शहर बससेवेला संपाचा ‘स्मार्ट’ फटका; प्रवाशांचे हाल

smart city bus

औरंगाबाद – राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल होत असताना शहर बस सेवेतील कर्मचारी देखील त्यात सहभाग झाल्याने शहरवासीयांचे अतोनात हाल होत आहेत. मनपा प्रशासन शहर बस सेवा सुरू करण्यासाठी आंदोलकांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परंतु अद्यापही मनपाच्या ‘स्मार्ट’ प्रशासनाला यावर तोडगा काढण्यात यश आलेले नाही. औरंगाबाद मनपाने … Read more

तब्बल 87 कोटी रुपये खर्चून शहरवासीयांना मिळणार स्वच्छ हवा 

aurangabad

औरंगाबाद – मोठ्या महानगरांतील प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र शासनातर्फे राष्ट्रीय स्वच्छ हवा अभियान राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत औरंगाबाद शहराला पुढील पाच वर्षात तब्बल 87 कोटी मिळणार आहे. यासंबंधीचा करार बुधवारी मुंबई येथे करण्यात आला. मुंबई येथील केंद्र शासनाच्या पर्यावरण व वन आणि वातावरणीय बदल मंत्रालयातर्फे मंगळवारी व बुधवार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत … Read more

स्वच्छ सर्वेक्षणात औरंगाबाद मनपाचा देशात 22 वा क्रमांक

aurangabad

औरंगाबाद – देशभर राबवण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत अभियानात करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षणात औरंगाबाद महानगरपालिकेने देशात 22 वा तर महाराष्ट्रात 6 वा क्रमांक पटकाविला आहे. या यशाबद्दल महानगरपालिका प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. महानगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण 2021 मध्ये ज्या शहरांची लोकसंख्या दहा लाखांपेक्षा जास्त आहे, अशा शहरामध्ये राष्ट्रीय स्तरावर 22 वा क्रमांक मिळवला आहे. मागील … Read more

औरंगाबाद शहराचे जीआयएस मॅपिंग पूर्ण

औरंगाबाद – औरंगाबाद शहरातील मालमत्तांची मोजणी करण्यासाठी जीआयएस (जिऑग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम) या तंत्रज्ञानाचा वापर केला जात असून झोन क्रमांक 9 चे मॅपिंग प्रायोगिक तत्त्वावर पूर्ण झाल्यानंतर आता बाकी आठही झोनचे काम पूर्ण झाले आहे. आता पुढच्या टप्प्यात प्रत्यक्ष सर्वे ला सुरुवात करण्यात येईल, असे उपायुक्त अपर्णा थेटे यांनी सांगितले आहे. गेल्या चार महिन्यांपासून या कामाचे … Read more

एसटी कर्मचाऱ्यांचा संप: औरंगाबाद शहरातील स्मार्ट शहर बससेवा ठप्प

smart city bus

औरंगाबाद – एसटी महामंडळातील कर्मचार्‍यांच्या संपाचा फटका औरंगाबाद स्मार्ट सिटी बस सेवेला ही बसला असून मागील बारा दिवसांपासून शहर बस सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी ला दररोज पावणेतीन लाख रुपयांवर पाणी सोडावे लागत असून, प्रशासनाने बस सेवा सुरू करण्यासाठी पर्यायी व्यवस्थेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणि अस्मार्ट प्रशासनामुळे शहरातील … Read more

नागपूरनंतर औरंगाबादेतील सफारी पार्क ठरणार मोठे

औरंगाबाद – मिटमिटा भागात महापालिकेतर्फे उभारल्या जाणाऱ्या सफारी पार्कचे काम प्रगतीवर असून, हे सफारी पार्क भव्यदिव्य करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. सफारी पार्कसाठी सध्या १०० एकर जागा राज्य शासनाने दिली आहे. त्यात घरकुलासाठी राखीव असलेल्या १७ हेक्टरची भर पडणार आहे. तसेच वन विभागाकडून ४६ हेक्टर जागा मिळविण्यासाठी प्रशासनाने पाठपुरावा सुरू केला आहे. त्यात यश आले … Read more

कोणत्याही क्षणी कोसळू शकतो ऐतिहासिक महेमूद दरवाजा

aurangabad

औरंगाबाद – ऐतिहासिक पानचक्कीच्या वैभवात भर घालणारा महेमूद दरवाजा मोडकळीस आला असून, महिनाभरापूर्वी महापालिकेने दरवाजातून वाहतूक बंद केली. स्मार्ट सिटीकडून डागडुजीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्याची घोषणाही करण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात अजूनही काम सुरू झाले नाही. दोन महिन्यांपूर्वी एका मोठ्या वाहनाने दरवाजाला धडक दिली. त्यामुळे दरवाजाची कमान (आर्च) मध्यभागी वाकली. महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दरवाजाची … Read more

मनपाला १५ व्या वित्त आयोगातून मिळाले तब्बल 63 कोटी

auranagabad

औरंगाबाद – ऐतिहासिक औरंगाबाद शहराच्या विकासाला गती देणारे अनेक प्रस्ताव मागील काही वर्षांपासून निधीअभावी मनपाकडे प्रलंबित होते. परंतु, आता 15 व्या वित्त आयोगातून पहिल्यांदाच मनपाला तब्बल 63 कोटी 51 लाख रुपये देण्यात आले आहेत. या निधीतून शहराचा चेहरा-मोहरा बदलणार 16 विविध विकास कामे करण्यात येणार आहेत. अवघ्या एका महिन्यात या कामांना सुरुवात होईल अशी माहिती … Read more

शहरात बसवले सातशे सीसीटीव्ही कॅमेरे, मंगळसूत्र चोरट्यांना पकडण्यास होणार मदत

CCTV

औरंगाबाद : कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी त्याचबरोबर वाहतूक कोंडी, मोर्चा, दंगल तसेच आणिबाणीच्या परिस्थितीत पोलीस यंत्रणा लवकरात लवकर घटनास्थळी पोहोचावी यासाठी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या निधीतून 176 कोटी रुपये खर्च करून शहरातील वेगवेगळ्या 418 ठिकाणी सातशे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर या कॅमेराचे फुटेज चेक करण्यासाठी पोलिस आयुक्तालयात स्वतंत्र कमांड कंट्रोल सेंटर उभारण्यात … Read more

स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहरवासियांना मिळणार दर्जेदार नागरी सुविधा – पालकमंत्री सुभाष देसाई

औरंगाबाद | भारत सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरात विविध विकास कामे सुरू आहेत. या विकासकामांच्या माध्यमातून शहरावासियांना दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध होणार असल्याने शहराची विकासाकडे अधिक जोमाने वाटचाल होणार असल्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले. महानगरपालिकेच्या सिध्दार्थ उद्यान येथे सुपर हिरो पार्क, प्लास्टीक बॉटल रिसायकल बिन, एफआरपी पोर्टेबल टॉयलेट, सिध्दार्थ जलतरण तलावाचे नुतनीकरण इत्यादी कामांचा लोकार्पण … Read more