकार ग्रामस्थांच्या तिथल्या निवडणूक अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर ईव्हीएम मशीन बदलण्यात आले आणि पुढील मतदान पार पडले.

निवडणूक अधिकाऱ्यांनी शहानिशा केल्यानंतर खरोखरंच घड्याळाला मतदान केले तरी ते कमळाला जात असल्याचं मान्य केल्याचं गावकरी सांगत आहेत. त्यानंतर सदर ईव्हीएम बदलण्यात आलं आणि पुढील मतदान सुरळीत पार पडलं. मात्र, गंभीर घटनेबाबत आता पुढे निवडणूक आयोगाकडून काय कार्यवाही केली जाणार याबाबतच तपशील अद्याप मिळू शकलेला नाही.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/445764886054352/